कॄती:- प्रथम बेसन पिठात फक्त मिठ घालून सरसरीत भजाचे पिठ भिजवुन घ्यावे,
त्याची छोटी छोटी भजी तळून घ्यावीत
आता कढईतील जास्त तेल काढून ठेवावे, फक्त फोडणीपुरते तेल त्यात ठेवावे,
मोहरी-जिरे , हिंग, हळद घालून खमंग फोडणी करा त्यात लसुण, मिरची, जिरे,ओले खोबरे पेस्ट चांगली परतून घ्या, आता त्यात चार पाच वाट्या पाणी घाला, चांगले उकळू द्या, गुळ,मिठ घाला चवीनुसार,
आमसुले टाका, परत चांगले उकळू द्या, आता त्यात तळलेली भजी घाला, कोथिंबीर घाला, जर आमटी पातळ वाटली तर थोडेसे बेसन पिठ कालवून आमटीला लावा.
गरम गरम भजाची आमटी तय्यार.
येवढ्या सुंदर चकण्याचे (तेही ३१ च्या आदल्या रात्री) केलेले वाटोळे आवडले नाही.
निवेदितातैचा णिषेध ! आणि हि पाकृ ह्या आठवड्याला न छापण्याबद्दल सम्राटला कळवले आहे ;)
प्रतिक्रिया
ही घ्या कॄती--
येवढ्या सुंदर चकण्याचे (तेही
परा---तु़झ्यासाठी थोडी भजी
In reply to येवढ्या सुंदर चकण्याचे (तेही by परिकथेतील राजकुमार
छान छान.
निवेदिता ताया.... ह्या बरोबर
वा!
छान
दम !!
ओ !
नाही. गोळ्याच्या आमटीत
In reply to ओ ! by विनायक बेलापुरे