Skip to main content

भजाची आमटी---

लेखक निवेदिता-ताई यांनी गुरुवार, 30/12/2010 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य:- एक वाटी बेसन पिठ, लसुण, मिरची, जिरे,ओले खोबरे पेस्ट, भजी तळण्यासाठी तेल, कोथिंबीर बारी़क चिरलेली, मिठ चवीनुसार्,दोन आमसुले, गुळ थोडासा.

वाचने 6964
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

कॄती:- प्रथम बेसन पिठात फक्त मिठ घालून सरसरीत भजाचे पिठ भिजवुन घ्यावे, त्याची छोटी छोटी भजी तळून घ्यावीत आता कढईतील जास्त तेल काढून ठेवावे, फक्त फोडणीपुरते तेल त्यात ठेवावे, मोहरी-जिरे , हिंग, हळद घालून खमंग फोडणी करा त्यात लसुण, मिरची, जिरे,ओले खोबरे पेस्ट चांगली परतून घ्या, आता त्यात चार पाच वाट्या पाणी घाला, चांगले उकळू द्या, गुळ,मिठ घाला चवीनुसार, आमसुले टाका, परत चांगले उकळू द्या, आता त्यात तळलेली भजी घाला, कोथिंबीर घाला, जर आमटी पातळ वाटली तर थोडेसे बेसन पिठ कालवून आमटीला लावा. गरम गरम भजाची आमटी तय्यार.

येवढ्या सुंदर चकण्याचे (तेही ३१ च्या आदल्या रात्री) केलेले वाटोळे आवडले नाही. निवेदितातैचा णिषेध ! आणि हि पाकृ ह्या आठवड्याला न छापण्याबद्दल सम्राटला कळवले आहे ;)

करून बघीतली पाहीजे.

बरेच दिवसानी आणि सोपी पाकृ दिलीस. करून बघायलाच पाहिजे.

छान्,मस्तच

अरे , सुग्रण-भगीणी मंडळाच्या कार्यकर्तींनो , जरा दम घ्या की !!

याला गोळ्याची आमटी म्हणतात ना ?

In reply to by विनायक बेलापुरे

नाही. गोळ्याच्या आमटीत वाटलेल्या डाळीचे गोळे न तळता आमटीत घालून उकळी काढतात .