सतत फटकारत ,
कधी कुरवाळत
नि बळजबरीने
मुद्दाम उत्साहाचे सलाईन....
छान. बर्याचदा चाकोरीतलं चित्र जपण्यासाठी असली सलाईनं लावून घेऊन माणूस धडपड करत राहतो. घरासाठी धडपडणार्या आणि तरीही उपेक्षित राहिलेल्या स्त्रिया ही तर फार जुनी समस्या.
किती वर्ष झाली
किती काळ गेला
कुठे अपेक्षा संपतात नवरोबाच्या
पोरांच्या नातेवाईकांच्या
संसाराचे ओझे ..!
कर्तव्याचे ओझे ..!!
ह्याच्या पुढे कर
त्याच्या पुढे कर
करण्याचे ओझे
हु...श्श ..!!
कंटाळून गेलेय आता .
ह्या सुखी {?} संसाराला
ह्या कडव्या वरुन एक खत्तरनाक विनोद आठवला. इच्छुकांनी व्यनी करावा.
>> तुमच्याबाबतीत असेच घडतेय काहो ...??
>> सांगाल का तुमच्या मनातले हितगुज ....????
मनातले हितगुज .. ?
आत ते तरी कोठे माझे राहिलेय .. ?
त्यालाही साठीची काठी लागते चालायला ..
म्हणा कोण चालु देतय आता त्याला ?
ती होती तेंव्हा हक्काचे कोणी तरी होते ..
थरथरत्या मनाला थरथरत्या हाताचेच बंध होते ..
चष्मा ही दुभंगलाय आता, कदाचीत त्यामुळेच
जीवनाचे चित्र ही दुभंगलेलेच वाटतय मला
"माझे जग" नाव असलेल्या माझ्या घरात
ही गॅलरीच ती काय आपलेपनाने साथ देतेय फक्त..
लाकडाच्या मोडकळीस आलेल्या खुडचीपलीकडील जग
मन केंव्हाच विसरले आहे ..
ती फसवली गेली कायम .. आणि मी ?
मी विसरलो गेलो कायम .. आनंदाच्या क्षणातून ..
नात्यातून.. घरातून .. मनातून ...
आताशा .. मी ही विसरत चाललोय..
घरातल्या अस्तित्वाबरोबरच त्याबाहेरील रस्ते ..
नात्यांचे ओझे .. आणि त्याखाली गुदमरलेले मनाचे घरटे..
पुसटशे आठवते आहे फक्त तीचे आपुलकीचे दोन शब्द ..
लवकर या ...........................................
---- शब्दमेघ... २७ /१२/२०१०
सतत फटकारत , कधी कुरवाळत नि
छान !
सुंदर कविता. किती वर्ष
>> तुमच्याबाबतीत असेच घडतेय