Skip to main content

आरती गुरूदत्ताची

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 31/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, शब्दगारवा २०१० मध्ये गुरूदत्ताची आरती गेल्या दत्तजयंतीला प्रकाशीत झालीय. ती येथे देतोय. शब्दगारवा २०१० त आणखीही लेख अन कविता आहेत. त्या आपण नजरेखालून घालाव्यात. (कवितेत सार्थ बदल प्रकाशकाकांनी केले आहेत. त्यांना धन्यवाद.) आरती गुरूदत्ताची आर्त विनवणी करू गुरूदत्ताची ब्रम्हा विष्णू महेशाची आर्त विनवणी करू गुरूदत्ताची ||ध्रू|| ब्रह्मदेव सृष्टी रचितो श्रीविष्णू पालन करितो महेश संहार करी, पुनर्निर्मितीसाठी आर्त विनवणी करू गुरूदत्ताची ||१|| शंख चक्र कमंडलू धरीले हाती खांद्यावरी झोळी, भस्म असे माथी देवा दत्ता भिक्षा घ्या गरीबाघरची आर्त विनवणी करू गुरूदत्ताची ||२|| जटाजूट घन केशसंभार रुद्राक्षमाळा गळाभरोनी गोश्वानासह त्रैमुर्ती अवतरली आर्त विनवणी करू गुरूदत्ताची ||३|| (पुर्वप्रकाशीत : शब्दगारवा २०१०) - पाषाणभेद (दगडफोड्या) २०/१२/२०१०
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1313
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

आरती गुरूदत्ताची आर्त विनवणी करू गुरूदत्ताची ब्रम्हा विष्णू महेशाची आर्त विनवणी करू गुरूदत्ताची वा ..वा..!! छान जमलीय आरती. मन प्रसन्न झाले.