अवांतर लिखाण बॉंबस्फोटातील आरोपी मिर्झा टारायत बेग व मौला अवलिया यांना मिपा स्वगृहात वाचण्यासाठी लेखन, पाककृती विभाग द्यावे, असा आदेश विशेष न्यायाधीश पशा टुकारे यांनी दिला.
१३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी सातच्या सुमारास एका अवांतर प्रतिसाद स्फोटाने १७ लेखांचा जीव घेतला आणि टुकार लेखनाने ५०-६० प्रतिसादक जखमी केले. हे अघोरी कृत्य करण्यास जबाबदार असलेल्या मिर्झा टारायत बेग व मौला अवलिया यांना(७ महिन्यांनी) अखेर मिपाच्या दहशतवादविरोधी पथकाने काटाकिर्र येथून अटक केली.
पुढे मिपाबाहेर प्रतिबंधीत कोठडीत असताना ह्या अतिरेक्यांनी हळूहळू आपल्या मागण्या सांगायला सुरुवात केल्या. अगोदर वर्तमानपत्र, नंतर कपडे, आता तर त्यांना वाचायला खरडवही हवी आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सर्व मंजूर झाले. आज मिपावर काथ्याकुटापासून पाककृतीपर्यंत जाण्यास जितका जीव धोक्यात घालावा लागतो त्याच्या कितीतरी कमी जीव धोक्यात घालून, यांनी अवांतर आणि टुकार हल्ला करून आता पुन्हा मिपावर ऐश-आरामात जीवन जगत आहेत.
मला एक समजत नाही, मिपा हे एक पवित्र संस्थळ आहे. १७ लेखांचे जीव घेतलेल्या नराधमांना मिपासरकार असे कसे काय पुन्हा प्रवेश देउ शकते ? मिपा वाचून त्या 'बेग' आणि 'मौला' मध्ये असा काय बदल घडणार आहे ? ते काय सगळ्या अवांतर कारवाया सोडून समयोचीत प्रतिसाद मार्गाला लागणार, कि अजून काही त्या लेखातून भलते-सलते अर्थ काढून पुन्हा काही अघटीत करायचा विचार करणार ?
एखाद्या आंतरजालीय अतिरेक्याचे स्वातंत्र्य जपायचा हा अट्टाहास कशासाठी चाललेला आहे ? याने अतिरेक्यांना उत्तेजनच मिळणार नाहीतर अजून काय. अतिरेकी हेच समजतील 'भाई, आज चलो एक अवांतर डालेंगे, मरे तो मिसळप्रेमी, बचे तो मिपा कि जिंदगी'
हळूहळू असे अतिरेकी वाढत गेले कि हे संस्थळ म्हणजे 'टुकारांना पोसण्याचेच एक संस्थळ' बनून राहील असे वाटते. हे मिपा संस्थळ सामान्यांना वाचण्यासाठी आहे कि आंतरजालीय अतिरेक्यांना पोसण्यासाठी ?
अनेकांनी ह्या आंतरजालीय अतिरेक्यांच्या खोडसाळ आणि वैयक्तिक प्रतिसादाला दिलेली परखड उत्तरे संपादित झाली. मात्र त्यांनी केलेले एकांगी आरोप आणि अवांतर संपादित झाले नाही याचे आश्चर्य वाटते. मिपावर टुकार लेखन आल्याने काय तोटा होतो हे स्पष्ट करण्यास सांगितले तर या महाशयांनी स्वतःकडे मुद्दे नसल्याने 'अभ्यास वाढवा' असा चोमडेपणाचा सल्ला दिला. सदर आंतरजालीय अतिरेक्यांची सही आणि एकंदरीत सगळेच चाळे इथे का खपवून घेतले जातात ह्याचा खुलासा मिपासरकार करेल काय?
काही सूचना :-
- सदर लेखन हे मौजमजा, विनोद ह्यासाठी केलेले एक विडंबन आहे. तेंव्हा उगाच 'मिपाचे नाव कशाला घातले ?' वगैरे भिकार शंका उपस्थीत करु नयेत.
- लेखाशी संबंधीत व्यक्तींशी चर्चा करुनच त्यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या नावांचा लेखात समावेश केलेला आहे तेंव्हा उगाच आंतरजालीय पोलिस बनुन 'वैयक्तीक आरोपांचा धागा' वगैरे मुक्ताफळे उधळु नयेत.
- मिपावर सर्वच सदस्य आमचे मित्र आहेत. त्यामुळे 'विशिष्ठ लोकांनी विशिष्ठ लोकांसाठी काढलेला हा धागा आहे' असा ज्यांचा समज होईल त्यांनी तातडीने चपला अडकवुन धाग्यावरुन निघुन गेल्यास अतिउत्तम.
- 'आधी भन्नाट पुर्ण करा' वगैरे आपुलकींच्या सल्ल्यांसाठी कृपया व्यनी अथवा खरडीचा वापर करावा.
वाचने
16183
प्रतिक्रिया
72
मिसळपाव
प्रतिक्रिया
आश्चर्य आहे, हे मला माहित नव्हते परा
शक्यता नाकारता येत नाही.
In reply to आश्चर्य आहे, हे मला माहित नव्हते परा by वेताळ
जबरदस्त.. प्रत्येक वाक्याला
मस्त विडंबन अमोल
अतिरेकी हेच समजतील 'भाई, आज
क्रूपया
In reply to अतिरेकी हेच समजतील 'भाई, आज by टारझन
शक्यता नाकारता येत नाहि. -
In reply to क्रूपया by आत्मशून्य
शक्यता स्विकारता येइल काय ?
In reply to शक्यता नाकारता येत नाहि. - by टारझन
मी आत्ता घटनास्थळावर जाऊन आलो
शक्यता नाकरता येत नाही.
In reply to मी आत्ता घटनास्थळावर जाऊन आलो by यकु
कडक विडंबन सामान्य
काहीतरी वाचायला आपण येथे येतो
In reply to कडक विडंबन सामान्य by स्पा
अरे तुम्ही परत आलात....? चान
In reply to काहीतरी वाचायला आपण येथे येतो by अरुण मनोहर
हाहाहा!
हा हा हा
In reply to हाहाहा! by बिपिन कार्यकर्ते
असेच बोल्तो
In reply to हा हा हा by अवलिया
अनेकांनी ह्या आंतरजालीय
ढिष्क्लेमर टाकायचं र्हायलं का?
In reply to अनेकांनी ह्या आंतरजालीय by विजुभाऊ
'आधी भन्नाट पुर्ण करा'
हा हा हा !!
आपण दाढीचा कुठला शेव्हींग
In reply to हा हा हा !! by सुहास..
हा हा हा सुहाश्या
In reply to हा हा हा !! by सुहास..
सूहास तुझी कविता पण एक लंबर
In reply to हा हा हा !! by सुहास..
जिंदगी जिंदा-दिली का नाम हैं,
In reply to सूहास तुझी कविता पण एक लंबर by वाहीदा
बाळा, शिकवलेल्या तासाला गैरहजर का राहीलास ?? (आगाऊ कुठला ! )
In reply to जिंदगी जिंदा-दिली का नाम हैं, by नरेशकुमार
बाबा म्हणाले, कि शाळंला जाउ
In reply to बाळा, शिकवलेल्या तासाला गैरहजर का राहीलास ?? (आगाऊ कुठला ! ) by वाहीदा
आता घरुन बाबांची चिठ्ठी घेऊन
In reply to बाबा म्हणाले, कि शाळंला जाउ by नरेशकुमार
क आणि ड आणि क विडंबन. पर्या
काही अतिरेकी आतूनच संस्थळ
शक्यता नाकारता येत नाहि.
In reply to काही अतिरेकी आतूनच संस्थळ by यशोधरा
+१
In reply to शक्यता नाकारता येत नाहि. by अवलिया
अगदी, अगदी. आणि त्यात
In reply to +१ by छोटा डॉन
खरे आहे ...
In reply to अगदी, अगदी. आणि त्यात by यशोधरा
गेटवे ऑफ इंडीयावर
In reply to खरे आहे ... by छोटा डॉन
दुर्दैवाने शमत, आणि थोडक्यात
In reply to गेटवे ऑफ इंडीयावर by अवलिया
असो.
In reply to गेटवे ऑफ इंडीयावर by अवलिया
हांग आश्शी ! आता कसे डान्राव
In reply to असो. by छोटा डॉन
तरीही अतिरेकी राजरोस धुमाकूळ
In reply to असो. by छोटा डॉन
अभिजीत , पता लगाव इस संस्थळ
In reply to +१ by छोटा डॉन
विकि लिक..... मिसळ लिक एक
मला वाटले..
In reply to विकि लिक..... मिसळ लिक एक by अविनाशकुलकर्णी
हिवाळ्यात कोणा बरोबर आंघोळ
In reply to मला वाटले.. by सूर्यपुत्र
मस्त
प्र.का.टा.आ.
बडे बडे संस्थळोंपर ऐसी छोटी
शमत है ! थत्तेमिया(वरीजीनल)
In reply to बडे बडे संस्थळोंपर ऐसी छोटी by नितिन थत्ते
आंक्षी बराबर्हे
In reply to शमत है ! थत्तेमिया(वरीजीनल) by अवलिया
भन्नाट..
जोडे मारायचे आनि वर परत ह.
In reply to भन्नाट.. by योगी९००
एकाद्या विक्षिप्त साध्वी
बरोबर आहे!
सुरुवात डुपलिकेट आयड्यांच्या
In reply to बरोबर आहे! by धमाल मुलगा
अगदी अगदी! हौन जाऊंदे! एकडाव
In reply to सुरुवात डुपलिकेट आयड्यांच्या by यशोधरा
मेल्या! =)) आयजीच्या जिवावर
In reply to अगदी अगदी! हौन जाऊंदे! एकडाव by असुर
तरी लोक मनावर घ्येत नायत
In reply to मेल्या! =)) आयजीच्या जिवावर by यशोधरा
माहितीच्या अधिकाराखाली काय
In reply to तरी लोक मनावर घ्येत नायत by असुर
असल्या अधिकारांच्या कश्या
In reply to माहितीच्या अधिकाराखाली काय by परिकथेतील राजकुमार
है का आत्ता! मग कर की, अगदी
In reply to तरी लोक मनावर घ्येत नायत by असुर
गप पडलो आहे!
In reply to है का आत्ता! मग कर की, अगदी by यशोधरा
हाहाहा!!! नव्या दमाचे
In reply to मेल्या! =)) आयजीच्या जिवावर by यशोधरा
खुलासा करणार नाही. ज्जा!
हम्म..... याल म्हनत्यात 'जान
In reply to खुलासा करणार नाही. ज्जा! by llपुण्याचे पेशवेll
मस्तं !
ज्या गोडबोल्या अतिरेक्यांच्या
हे गोडबोले अतिरेकी हल्ली
खल्लास
In reply to हे गोडबोले अतिरेकी हल्ली by सुहास..
युव्वर थिंकिंग इज राईट
In reply to खल्लास by टारझन
हे गोडबोले अतिरेकी हल्ली
In reply to हे गोडबोले अतिरेकी हल्ली by सुहास..
परा- उतारा लै भारी रे.
___/\___ धन्य आहात परासाहेब