नेमक काय करायच असते?
एकच चुक परत परत कशी काय होते बॉ?
असु दे असु दे.
शुन्य काल आहे.
आधी ४ दिवस ऑनसेट.
नंतर २ दिवस ऑफसेट.
शांत रहा.
नंतर नेहमीचे आहेच की.
'अमका' चा लेख वाचला आहेस ना.
एका आठवड्याकरता गुड बॉय राहायचे ठरले ना?
___________________________________________________
"किती रुपये लागले"?
थांब हां. बघतो.
"म्हणजे भाव न करताच कांदे आणलेत"?
असु दे हां. बघतो खिसा तपासुन.पन्नास ची नोट दिली होती. तीस रुपये दिलेत.
"क्काय? म्हणजे सडका माल दिला असणार. काल केळी स्वस्त आणलीस. पण दोन पण हाताला लागली नाहीत. एवढी वाईट होती."
इथे चेहेर्यावर तुच्छता आणि करुण भाव ह्याचे मिश्रण.
कांद्याची पिशवी तपासली जाते.
अगदी १ नंबर माल.
"कमाल आहे. कमीत कमी ४० रुपये लागले असते. नक्कीच प्यायलेला असेल"
असु दे असु दे.
शुन्य काल आहे.
आधी......
___________________________________________________
"तुझ्या अंगावर परत जुनेच सेट का दिसताहेत"?
म्हणजे?
"अरे, चार नविन सेट आणले होते ना. परत जुनेच का दिसताहेत"?
मला माहीत नाही.
"नवे कुठे गेले"?
मला माहीत नाही.
( आयला मी गोदान केले आहे. रक्तदान केले आहे. जमेल ते दान केल आहे. पण अंडी आणि गंजी दान केल्याचे स्मरत नाही. आणि सेमिनार झाल्यावर स्मृती चिन्ह म्हणुन माझ्याकडे मागितल्याचे पण काही आठवत नाही)
असु दे. असु दे.
शुन्य काल आहे.
आधी....
___________________________________________________
" काय करणाराहेस काका"?
काय करायचे असते.
" आता मी तुला सांगायचे. कमालच झाली म्हणायची"
खुप हेवी शेड्युल आहे. कस काय जमणार काही समजत नाही.
"ठरव. आणि कळव. आम्ही सर्व जण येउ."
बघतो.
"बघतो नाही. नक्की ठरव. परत परत येत नाही असा दिवस".
पण २९ लाच करायला पाहीजे का? सात आठ दिवसांनी बोलवतो की.
"नाही नाही. तो दिवस महत्वाचा."
महत्वाचा दिवस सात दिवसांनी होता ग पुतणे.
" काही पण सांगु नकोस हां"
तुला माझी अवस्था विसरलीस का?
"त्याने तुला काही ही फरक पडला नाही हे मला नक्की माहीत आहे. प्लास्टर ऑर नो प्लास्टर. यु वेअर देअर. ओके."
हॅहॅहॅ.
___________________________________________________
सध्या शुन्य काल चालु आहे.
२९ ला लग्नाची सिल्वर ज्युबिली आहे.
नेमक काय करायचे असते हो?
___________________________________________________
प्रतिक्रिया
इतकी काळजी
सिल्व्हर जुबिली!!!
अनुमोदन
अहमदाबादेचा फ्लाट काकुंचा
वन बिएचके आहे काय? असल्यास,
जीव
नाही हो, मुंबईपेक्षा
स्टुडीओ
भरपूर शुभेच्छा
सिल्वर ज्युबिलीच्या दणकुन
बाब्बोय!
काय करायचं अन काय नाही, हे
तुम्हाला दोघांनाही
अभिनंदन आणि शुभेच्छा! दक्षिण
मास्तर या आमच्या
अवघड आहे !!
छान...अजून एक अशीच जुबली होऊ
मास्तर नक्की काय केले मग
आर्रर्रर्र उशिर झाला. मास्तर
व्यनीच करा.