Skip to main content

किती सांगू मी आनंद झाला-

लेखक विदेश यांनी शनिवार, 01/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल:- किती सांगू मी सांगू कुणाला-) किती सांगू मी आनंद झाला , भाव भाज्यांचा खाली ग आला ! गडे जाऊ चला , भाज्या आणू चला- रुपयाला किलो कांदा झाला ! ।१। नवर्‍याच्या संगती ग , पिशव्या हाती घेऊन मी आले ‘नको हसू गालात , नको चालू तोर्‍यात-’ नवरोजी कुरकुरले ! चुका-दोडका-लसूण , कोबी-आलं-सुरण , नवलकोलात फ्लॉवर दिसला ! ।२। मेथी शेपू भेंडी ग , पालकाची पेंढी भुलले ग्राहक किती ! कुणी मागे गवार , कुणी घेवडा-मटार शेंगांना नांवे किती ! रोज फोडी करून , ते बटाटे चिरून- सांज सकाळी कंटाळा आला ! ।३। भाव असा वाढला ग , घेणारा भरडला- डोळ्यांतुनी पाणी पडे ! लपुन छपुन व्यापारी , करती ग नफेखोरी- महागाई चोहीकडे ! ....घेता डुलकी जरा , स्वप्न पडले मला- जाग येता , बटाटा तो दिसला !! ।४।
लेखनविषय:

वाचने 1130
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया