एका रात्री !
सोनालीनं धाडकन् खोलीचा दरवाजा उघडला. उद्याच्या परिक्षेची तयारी करण्यासाठी आज रात्रभर तिला जागरण करायला लागणार होतं. तिची रूमपार्टनर नेहा जरा लवकरच झोपायची. त्यामुळे सोनाली पुस्तकं, वह्या वगैरे सामान घेउन ह्या वेगळ्या खोलीत आली होती. ही खोली तशी मोठिच होती पण तळ मजल्यावर, म्हणजे काहीशी तळघरासारखीच होती. त्यामुळे कोणी ह्या खोलीत राहात नसे.
सोनालीनं पुस्तकात डोकं घातलं आणि अभ्यास चालू केला. किती वेळ गेला हे कळलंच नाही. कुठलंतरी एक पुस्तक वर आपल्या खोलीतच विसरल्यामुळं ती उठली. रात्रीचे दोन वाजले होते. बराच वेळ बसून अंग आंबून गेलं होतं. जरा हातपाय ताणून तिनं आळस दिला आणि तिसर्या मजल्यावरच्या तिच्या खोलीकडे जाण्यासाठी जिने चढू लागली.
हॉस्टेलच्या त्या लांबलचक व्हरांड्यातली दिवे अगदीच मंद वाटत होते. लाकडी जिनेसुद्धा बरेच जुने झाल्यामुळे कर्रकर्र वाजत होते. ती तिच्या खोलीजवळ पोहोचली. उगाच नेहाची झोपमोड व्ह्यायला नको म्हणून दाराची कडी हळूच आवाज न करता तिनं काढली आणि बाहेरच्या दिव्याचा प्रकाश जेमतेम आत येइल इतपतच दार उघडलं.
कसलातरी गंजलेल्या लोखंडासारखा विचित्र वास येत होता. कपाळावर आठ्या घालत ती आत शिरली. वास काही केल्या कमी होत नव्हता. तिच्या आठ्या वाढल्या आणि रागानं तिचे हात थरथरू लागले. रात्रभराच्या जागरणामुळे मनावर ताण पडला आहे अशी तिने स्वतःचीच समजूत घातली.
नेहा कोपर्यातल्या तिच्या बिछान्यावर झोपलेली होती. तिचा श्वासोच्छ्वास सोनालीला ऐकू येत होता. परिक्षेच्या ताणामुळे नेहासुद्धा थोडी दमल्यासारखी वाटत होती. "झोपेत पण किती आवाज करते ही !" त्रासूनच ती म्हणाली, पण मनातल्या मनात नेहाचा तिला हेवाच वाटत होता.
सोनाली अंधारात भिंतीच्या कडेकडेने चालत तिच्या कपाटाजवळ आली, कपाटात हात घालून तिनं अंदाजानेच पुस्तक उचललं. बाथरूम मधून टप् टप् आवाज येत होता. "अजून नळ ठीक केलेला नाहिये वाटतं. उद्या परिक्षा झाली की तक्रार करायला पाहिजे" असा विचार करता करता ती पुन्हा दरवाज्यापर्यंत आली. दरवाजा पुन्हा हळूच बंद केला. बाहेरच्या मोकळ्या हवेत तिला जरा बरं वाटलं. पुन्हा खाली जाउन ती अभ्यासाला बसली. पहाटे साडेसहा वाजेपर्यंत अभ्यास केल्यावरमात्र तिला अजिबात बसवेना. " आता फार झालं जागरण ! सकाळी ९ वाजताचा पेपर आहे" म्हणून ती उठली. "निदान एक दोन तास तरी झोप मिळाली पाहिजे" असं म्हणून ती तिच्या खोलीकडे वळली. पहाटेचा गार वारा अंगाला बोचत होता. खोलीचं दार उघडलं तेव्हा सकाळची किरणं खोलीत पसरली होती. नेहा अजून झोपलीच असेल म्हणून तिनं हलकेच दरवाजा लोटला.
पुन्हा नाकाला कालचाच घाण लोखंडी वास येउन झोंबला. दचकूनच तीनं आत पाउल ठेवलं आणि पुढचं दृश्य पाहून ती किंचाळायला लागली. नेहाचं शव भिंतीवर हातपाय ताणून बांधलं होतं, तिच्या तोंडात बोळा कोंबला होता. तिचा गळा ह्या कानापासून त्या कानापर्यंत कापला होता. त्यातून ठिबकणार्या रक्ताचा टप् टप् आवाज येत होता. बिछाना पूर्ण रक्ताने भरला होता. तिचा आवाज ऐकून शेजारच्या सगळ्या खोल्यांमधल्या मुली धावत आल्या. सोनाली थरथरत उभी होती. सोनालीच्या हातून पुस्तकं खाली पडली आणि टणकन् मोठा आवाज झाला. तिनं डोळे विस्फारून खाली पाहिलं, एक गंजलेला कोयता पडला होता.
प्रतिक्रिया
क्रमशः राहिले वाटते....
??
सोनालीनंच तर नाही केला ना
मलाही आधी तसंच वाटलं होतं!
क्रमशः राहिलेलं नाही. मला
हीच गोष्ट मोठी करून लिही.
सुरवात छान झाली होती. रंगात
गंडलेली कथा
वातावरण निर्मिती मस्त जमली
चान चान.
कथा रंगवत आणून मधेच सोडून
सोनाली स्कीझोफ्रेनीक आहे कींवा तीला मल्टीपल पर्सनॅलीटी
वास्तवदर्शी लेखन
उत्तम
आता ऊघड ऊघड वॉचमनच खूनी वाटतोय
खूनी
शक्यता नाकारता येत नाहि.
चांगला प्रयत्न आहे ...
मस्त. हे जमायला तेवढी प्रतिभा
चूक
असं कसं झालं असेल गं? सोनाली
दोन्ही चुका अजूनही सुधारता
शक्यता नाकारता येत नाहि.
आता पाचर मारली गेली आहे.
तरी ही ..
धन्यवाद
कथेतील वातावरणनिर्मिती आवडली
ह्या मराठेंचे शुद्धलेखन
शक्यता नाकारता येत नाहि. -
आमच्या ठाण्याच्या शाळेत
असूया