✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

या पोराला काय करावे ?

श
शरद यांनी
Tue, 12/14/2010 - 07:04  ·  लेख
लेख
शिक्षा ठोका सकाळी शाळेत एक मुलगा उशीरा आला. म्हणून रागे भरत गुरुजींनी विचारले " का रे, का उशीर झाला " पोराने उत्तर दिले " हराच्या हाराच्या आहाराच्या पुत्राच्या मित्राच्या शत्रुच्या भावाच्या प्रेयसीने गळ्याला घट्ट मिठी मारली म्हणून उशीर झाला ". गुरुजींनी काय शिक्षा केली ते सोडा. तुम्ही काय शिक्षा ठोकणार ते सांगा. प्रेयसीने गळ्याला घट्ट मिठी मारली हे गुरूजींना आवडले नाही हे कळते. पण आपण पोराच्या उत्तराचा नीट अर्थ लावून मगच शिक्षा करा. [सगळ्यांना विचार करावयास वेळ मिळावा म्हणून वाक्याचा अर्थ दोन दिवसांनी सांगावा ही नम्र विनंती.] [शाळकरू] शरद
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6650 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

मस्त!!!

शुचि
Tue, 12/14/2010 - 08:21 नवीन
मस्त मला हे २ दिवस वगैरे धीर धरवणार नाही. साय खाऊन घसा बसला आहे का?
  • Log in or register to post comments

साय खाऊन घसा बसला आहे का? हे

रेवती
Tue, 12/14/2010 - 08:25 नवीन
साय खाऊन घसा बसला आहे का? हे सांकेतिक भाषेतील उत्तर आहे असे समजते आहे.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

होय होय उत्तरच आहे ते साय =

शुचि
Tue, 12/14/2010 - 08:28 नवीन
होय होय उत्तरच आहे ते साय = प्रेयसी सायीची मीठी = घसा बसणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

काहीच समजलं नाही.

शिल्पा ब
Tue, 12/14/2010 - 08:17 नवीन
काहीच समजलं नाही. :(
  • Log in or register to post comments

विचार चाल्लाय.

रेवती
Tue, 12/14/2010 - 08:20 नवीन
विचार चाल्लाय.
  • Log in or register to post comments

शरद राव चान आहे. मस्त कामाला

नरेशकुमार
Tue, 12/14/2010 - 09:33 नवीन
शरद राव चान आहे. मस्त कामाला लावलय .......... चालु द्या,
  • Log in or register to post comments

तोच विचार चालु आहे..काय असावे

निवेदिता-ताई
Tue, 12/14/2010 - 10:29 नवीन
तोच विचार चालु आहे..काय असावे बरे उत्तर...
  • Log in or register to post comments

हर- महादेव , हराचा हार- नाग

dipti
Tue, 12/14/2010 - 10:48 नवीन
हर- महादेव , हराचा हार- नाग .... (माझा तर्क)..
  • Log in or register to post comments

" हराच्या हाराच्या आहाराच्या

विजुभाऊ
Tue, 12/14/2010 - 10:57 नवीन
" हराच्या हाराच्या आहाराच्या पुत्राच्या मित्राच्या शत्रुच्या भावाच्या प्रेयसीने गळ्याला घट्ट मिठी मारली म्हणून उशीर झाला ". हराचा हार = नाग नागाचा आहार = उंदीर उंदराच्या पिल्लाचा मित्र = ? त्याचा शत्रु = माम्जर माम्जराचा भाऊ = वाघ वाघाची प्रेयसी = वाघीण घरात वाघ आला होता का? ;)
  • Log in or register to post comments

हराच्या हाराच्या आहाराच्या

योगी९००
Tue, 12/14/2010 - 11:17 नवीन
"हराच्या हाराच्या आहाराच्या पुत्राच्या मित्राच्या शत्रुच्या भावाच्या प्रेयसीने गळ्याला घट्ट मिठी मारली म्हणून उशीर झाला ". हराचा हार = नाग नागाचा आहार = दुध दुधाचा पुत्र = साय किंवा दही किंवा विरजण .? त्याचा मित्र = लोणी त्याचा शत्रु = तुप? पुढे..?
  • Log in or register to post comments

हे घ्या उत्तर..

योगी९००
Tue, 12/14/2010 - 13:02 नवीन
हर ----- शंकर त्याचा हार ---नाग त्याचा आहार --- वायु[ हा एक संकेत आहे,नाग वायुवर जगतो अशी समजुत] त्याचा पुत्र ---- हनुमान त्याचा मित्र ---राम त्याचा शत्रु ----रावण त्याचा भाऊ --- कुंभकर्ण त्याची प्रेयसी --- निद्रा शरद यांच्या उपक्रमावरील लिंक मधून इथे डकवले आहे. पण यातील खालील गोष्टी न पटण्यासारख्या.. (वरच्या लिंक मधील प्रतिक्रियेत सुद्धा असेच विचारले आहे) नाग वायूवर जगतो. हनुमान हा रामाचा मित्र.. (तो तर रामाचा दास होता.)
  • Log in or register to post comments

प्रश्नपत्रिका फुटली !

शरद
Tue, 12/14/2010 - 15:31 नवीन
आता श्री. खादाडभाऊ यांनी उत्तर फोडलेच आहे तर स्पष्टिकरण. नाग वायूवर राहतो हा एक संकेत. सर्प जातीतले प्राणी एकदा अन्न खाल्ल्यावर महिनोमहिने देखील काही न खाता राहू शकतात. त्यावरून प्राचिन काळी लोकांची समजूत झाली की साप वायू भक्षण करून जगतो.फार चूकीचे नाही. आता आपण हल्ली हनुमानाला रामभक्त मानतो. पण रामायणात त्याला रामाचा सखा म्हटले आहे.एक उदाहरण :हनुमान रामाला म्हणतो " स्नेहो मे परमो राजंस्त्वयि तिष्टतु नित्यदा " उत्तरकांड ४०.१६-१७ संत विठ्ठलाचे भक्त हे खरेच पण ते सर्व विठ्ठलाला आपला सखाच म्हणतात. तेव्हा वायूपुत्राचा सखा राम हे योग्यच. असो. निद्रा गळ्याला मिठी मारणार असेलच तर झोपाळू पोराला शाबासकीची थाप द्यावी हेच योग्य. मी दोन वर्षांपूर्वी मिपा व उपक्रमचा सभासद झालो. पण माझे सर्व लेखन उपक्रमावरच झाले. मला असे वाटते की येथील फार फार तर १० % सभासद उपक्रम वाचतात. म्हणून पूर्वपरवानगी घेऊन मी तेथील काही लिखाण थोड्याफार फरकाने येथेही देतो. येथील बहुतांश वाचकांना ते नवीनच असते. ज्या सभासदांनी आधी वाचले असेल त्यांनी कृपया दुर्लक्ष करावे. शरद
  • Log in or register to post comments

प्रश्नपत्रिका फुटली म्हणुन

गणेशा
Tue, 12/14/2010 - 15:44 नवीन
प्रश्नपत्रिका फुटली म्हणुन तुम्ही नविन प्रश्नपत्रिका द्यावी आता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद

नविन..

योगी९००
Tue, 12/14/2010 - 16:01 नवीन
प्रश्नपत्रिका फुटली म्हणुन तुम्ही नविन प्रश्नपत्रिका द्यावी आता असेच म्हणतो.. शरद : तुमचे स्पष्टीकरण आवडले.. नविन प्रश्नाच्या प्रतिक्षेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद

अरे वा मस्तं स्पष्टीकरण आहे.

llपुण्याचे पेशवेll
Fri, 12/24/2010 - 14:59 नवीन
अरे वा मस्तं स्पष्टीकरण आहे. मी पण विचार करत होतो पण दिशा जरा चुकली. हराच्या हारातच आमची विकेट गेली. म्हणजे हराचा हार - कवट्यांची माळ त्याचा आहार - ?? इथेच आमची दांडी गुल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद

निद्रा गळ्याला मिठी मारणार

Pain
Tue, 12/28/2010 - 07:21 नवीन
निद्रा गळ्याला मिठी मारणार असेलच तर झोपाळू पोराला शाबासकीची थाप द्यावी हेच योग्य. म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद

वा! फ़ारच छान!

मेघवेडा
Tue, 12/14/2010 - 15:45 नवीन
वा! फ़ारच छान!
  • Log in or register to post comments

मस्त!

यशोधरा
Tue, 12/14/2010 - 15:46 नवीन
मस्त! :)
  • Log in or register to post comments

आम्हाला नवीन प्रश्न पाहीजे...

बद्दु
Tue, 12/14/2010 - 15:56 नवीन
ते काही नाही ...........आम्हाला नवीन प्रश्न पाहीजे... तुम्ही न फुटणारी (!) प्रश्नपत्रिका बनवुन वाटा...
  • Log in or register to post comments

मस्त डोकेबाज कोड होतं. अजुन

गणपा
Tue, 12/14/2010 - 16:00 नवीन
मस्त डोकेबाज कोड होतं. अजुन असतील तर द्या शरद राव. आणि उत्तर देणार्‍यांनी उत्तर अशी धाग्यावर न देता. शरद रावाना व्यनी करावीत.(जर त्यांची परवानगी असेल तरच)
  • Log in or register to post comments

किंवा

योगी९००
Tue, 12/14/2010 - 16:30 नवीन
आणि उत्तर देणार्‍यांनी उत्तर अशी धाग्यावर न देता. शरद रावाना व्यनी करावीत किंवा उत्तर छत्र प्रतिसाद म्हणून देण्याची सोय असावी.. मनोगत सारखे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

अहो उपक्रमावरील तुमची कोडी

पिंगू
Tue, 12/14/2010 - 19:51 नवीन
अहो उपक्रमावरील तुमची कोडी वाचून वेडा झालो होतो.. आता मिसळीवर कोडे टाका.. म्हणजे मज्जा येईल. - मठ्ठ पिंगू
  • Log in or register to post comments

गमतीदार! येऊ द्या अजून.

नगरीनिरंजन
Tue, 12/14/2010 - 20:25 नवीन
गमतीदार! येऊ द्या अजून.
  • Log in or register to post comments

अच्छा! उत्तर समजले. आता पुढचे

रेवती
Tue, 12/14/2010 - 20:35 नवीन
अच्छा! उत्तर समजले. आता पुढचे कोडे द्या.
  • Log in or register to post comments

कठीण आहे !!

अर्धवटराव
Wed, 12/15/2010 - 06:34 नवीन
नागाच्या "वायुभक्षणा"ची मला काहिच माहिती नव्हती. त्यामुळे हे कोडे मला सुटले नसते. पुढील प्रश्न येउ देत... (परिक्षार्थी) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

सेम हीअर...

चिगो
Fri, 12/24/2010 - 12:05 नवीन
मी आपला बेडूक, उंदीर वगैरे विचार करत बसलो... मस्त कोडे.. आणखी येऊ द्यात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

मस्त! अजून लिहा.

बिपिन कार्यकर्ते
Fri, 12/24/2010 - 13:46 नवीन
मस्त! अजून लिहा.
  • Log in or register to post comments

हा उपक्रम इथेही चालवावा

चित्रगुप्त
Wed, 04/12/2017 - 11:59 नवीन
'मेघनादरिपुतात' मुळे इथे पहुचलो. हा उपक्रम इथेही चालवावा ही विनंती.
  • Log in or register to post comments

+१

रुपी
Wed, 04/12/2017 - 22:35 नवीन
हे कोडे त्याहीपेक्षा अवघड आहे. मला सुटले नसते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा