Skip to main content

तात्या अभ्यंकरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभकामना !

लेखक नीलकांत यांनी रविवार, 02/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो ,
Tatya
आज आपल्या मिसळपावचे संस्थापक श्री तात्या अभ्यंकर यांचा वाढदिवस आहे. मिसळपाव उभारणीत आणि ते एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकप्रिय करण्यात तात्यांचा सिंहाचा वाटा आहे. मिसळपावच्या तात्या अभ्यंकरांना मिसळपावच्या सर्व सदस्यांतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभकामना.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 21623
प्रतिक्रिया 69

प्रतिक्रिया

तात्या तुम्च्या मुळे खुप छान मित्र मैत्रिनि भेटले मि.पा वर ! तुम्हाला वाढदिवासाच्या हार्दिक शुभेच्छा ! नविन वर्श तुम्हाला खुप आनन्दाचे जावो हि मनापासुन शुभेच्छा :)

तात्यांना त्यांच्या नववर्षासाठी शुभेच्छा.

मि पा मुळे आम्ही दैनंदिन आयुष्यातील ताणतणाव मुक्त होतो . तात्या नवीन वर्ष आपणास तसेच मि पा , व सर्व मि पा कराना आनंदाचे जावो.

शुभेच्छा! त्ये एक वाढदिवसानिमीत्त गाण्यागिण्यावर कायतरी लिहून सोडा की .

मिसळपाव संस्थापक तात्या अभ्यंकर यांना यंदा बक्कळ पैका मिळो व त्यातून त्यांच्या सर्व अडचणींचे निवारण होवो या आशिर्वादांसह त्यांचे वाढदिवसानिमित्त्य अभिष्टचिंतन!

In reply to by सुधीर काळे

तात्या, बक्कळ पैसा कमवा आणि 'परोपकारी गोपाळ' होण्याचे सोडून द्या. पैशाची वेळ आली की या जगात कुणी कुणाचा नसतो.

तात्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीत अनेकानेक यश मिळो ही सदिच्छा. तात्या हा अनेक पैलुंनी आणि अनेक गुणांनी संपन्न आहे. मनाचा स्वच्छ आणि विधायक दृष्टीकोन असलेला तात्या हे मला आगळेवेगळे भूषण वाटते. तात्याला यश मिळावे अशी परत एकदा प्रार्थना करतो. मराठीभाषेच्या वैभवाचा इतिहास लिहिला जाईल त्यात तात्यासाठी निश्चितच एक मानाचे पान असेल अशी मला खात्री वाटते.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तात्या, वाढदिवसाच्या आणि नववर्षाच्याही हार्दिक शुभेच्छा...!!! -दिलीप बिरुटे

तात्या, तुला तात्यासाहेब वगैरे म्हणावं इतकं रिलेशन फॉर्मलही नाही...... तुला या वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!!! "प्रतिपश्चंद्र लैखेव वर्धिणू विश्ववंदिता".... तुझी वाट बघतोय रे...... आय डोन्ट बिलीव्ह इन गॉड, बट इफ आय डिड, देन आय वुड आस्क फॉर युवर रिसरेक्शन!!! प्लीज, प्लीज, बी अ फीनिक्स!!!! तुझा फॅन, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

डाम्बीसकाकाशी १०००% सहमत. तात्या हे वर्षे भरभरून सौख्य आनन्द आणि सर्वांगीण भरभराट लाभो ही शुभेच्छा.

श्री.तात्या अभ्यंकर यानी मिपाचे सारथ्य श्री.नीलकांत यांच्याकडे सोपविलेल्या दिवसांतच मी इथे सदस्य झालो असल्याने अन्य ज्येष्ठ सदस्यांना तात्यांच्या मिपावरील ग्रेट इनिंग्जची जी आठवण आहे तेवढी मला नाही; पण असे असले तरी आज वाढदिवसानिमित्य त्यांना आलेल्या शुभेच्छा वाचताना त्यांच्या मिपा संस्थापन काळातील योगदानाची प्रचिती निश्चितच येत आहे. मिपा परिवारातील खेळीमेळीचे वातावरण आणि त्यातील विविधतेच्या अनेकविध रंगछटा हे एक न विसरता येण्याजोगे दृश्य आहे....याचे श्रेय संस्थापक या नात्याने श्री.तात्या अभ्यंकर याना नि:संशय जाते. श्री.अभ्यंकर यांचे वाढदिवसानिमित्य अभिष्टचिंतन करताना त्यांचे आयुष्य असेच उल्हसित आणि रंगमय राहावे अशा शुभेच्छा देत आहे. इन्द्रा

तात्या तुम्ही जगात येतांना जरा लेट केले हो. नाही म्हणजे ३१ तारखेला आले असते तर आख्या जगाने तुमचा वाढदिवस साजरा केला असता. असो. वाढदिवसाच्या दणक्यात शुभेच्छा!

वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!!! माणसाची स्मरण शक्ती किती दुबळी असते ! दोन वर्षापूर्वी महेश मध्ये तात्याचा वाढदिवस साजरा केला होता आणि काल समोरासमोर भेटूनही शुभेच्छा देण्याचे लक्षात आले नाही. नीलकांतचा आभारी आहे.

श्री.तात्या अभ्यंकर तुमचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन. २०११ साली आपणाला नाडीमहर्षींचा कृपाशीर्वाद घडावा ही त्यांना प्रार्थना.

शुभेच्छा तात्या. :) पुढचे व्यक्तिचित्र कधी ?

येत्या वर्षात तात्याचं लग्न होवो आणि आर्थिक भरभराट होवो. झालंच तर एखादा छोटा तात्या देखील येवो. -(शुभेच्छुक) टारझन

In reply to by मी-सौरभ

असेच म्हणतो... येणारे वर्ष तात्यांना विलक्षण यश आणि आनंद देणारे असावे या शुभेच्छा....

तात्यांना वाढदीवसाच्या हार्दीक शुभेच्छा !! तात्या, अठरावं वरीस धोक्याचं बरंका ;) अर्धवटराव

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा! सुख-समाधान, दीर्घायुष्य,उत्तम आरोग्य, मानसिक शांती लाभत राहो!

च्यामारी इतके दिवस मिपावर लुडबुड करतोय. इथला येक बी वळखीचा न्हाई आन मलाबी कुनी वळखीत न्हाई. काय करावं द्येवा? तात्या तुला परत्यक्ष भ्येटलो न्हाई. तुला वाडदिवसाच्या शुभेच्छा. त्यो वरचा फोटु कदीचा हाय? फोटुत तात्या चोच रंगवून (म्हंजी पानगिन खावून वो) बसलेला दिसतुय. म्हंजी जेवन झालं असनार त्याचं. आमचा जेवनाचा चान्स ग्येलाच म्हनायचा.

हे सर्व फॉर्मल आभार मानण्याच्या पलिकडले आहे..! सर्वांच्या शुभेच्छांबद्दल माझ्याकडे शब्द नाहीत..! नीलकांताचा आणि सर्व मिपाकरांचा मी ऋणी आहे.. आपला, तात्या.

मिपाजनक तात्यांना वाढदिवसाच्या आणि नववर्षाच्या खुप खुप शुभेच्छा !! :-)

उशीर झाला थोडा... वाढदिवसाच्या आणि नववर्षाच्या लाख लाख शुभेच्छा.. देव करो नी हे वर्ष "हर दिन दिवाली" होवो तुमच्यासाठी...