Skip to main content

सावध व्हावे हे जनताजन

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 24/12/2010 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
सावध व्हावे हे जनताजन मळभटं सारी द्यावी झटकून सावध व्हावे हे जनताजन ....॥१॥ कुणी फ़ुकाने लाटती पापड कुणी झोपला ओढुनी झापड मुखा कुणी तो कुलूप ठोकुनी चिडीचिप झाला मूग गिळून ....॥२॥ आग लागुनी जळता तरूवर म्हणती आहे मम घर दूरवर सोकाविती मग कोल्हे-दांडगे आणिक पिती रक्त पिळून ....॥३॥ किमान थोडा लगाम खेचा नांगी धरुनी त्यांची ठेचा झोपेचे हे सोंग फ़ेकूनी अभय पहा तू डोळे उघडून ....॥४॥ गंगाधर मुटे .................................................
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1096
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

कुणी फ़ुकाने लाटती पापड कुणी झोपला ओढुनी झापड मुखा कुणी तो कुलूप ठोकुनी चिडीचिप झाला मूग गिळून ....॥२॥ छान नि मस्त लिहिलेत मुटेजी आवडले.!1.