शाळेत असतांना ज्या कविता आपल्याला आवडावयाच्या त्यातील काही उदाहरणे
१] देवी दयावती दवडसि दासाची दु:खदुर्दशा दूर
पापाते पळवितसे परमपवित्रे तुझा पय:पूर !
मोरोपंत
२] कुरुकटकासि पहाता,
तो उत्तर बाळ गडबडला,
स्वपरबळाबळ नेणुनि,
बालिश बहु बायकांत बडबडला !
मोरोपंत
लहानपणी द द ,प,प,ब,ब, यांची पुनरावृत्ति मजेदार वाटावयाची. शिवाय पाठ करावयालाही सोपे. माध्यमिक शाळेत अलंकार म्हणून उपमा, उत्प्रेक्षा व्याकरणाच्या एक भाग म्हणून शिकवावयास सुरवात केली आणि सगळी मजाच गेली. सदाशिव पेठेत बरीच वर्षें काढल्यामुळे कोणत्याही विषयावर ( विशेषत : आपला अभ्यास नसलेल्या ) ठोकून मत द्यावयाचा अधिकार मला आहेच. तेंव्हा माझे असे ठाम मत आहे कीं लहान मुलांना मराठीची गोडी लावावयाची असेल तर अभ्यासक्रमात व्याकरण हा विषय ठेवावा पण परिक्षेमध्ये अजिबात ठेवूं नये. व्याकरणाची धास्ती न घेता मुले चांगले वाङ्मय वाचू लागली तर केवळ वाचनानेच मुलांचे मराठी सुधारेल व आवड वाढल्याने मराठीला बरे दिवस येतील. ( हा चर्चेचा विषय करावा; अनेक "तज्ञ" भाग घेऊ शकतील !) असो. तर काय सांगत होतो की हा " अनुप्रास " लहानपणापासून ओळखीचा.
जेव्हा एक किंवा अनेक व्यंजनांची आवृत्ती होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. याचे तीन प्रकार; [१] छॆकानुप्रास, [२] वृत्यनुप्रास, [३] शब्दानुप्रास. पहिला व तीसरा फ़ार प्रचारात नाहीत. आपण नेहमी बघतो तो वृत्यनुप्रास. याची आणखी उदाहरणे :
[३] हंसे मुक्ता नेली मग केला कलकलाट काकांनीं ,
हाकानी नभ भरले जाय सुरांच्याही नाद हा कानीं !
म्रोरोपंत
[४] डुमडुमत डमरु ये,खणखणत शूल ये,
शंख फ़ुंकीत य़ॆ, येइ रुद्रा !
प्रलयघनभैरवा, करित कर्कश रवा
क्रूर विक्राळ घे क्रुध्द मुद्रा !
कडकडा फ़ोड नभ, उडव उडुमक्षिका,
खडबडवि दिग्गजां, तुडव रविमालिका,
मांड वादळ,उधळ गिरि जशी मृत्त्तिका,
खवळवीं चहुकडे या समुद्रां !
भा.रा.तांबे.
अनुप्रासात व्यंजनांची पुनरावृत्ती होत असते, स्वर वेगवेगळे असले तरी चालतात.
अनुप्रासाचे एक सुंदर उदाहरण श्री. विसुभाऊ यांनी दिले आहे.
दहावीच्या अभ्यासक्रमात 'अनुप्रास' होता. तेव्हाचे ठरलेले उत्तर -
गारा, वारा, पर्जन्यधारा यांचा एकच मारा होऊन "रमावरा, आता तुम्हीच तारा!" असे म्हणत वर्हाडी मंडळी सैरावैरा पळत सुटली.
तसेच श्री. वाचक्नवी यांनी दिलेली शब्दानुप्रास (किंवा लाट्यानुप्रास) याची ही उदाहरणे :
१. जान्हवीसुतासवें लढावयास संगरीं ।
चक्र चक्रपाणि पाणिमाजिं तो सदा धरी ॥ (तो चक्रपाणि पाणिमाजीं चक्र धरी.)
२. पद्म पद्मलोचना घेउनी करीं जना । (पद्मलोचना स्त्री करीं पद्म घेउनी..)
३. किंतु कर्ण भेदि नीलकंठकंठज स्वर। (नीलकंठ मोर, कर्णभेदि स्वर कंठातून काढतो.)
शरद
वाचने
6068
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
ॐ पद्मानने पद्मिनी पद्मपत्रे
अनुप्रास मिपाकर
In reply to ॐ पद्मानने पद्मिनी पद्मपत्रे by शुचि
मस्त
In reply to अनुप्रास मिपाकर by सहज
मस्त!
च्यामारी शाळेत असताना ह्या
>>कधी व्याकरण योग्य
In reply to च्यामारी शाळेत असताना ह्या by पिंगू
अनुप्रास
थोडेसे अवांतर
लेख आवडला.
शाळेत व्याकरण "अभ्यास" म्हणून
In reply to लेख आवडला. by स्वाती२
रामोराज मणी सदावीजयते
या श्लोकावरून त्याची एक गंमत
In reply to रामोराज मणी सदावीजयते by प्राजु
छान लेख
पदरावरती जरतारीचा मोर नाचरा