Skip to main content

नेमक काय करायच असते?

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 28/12/2010 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
एकच चुक परत परत कशी काय होते बॉ? असु दे असु दे. शुन्य काल आहे. आधी ४ दिवस ऑनसेट. नंतर २ दिवस ऑफसेट. शांत रहा. नंतर नेहमीचे आहेच की. 'अमका' चा लेख वाचला आहेस ना. एका आठवड्याकरता गुड बॉय राहायचे ठरले ना? ___________________________________________________ "किती रुपये लागले"? थांब हां. बघतो. "म्हणजे भाव न करताच कांदे आणलेत"? असु दे हां. बघतो खिसा तपासुन.पन्नास ची नोट दिली होती. तीस रुपये दिलेत. "क्काय? म्हणजे सडका माल दिला असणार. काल केळी स्वस्त आणलीस. पण दोन पण हाताला लागली नाहीत. एवढी वाईट होती." इथे चेहेर्‍यावर तुच्छता आणि करुण भाव ह्याचे मिश्रण. कांद्याची पिशवी तपासली जाते. अगदी १ नंबर माल. "कमाल आहे. कमीत कमी ४० रुपये लागले असते. नक्कीच प्यायलेला असेल" असु दे असु दे. शुन्य काल आहे. आधी...... ___________________________________________________ "तुझ्या अंगावर परत जुनेच सेट का दिसताहेत"? म्हणजे? "अरे, चार नविन सेट आणले होते ना. परत जुनेच का दिसताहेत"? मला माहीत नाही. "नवे कुठे गेले"? मला माहीत नाही. ( आयला मी गोदान केले आहे. रक्तदान केले आहे. जमेल ते दान केल आहे. पण अंडी आणि गंजी दान केल्याचे स्मरत नाही. आणि सेमिनार झाल्यावर स्मृती चिन्ह म्हणुन माझ्याकडे मागितल्याचे पण काही आठवत नाही) असु दे. असु दे. शुन्य काल आहे. आधी.... ___________________________________________________ " काय करणाराहेस काका"? काय करायचे असते. " आता मी तुला सांगायचे. कमालच झाली म्हणायची" खुप हेवी शेड्युल आहे. कस काय जमणार काही समजत नाही. "ठरव. आणि कळव. आम्ही सर्व जण येउ." बघतो. "बघतो नाही. नक्की ठरव. परत परत येत नाही असा दिवस". पण २९ लाच करायला पाहीजे का? सात आठ दिवसांनी बोलवतो की. "नाही नाही. तो दिवस महत्वाचा." महत्वाचा दिवस सात दिवसांनी होता ग पुतणे. " काही पण सांगु नकोस हां" तुला माझी अवस्था विसरलीस का? "त्याने तुला काही ही फरक पडला नाही हे मला नक्की माहीत आहे. प्लास्टर ऑर नो प्लास्टर. यु वेअर देअर. ओके." हॅहॅहॅ. ___________________________________________________ सध्या शुन्य काल चालु आहे. २९ ला लग्नाची सिल्वर ज्युबिली आहे. नेमक काय करायचे असते हो? ___________________________________________________
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4197
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

इतकी काळजी बरी नव्हे ओ मास्तर !! अजुन बाकीचे सहा जन्म जायचे आहेत !! बाकी सिल्वर (कृपया कशावर ? असे विचारुन अपमान करुन घेउ नये .) ज्युबिलीच्या दणकुन शुभेच्छा !!

सिल्व्हर जुबिली!!! ??? काकूंचे नाव 'ब्रेव्हरी अवॉर्ड्स' साठी नॉमिनेट करत आहे. बाकी, आम्ही काय तुम्हाला सल्ला देणार? कप्पाळ!!! तुम्हीच साजरी करा आणि मग ज्ञान आम्हाला वाटा!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

काकूंना अ‍ॅवॉर्ड मिळालंच पाहिजे. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा.

जीवावर उठलास रे निळ्या?

In reply to by विनायक प्रभू

नाही हो, मुंबईपेक्षा अहमदाबादेचा म्हणजे स्वस्तातलं गिफ्ट नाही का? ;-) हार्दिक शुभेच्छा!

स्टुडीओ अपार्ट्मेंट आहे. कधी अहमदाबादेला जायचे असेल तर सांगा बिका. तुमच्या 'टी' ला सुद्धा उपयोगी पडेल. रेंट मागणार नाही. तुम्ही मैतर ना माझे.

बिकांशी सहमत.. २५ पट पुढचा प्रवास केलेल्याला आम्ही काय सांगणार! ;) दोघांनाही भरपूर शुभेच्छा देतो! :)

In reply to by प्रभो

प्रभ्याच्या प्रतिसादाचं शिर्षक पाहिलं आणी दचकलो ना... म्हणलं दणक्यात साजरी करा काय सांगतोय हा गडी? मास्तुरेऽऽ... शिलवर ज्युब्बल्लीच्या हार्दिक शुभेच्छा! :) काय करायचं अन काय नाही, हे आम्ही पामरांनी तुम्हाला सांगायचं म्हणजे काजव्यानं सुर्याला प्रकाश दावण्यासारखं झालं की वोऽऽ..... एक आयड्याची कल्पना: सहजच गंमत म्हणून दोन्ही हातावर प्लॅस्टर चढवून पहा..नाहीतरी 'अरे इतिहास जागवलाच पाहिजे' वगैरे आपण ऐकत असतोच. :)

In reply to by धमाल मुलगा

काय करायचं अन काय नाही, हे आम्ही पामरांनी तुम्हाला सांगायचं म्हणजे काजव्यानं सुर्याला प्रकाश दावण्यासारखं झालं की वोऽऽ... +१

तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा! काकूंच्या आवडीची साडी घ्या, ट्रिपला जाऊन या किंवा त्यांची आवड काय असेल त्याप्रमाणे.

अभिनंदन आणि शुभेच्छा! दक्षिण भारतात कुठंतरी, लग्नाला २५ वर्षं झाली की पुन्हा (एकमेकांशीच) लग्न लावतात असे ऐकून आहे.

मास्तर या आमच्या अहमदाबादेत. प्यारटी करु. शिल्वर जैंतीच्या हार्डडिस्क शुभेच्छा

आर्रर्रर्र उशिर झाला. मास्तर उशिराने का होईना पण तुम्हाला आणि काकुना सिल्वर ज्युबिलीच्या शुभेच्छा !!! बिका सारखच काय केलत हे जाणुन घ्यायचय, तेवढच आम्हा पामरांना मार्गदर्षन. (व्यनी केलात तरी चालेल. :) )