
सांता कलॉज
गोड़ गुलाबी कुडकुड नारी थंडी पडली होती .....
पांढरा पांढरा बर्फही भुरभुरत होता ......
घरातल्या ख्रिसमस ट्री वर छोटे छोटे स्टार हलत होते.........
मी अन बाबानी रात्रि ख्रिसमस ट्री तयार केले होते ...........
सगळे गेले शांत झोपी.....
मी एकटीच आईच्या मखमली कुशितुन बाहेर आले
अंगणात आमच्या लाल पिवळी नाजुके वार्यावर डोलत होती
हासरी ,काग बाहेर आलीस विचारत होती
चन्द्र हसरा कधी ढगांच्या बेटा मध्ये लपयाचा
कधी उंच उंच झाडामागे,
हिरव्या हिरव्या उंच झाडानि
शुभ्र गालिचा ओढला होता
मी माझा मोजा दाराला अडकवला होता
आई म्हणाली होती की मध्यरात्रि सांता कलॉज येइन...................
रात्रि येउन त्यात खुप सारे गिफ्ट ठेउन जाईंन ....................
म्हणून मी बाहेर कुडकुडत होते
सांता कलॉज ची वाट पाहत होते
खुप रात्र झाली तशी थंडी वाढू लागली ....
माझे छोटेस नाक थंड पडले होते ......
वाट पाहून माझा सोबती चंद्रोबा पण ढगांच्या आड़ जाऊं झोपला
अंगन रंगिबिरंगी चिमुकल्याना घेउन शांत पहुडले होते
" कारे सांता का उशीर लावतो? खोटच बोलली आई !
तू काही नाही ऎकत लहान मुलांच
मी रात्रि जागुन तुज्यासाठी ट्री बनवला, आणि तू खोटारडा निघालास "
माझे गुबरे-गुबरे गाल लाल- लाल झाले ....................
डोळ्यातुन दोन गरम टचकन वाहून गेले................
चांदण्या मला बघत होत्या
रडू नको चिमुकले मायेने सांगत होत्या
ज्ज़ा,ज्ज़ा, सगळे खोटारडे कट्टी ,कट्टी कट्टी...
जाउन झोपते आता परत आईच्या कुशीत .....
मागे वळते तोच घंटेचा टन टन टन आवाज झाला
माझ्यासारखाच गब्दुला सांता
हरनांच्या रथातून आला ........
त्याला पाहून मला कित्ती कित्ती आनंद झाला ............
त्याने मला त्याच्या गरम गरम कुशीत उचलून घेतली
उशीर झाला म्हणून रागावली का माझी सोनुली ?
पांढरी शुभ्र दाढ़ी लाल लाल टोपी
मखमली पोटली अन त्यात खुप सारी चोकलेट
आणि खुप खुप खेळनि ..........
माझ्या छोट्या मुठीत अन फरॉकच्या खिशात
चोकलेट मावत नव्हती ..........
तरी पण संता ची पोटली रिकामी होत नव्हती ..........
"ए माझ्या दादाला पण देना खेळनि ..........
तो आळशी, झोपलाय पण मी देइन हा त्याला नक्की ..........."
खुप सारे चोकलेट आणि खुप सारी खेळनि
आणि त्या बरोबर खुप सारे आशीर्वाद
देऊन सांता परतला माघारी.....
टन टन टन करत त्याची हरनाची गाडी उडाली आकाशी...
शोधाया दूसरी चिमुकली फुले गोजिरी ........................
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2900
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
सांता कलॉज गोड़ गुलाबी
"वयाची आणि बुद्धीची साक्ष
In reply to सांता कलॉज गोड़ गुलाबी by परिकथेतील राजकुमार
परादादा आताच अन्डयातुन बाहेर
In reply to "वयाची आणि बुद्धीची साक्ष by पियुशा
आम्ही सोमवारी आमच्या हापिसात
टन टन टन करत त्याची हरनाची
+१
In reply to टन टन टन करत त्याची हरनाची by नगरीनिरंजन
काय ? शुचि ला पण टण टण टण
In reply to +१ by शुचि
छान कविता.......... मी पण
गोड़ गुलाबी कुडकुड नारी थंडी
सांता क्लॉज नाताळ मधे खुप मजा
मस्त कविता! दुसर्या ओळीलाच
In reply to सांता क्लॉज नाताळ मधे खुप मजा by अविनाशकुलकर्णी
मी लहानपणी सांता ला काय
मी लहानपणी सांता ला काय
In reply to मी लहानपणी सांता ला काय by इंटरनेटस्नेही
आपले हे पालथे धंदे