कथा उत्तम आहे. संस्कृतप्रचुर शब्दप्रयोग असल्याने एकदम जुन्या संगीत नाटकाची आठवण झाली.
आशय बघता कथेला सुंदर म्हणता येईल. पण जर यापूर्वी घडलेल्या काही घटना बघितल्या तर जुने दळण दळल्यासारखे वाटत आहे.
(विवादाSलिप्त)
पुण्याचे पेशवे
पण लागतेच ना?
या जालविश्वात प्रत्येक त्रिशंकूमागे कित्येक प्रतित्रिशंकू असतात, प्रत्येक इंद्रामागे कित्येक प्रति-इंद्र असतात. तीच तर गंमत असते.
प्रतिकृती आहेत, असू शकतात, हे सर्वज्ञात असले तर मग प्रतिमाभंग होत नाही.
बाकी जीएराठी वाचताना जरा गुदगुल्या होतात, हे निश्चित.
म्हणून गेलेत 'निंदकाचे घर असावे शेजारी', पण इथे मिपा वरची स्थिती त्याहीपेक्षा पुढची निघाली 'निंदकाचा पाट मांडला माजघरी' अशी आहे!
रावसाहेब, तुम्ही इथे रहाच हो! साला मजा येतो एकेक लेख वाचताना.
'मिपा' सारखी एक यःकश्चित टपरी ती काय, त्यात बसलेली पागोटं, मुंडासेवाली येडीबागडी माणसे ती काय आणि पंचतारांकित हाटेलातून येणारी काही माणसे त्या टपरीची एवढी धास्ती काय घेतात अन त्यातल्या खेडुतांना बिचकून काहीबाही लिहीत काय सुटतात, छ्या.. सारंच 'सुरस आणि चमत्कारिक'!! ;)
(स्वगत - एक ओवी टाकावी की काय? :? )
चतुरंग
चतुरंग यांचा प्रतिसाद वाचून गोविंदाचा एक सिनेमा आठवला... तो कादरखान च्या पंचतारांकित हॉटेल समोर एक टपरी बांधतो. आणि कादरखान ती टपरी पाडायला जंग जंग पछाडतो.... :))
गोष्टीबद्दल काय बोलावे? अश्या प्रकारांमुळे टपरी ची शान वाढते आहे हे मात्र नक्की.
बिपिन.
अत्युत्तम आशय.१०००% टक्के कथाकाराशी सहमत.
फक्त वास्तवाच्या जवळ आणण्यासाठी
कथेला एक छोटसं एक्स्टेंशन देतोय इथं; तेव्हढं पाहुन घ्या एकदा:-
"...(प्रत्यक्षातला)भ्रातृभजन मात्र फारच धीट होता.निशापती म्हाराज व सुभाषिणीदेवीं यांच्या कृष्ण,डबकज कारस्थानाचा
वेळीच अंदाज आल्यानं तो सावध झाला. सुभाषिणीदेवींनं आणखी काय करायच्या आतच तो त्यांच्या तावडीतुन निसटला तो
कायमचाच.
त्यानं हिम्मत करुन ते राज्य सोडलं, आणि नवीन राज्य उभं केलं स्वतःच्या हिमतीनं आणि हितचिंतकांच्या मदतीनं.
त्याचं राज्य खरच चांगलं राज्य होतं. त्यात जनतेला किंमत होती. प्रशासकाच्या दडपशाहीचा दंडुका नव्हता.
जनता त्या राज्यात सुखेनैव नांदत होती.
त्याच्या नवीन राज्याची कीर्ती दूर दूर पसरली . अगदि निशापती राजापर्यंत सुद्धा!आणि त्या राजाला बघवेना.
निशापती राजाचा व्हायचा जळफळाट्.आणि मग एक दिवस त्या कुटील निशापती राजानं तिथंही,भ्रातृ भजनाच्या राज्यात(मिपावर) आपली "प्रतिरुपं" पाठवली.(तुम्हाला पाठवलं.)
त्या लोकांत भेद पाडण्यासाठी! ती प्रतिरुपं भ्रातृ भजनाच्या राज्यात जाउन आपली अफाट प्रतिभाशक्ती वापरुन
लोकांना विचलित करण्याचा प्रयत्न करु लागली. आपल्या वाणीतुन भ्रातृभजनाविरुद्ध गरळ ओकु लागली.
त्यांना ह्याचही भान राहिलं नाही की हे सगळं दिसत असुनही भ्रातृभजनानं त्यांना जिवंत ठेवलय.
बोलु दिलय. "सुरस आणि चमत्कारिक" कथा-कविता लोकांच्या "आसपास" उभं राहुन ती प्रतिरुपं गाउ लागली.
पण भ्रातृभजनाचं राज्य तसच राहिलं. अभेद्य! "मि" मी म्हणणार्यांना "पा"णी पाजणं अशा एकीमुळच त्या राज्याला जमलं.
...."
"
थोडाक्यात मूळ कथा आणि माझा प्रतिसाद ह्यांचा सारांशः-
नमोगत राज्य आणि त्येचा राजा निशापती(तुमचा "प्रशासक") म्हंजे तुमी नमोगत वाले(जे इथं येउन सरळ-साध्या लोकांना छळु लागलेत.)
त्येचं प्रतिरुप म्हंजे त्येची जिथं तिथं वकीली करणारे, आणि इतरांना आपल्या लिखाणानं हाणणारे लेखकासारखी माणसं.
आणि कथेतलं आणखी एक पात्र भ्रातृ भजन(ज्याचा विवेक जागा आहे) म्हंजे ज्यांना नमोगतावरच विचित्र वातावरण्,
लोकशाहीचा अभाव पटला नाही आणि म्हणुन ह्या संकेतस्थळासारखी झणझणीत स्थळं(म्हणजे दुसरं,जनतेचं राज्य) राज्य निर्माण करणारे.(म्हणजे सरपंच आणि मंडळी)
तुम्हाला असच म्हणायचय ना लेखकसाहेब्,स्वतःबद्दल आणि नमोगताबद्दल?
तो राजा कपटी आहे हे खरच; पण तो राजा "कोण" आहे ते बघा जरा.
अस्सल मिपाकर कधीच तो राजा असु शकणार नाही.
त्या राजाच्या कचाट्यातुन सोडवणारा भला माणुस (भतृ भजन)म्हणजे मिपाचा संस्थापक.
संजोपराव;
सहमत...
१०००% सहमत आम्ही या कथेशी.
उत्तम कथा! अत्युत्तम आशय!!
आपलाच,
अपुर्ण कथा पुर्णत्वाला नेणारा
मनोबा
लोकशाहीचा अभाव पटला नाही आणि म्हणुन ह्या संकेतस्थळासारखी झणझणीत स्थळं(म्हणजे दुसरं,जनतेचं राज्य) राज्य निर्माण करणारे.
इथल्या जुन्या चर्चा वाचल्यात तर लक्षात येईल इथही लोकशाही नाही. जनरल डायर नावाचा जो पोरकटपणा चालतो तो मला तरी पटत नाही.
"हुबेहूब, फक्त, कसब, कर्तबगार, मुत्सद्दी, नजिक, रहा, फिरवू"
वरील असंस्कृत आणि अप्राकृत भाषेतील शब्दप्रयोगांमुळे लेखाचा गाभा हरवला आहे. रसभंग झाल्याने आमचे मुखकमल तुरट झाले आहे.
व्यंकट
संजोपराव ...
लेखनाच्या भाषेसाठी कथा एकदम आवडली बघा.
बाकी तुम्ही म्हणता ते खरंय ... जनता फक्त 'झिदाबाद' किंवा 'मुर्दाबाद' म्हणणार. तसं म्हणायला लावणारे वेगळेच असतात.
राज्याला आपल्या लेखणीने रिझवणार्या विदुषकाची नितांत गरज असून त्याचे विदुषकी चाळे सहन करण्याचा मंत्र आताच महाराजांना दिलेला आहे. त्यांना तो रुचेल अशी आशा करते.
आपली,
सुभाषिणीदेवी.
उपहासाने का होईना आपल्या तोंडून अस्मादिकांसाठी सुभाषिणी हा शब्द बाहेर यावा हेच कोडे सध्या पडले आहे. :O
कथेच्या भाषेवर मला गो ना दातार, शशी भागवत , काही प्रमाणात जी ए यांचा प्रभाव जाणवतो. सत्तेबद्दल, सत्ताकेंद्राबद्दल भाष्य असे त्या कथेचे स्वरूप आहे. संस्कृतप्रचुर भाषा वापरण्याचा लेखकाचा प्रयत्न लक्षणीय आहे.
पण प्रस्तुत संकेतस्थळावरच्या सद्य परिस्थितीच्या संदर्भाखेरीज एक निखळ कलाकृती म्हणून ही कथा उभी रहाणार नाही. कथानकाचे, आशयाचे वजन आणि मुख्य म्हणजे त्याद्वारे सत्ताव्यवहाराबद्दल, सत्तधीशांच्या बिहेवियरबद्दलचे ऑर्वेलसदृष सत्यदर्शन या बाबतीमधे कथा बरीच फिकट आहे. म्हणजे मग कथेला संदर्भ उरतो केवळ प्राप्त परिस्थितीचा. या गोष्टीमुळे कथेच्या आस्वादामधे मोठाच अडथळा निर्माण होतो. कथालेखकाच्या उद्दिष्टाबद्द्ल संभ्रम वाटतो आणि याप्रकारच्या प्रयत्नांमधे नक्की काय श्रेयस असू शकते याबद्दल प्रश्न निर्माण होतात.
संजोप राव, तुम्हाला ह्यातुन नक्की काय साधायचे आहे ते कळेल का? तुम्हाला इथल्या बरेच काळ चाललेल्या (आणि संपायची चिन्हे नसलेल्या) आणिबाणीवर ताशेरे ओढायचे आहेत असे आधी वाटले होते. पण असा सूर तुम्ही कधी मनोगत.कॉम इथल्या हुकुमशाही विषयी लावला नाहीत. इथे मात्र तुमच्या टीकेला चेव चढला. असे का बरे? तुमच्या हेतुंविषयी आता शंका येऊ लागली आहे.
हगवण झाली हे तर स्पष्ट आहे आता भिंतीवर किती रेषा उठतायत बघु. होउन जाउ दे.
जरा कौतुक काय केले तर आपणच मराठी साहीत्य विश्वातील असामान्य लेखक समजुन, आता शल्य केवळ तात्या माझ्यापेक्षा जास्त पॉप्युलर कसा. :-(
आय मीन कम ऑन वयाची ५० शी आली व अजुनही असे हेवेदावे, खाजवुन खरुज काढणे, तात्याला माझ्यासारखे क्षुद्र लेखत नाही ना म्हणजे सहाजिकच तुम्ही सगळे बालबुद्धी, थांबा एकेकाचे नाव घेउन इथेच कुंथतो.
परमेश्वर न करो कुण्या वैर्यावर पण इतकी वाईट पाळी न येवो जशी अवस्था मुळ लेखकाची झाली आहे.
तात्याला नावे ठेवता ठेवता स्व:ताचा प्रतितात्या झाला ह्यालाच का पोएटिक जस्टीस म्हणतात? [का ह्याच साठी केला होता अट्टहास ;-) ]
एक लक्षात घ्या रावसाहेब जरी प्रतिमा अनेक असल्या तरी कौशल्य व प्रतिभा पण नक्की आहे. आणी आता तुम्ही पण घ्या पाहू नवीन प्रतिमा कारण तुमची प्रतिभा निष्प्रभ होते आहे हे वादातीत.
अवांतर - कानावर पडलेले शब्द, कोण म्हणले असेल बरे हे -
चक्क तिरपा हिणकस प्रतिसाद न देउ शकलो मी श्री. रामदास [कवितेचा लांबचा प्रवास] यांना व ते सदस्य आज मिपामुळे लिहता झालो म्हणतात. आता पुढे त्या सदस्याचे काही खरे नाही लिहु दे तर घेतोच त्याला.
कलाबतूपूर्ण हा शब्द विसंगत भासतो. संस्कृत भाषेत फारसी शब्द ?
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
आमचे स्पष्ट मत मागाल (कशाला उगाच?) , तर आम्हाला सदर कथेची मांडणी, त्यातील आशय अतिशय रुचला.
संजोपरावांचे लेखन आम्हाला नेहमीच विचार करायला लावते. हेच त्यांचे यश आहे.
पण या सगळ्याचे सूत्रधार आम्हीच. या प्रतिमा आमच्याच बाहुल्या आहेत भ्रातृभजना, आमच्याच सावल्या. आम्ही जे वदतो, त्याला या बाहुल्या दुसर्याच नावाने अनुमोदन देतील. आम्ही एखाद्याची प्रशंसा करतो, त्यावर या बाहुल्या स्तुतीसुमने उधळतील. आम्ही एखाद्याला दूषण देतो, त्यावर या बाहुल्या अग्निवर्षाव करतील.. ही सगळी आमचीच क्रीडा आहे. आम्ही प्रजाजनांना संबोधित करत असताना आमच्या नावाच्या गर्जना करणारे प्रजाजन कोण असतात भ्रातृभजना? ते दुसर्या नावाने वावरणारे आम्हीच! "
ह्याचा संबंध कुणी तात्याशी जोडला आहे प्रतिसादांत. परंतु आमच्या मते, रावसाहेबांचा निर्देश हा अष्टविनायकांकडे आहे, हे स्पष्ट आहे. नव्हे ह्या जालविश्वात काही थोडे लोकच इतकी बुद्धिमत्ता बाळगतात. त्यांना आपण क्कुठल्या नावाने क्कुणाला काय म्हटले होते, हे लक्षात ठेवण्यासाठी अशा प्रखर बुद्धिमत्तेची नितांत आवश्यकता असते.
आम्हाला विशेषतः सुभाषिणीदेवींचे खालील वाक्य अतिशय आवडले.
तू भाग्यवान आहेस भ्रातृभजना. उद्या तुझा विवेक निष्कलंक असेल. पण माझे काय भ्रातृभजना? माझे स्मरण पुसणारा लोलक मी कुठून आणू?
प्रत्येक कपटी आणि कुटील व्यक्तीच्या निकटतम सल्लागाराला अंतिम क्षणी भेडसवणारा हा प्रश्न. वाल्या कोळ्याच्या पत्नीने योग्य वेळी त्याच्या पापांपासून फारकत घेतली त्यामुळे तिला हा प्रश्न पडला नसेल. पण पत्रदायकाच्या गृहिणीचे काय ? अष्टविनायकाची विविध रूपे एकमेकांची पाठ आपल्या आठही सोंडांनी गुप्तपणे खाजवताना बिचार्या रिद्धी आणि सिद्धी काय करत असतील ? त्यांनाही वेगवेगळी रूपे (आठ दुणे सोळा) घेणे आवश्यक ठरतेच.
- भ्रातृभजन
प्रतिक्रिया
हा हा हा....
:)
प्रतिकृती वावरवण्याची प्रतिभा
तुकाराम महाराज
मला एक...
अप्रतिम कथा...
मन
रसभंग
वेगळी ष्टाईल..
हाहाहाहाहा!!!!!!
माझे मत
मागील काही दिवसातील
संजोप राव,
ये तो होना ही था. सो प्रेडीक्टीबल!!!
कलाबतूपूर्ण
स्पष्ट मत
शब्द बरेच
लहान