Skip to main content

माहिती हवी आहे--कुळीथाचे पीठ

लेखक प्रदीप यांनी रविवार, 26/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
पिठले करण्यासाठी वापरायचे कुळीथाचे पीठ घरीच कसे करावे, ह्याबद्दल माहिती हवी आहे. धन्यवाद.

वाचने 5990
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

In reply to by रेवती

मी रहातो तेथे कुळीथाचे तयार पीठ मिळत नाही, कुळीथ मात्र मिळतात, म्हणजे पिठले करायचे असेल तर पीठ घरी करणे आले. म्हणून विचारतोय.

In reply to by प्रदीप

अर्रर्र! असं असेल तर मिक्सरमध्ये करून बघता का? अर्थात मिक्सर दणकट पाहिजे. आपण हिरव्या देशात असाल तर एक दोन मिक्सर बर्‍यापैकी प्रतिचे माहित आहेत ते कळवू शकेन. माझ्याकडच्या मिक्सरमध्ये भाजलेली मुगाची डाळ (कोरडी) बारीक होते.

कुळीथाचे पिठले!! आई ग.. आजीची आठवण आली रे.. कुळीथाचे पिठले अन गरम गरम नाचणीची भाकरी.. स्वर्गच जणू!!

In reply to by स्वानन्द

विंग्रजीमधे माहिती पाहीजे असल्यास पुढील जोडणीला टिचकी मारी. http://www.facebook.com/pages/Horse-gram/112667208747290?v=info (विंग्रजीमधुन लौकर कळेल बहुधा) ;) पिठल्याची पाकृ हवी आहे का? http://www.globalmarathi.com/BlogDetails.aspx?BlogId=557143527060565874… उसळीची पाकृ हवी आहे का? http://chakali.blogspot.com/2008/05/blog-post.html

In reply to by चिंतामणी

अवांतराबद्दल क्षमस्व> च्यायला, दिवस फिरायला लागले बहुतेक, विकीच्या लिंकांऐवजी फेसबुकावरील लिंका द्यायला लागले लोक! (बाकी फेसबुकावर कुळीथाला प्राणी गटात का टाकलंय?)

धन्यवाद चिंतामणी तुमच्यामुळे आमच्याही ज्ञानात भर पडली.

In reply to by कच्ची कैरी

आभार कशासाठी. समर्थ रामदांसानी सांगीतले आहे जे जे आपणासी ठावे, ते ते दुस-यासी द्यावे, शहाणे करून सोडावे, सकलजन. आजच्या काळात जरी हे अव्यवहार्य तत्वत्ज्ञान असले तरी तेच चिरंतन आहे हा माझा विश्वास आहे. तुला आवडले. मला आनंद झाला.