" हराच्या हाराच्या आहाराच्या पुत्राच्या मित्राच्या शत्रुच्या भावाच्या प्रेयसीने गळ्याला घट्ट मिठी मारली म्हणून उशीर झाला ".
हराचा हार = नाग
नागाचा आहार = उंदीर
उंदराच्या पिल्लाचा मित्र = ?
त्याचा शत्रु = माम्जर
माम्जराचा भाऊ = वाघ
वाघाची प्रेयसी = वाघीण
घरात वाघ आला होता का? ;)
हर ----- शंकर
त्याचा हार ---नाग
त्याचा आहार --- वायु[ हा एक संकेत आहे,नाग वायुवर जगतो अशी समजुत]
त्याचा पुत्र ---- हनुमान
त्याचा मित्र ---राम
त्याचा शत्रु ----रावण
त्याचा भाऊ --- कुंभकर्ण
त्याची प्रेयसी --- निद्रा
शरद यांच्या उपक्रमावरील लिंक मधून इथे डकवले आहे. पण यातील खालील गोष्टी न पटण्यासारख्या.. (वरच्या लिंक मधील प्रतिक्रियेत सुद्धा असेच विचारले आहे)
नाग वायूवर जगतो.
हनुमान हा रामाचा मित्र.. (तो तर रामाचा दास होता.)
आता श्री. खादाडभाऊ यांनी उत्तर फोडलेच आहे तर स्पष्टिकरण. नाग वायूवर राहतो हा एक संकेत. सर्प जातीतले प्राणी एकदा अन्न खाल्ल्यावर महिनोमहिने देखील काही न खाता राहू शकतात. त्यावरून प्राचिन काळी लोकांची समजूत झाली की साप वायू भक्षण करून जगतो.फार चूकीचे नाही. आता आपण हल्ली हनुमानाला रामभक्त मानतो. पण रामायणात त्याला रामाचा सखा म्हटले आहे.एक उदाहरण :हनुमान रामाला म्हणतो " स्नेहो मे परमो राजंस्त्वयि तिष्टतु नित्यदा " उत्तरकांड ४०.१६-१७ संत विठ्ठलाचे भक्त हे खरेच पण ते सर्व विठ्ठलाला आपला सखाच म्हणतात. तेव्हा वायूपुत्राचा सखा राम हे योग्यच. असो. निद्रा गळ्याला मिठी मारणार असेलच तर झोपाळू पोराला शाबासकीची थाप द्यावी हेच योग्य.
मी दोन वर्षांपूर्वी मिपा व उपक्रमचा सभासद झालो. पण माझे सर्व लेखन उपक्रमावरच झाले. मला असे वाटते की येथील फार फार तर १० % सभासद उपक्रम वाचतात. म्हणून पूर्वपरवानगी घेऊन मी तेथील काही लिखाण थोड्याफार फरकाने येथेही देतो. येथील बहुतांश वाचकांना ते नवीनच असते. ज्या सभासदांनी आधी वाचले असेल त्यांनी कृपया दुर्लक्ष करावे.
शरद
अरे वा मस्तं स्पष्टीकरण आहे. मी पण विचार करत होतो पण दिशा जरा चुकली. हराच्या हारातच आमची विकेट गेली. म्हणजे
हराचा हार - कवट्यांची माळ
त्याचा आहार - ?? इथेच आमची दांडी गुल.
मस्त डोकेबाज कोड होतं. अजुन असतील तर द्या शरद राव.
आणि उत्तर देणार्यांनी उत्तर अशी धाग्यावर न देता. शरद रावाना व्यनी करावीत.(जर त्यांची परवानगी असेल तरच)
प्रतिक्रिया
मस्त!!!
साय खाऊन घसा बसला आहे का? हे
होय होय उत्तरच आहे ते साय =
काहीच समजलं नाही.
विचार चाल्लाय.
शरद राव चान आहे. मस्त कामाला
तोच विचार चालु आहे..काय असावे
हर- महादेव , हराचा हार- नाग
" हराच्या हाराच्या आहाराच्या
हराच्या हाराच्या आहाराच्या
हे घ्या उत्तर..
प्रश्नपत्रिका फुटली !
प्रश्नपत्रिका फुटली म्हणुन
नविन..
अरे वा मस्तं स्पष्टीकरण आहे.
निद्रा गळ्याला मिठी मारणार
वा! फ़ारच छान!
मस्त!
आम्हाला नवीन प्रश्न पाहीजे...
मस्त डोकेबाज कोड होतं. अजुन
किंवा
अहो उपक्रमावरील तुमची कोडी
गमतीदार! येऊ द्या अजून.
अच्छा! उत्तर समजले. आता पुढचे
कठीण आहे !!
सेम हीअर...
मस्त! अजून लिहा.
हा उपक्रम इथेही चालवावा
+१