किम्म्त .. विचारांची ..
सिग्नलला रीक्षात बसललो असताना
समोर एक भिकारी आला
सुरकतलेला चेहरा अन थरलेला हात
करुन नजरेने त्याच्या मन कासावीस झाले
दिवसभराच्या घाईगर्दीत विचार कुठे करतो आपण
अश्यावेळेस मग हे विचार अगदी डोक्यावर नाचतात
विचार..? अन आपन मध्यमवर्गीय यापलीकडे म्हणा काय करु शकतो..?
देश प्रगतीपथावर चाललाय..
सेन्सेक्स वाढतोय..मग ही स्थीती का?
विचारले मग मी त्याच म्हतार्याला
का रे बाबा असा भीक मागतोस...?
तसा उसळला माझ्यावर
मी अवाक..परत विचार आला
परिस्थीती मानसास उद्धट बनविते
पुन्हा भावूकपणे मी विचारले तेंव्हा
नजरेतून भाव सरकण सरकले त्याच्या
एका सेकंदात त्यात दिसली
त्याच्या जीवनाची व्यथीत कहानी
पुढे.. पुढे ..?
सिग्नल सुटला होता आणि एक मध्यमवर्गीय माणुस
विचारांची एक रुपया किम्मत करुन पुढे निघून गेला होता ....
--- शब्दमेघ
वाचने
1316
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
प्रतिक्रिया
सिग्नल सुटला होता आणि एक
लिहित रहा..
छान .......
प्रथमता धन्यवाद सर्वांचे
मस्त लिहिता पु.ले.शु.