✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

स्वामी समर्थ आणि दत्तभक्ती

श
शुचि यांनी
Sun, 12/19/2010 - 22:17  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
26496 वाचन

💬 प्रतिसाद (134)

प्रतिक्रिया

खरोखर सुरेख प्रतिसाद..

योगी९००
Mon, 12/20/2010 - 17:14 नवीन
खरोखर सुरेख प्रतिसाद....!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

योग्य प्रतिसाद...

चिगो
Mon, 12/20/2010 - 22:58 नवीन
पटला.. मला सत्यनारायणातल्या कथांचा उद्देश्यही कळत नाही खरंतर.. (अवांतरः ते कामवासनेने पिडीत होऊन आपल्याच मुलीच्या मागे धावणार्‍या देवाची कथा माहीत आहे का हो कुणाला? नाही म्हणजे, उगाच आपला दैवी आंबटशौकीनपणा...) (अतीअवांतर : स्वर्गात "मचाक"ची वेबसाईट असेल/ आहे का? संदर्भ द्यावा.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

उत्तम

स्मिता.
Tue, 12/21/2010 - 14:33 नवीन
या चर्चेतील सगळ्यात सुरेख प्रतिसाद आहे. बर्‍याच प्रतिसाद देणार्‍यांना बहुदा असंच म्हणायचं असावं. आपण ते सुयोग्य शब्दात मांडलंय. आपण प्रतिकात्मक म्हणून जरी या गोष्टीचा विचार केला तरी प्रतिके जास्त चांगली आणि अनुरुप देता येऊ शकतात. पोरांना कापून निष्काम भक्ती सिद्ध करायची वेळ का यावी? या वाक्याला +१००!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

मुळात निष्काम भक्ती म्हणजे काय? सकाम भक्ती म्हणजे काय?

चिंतामणी
Tue, 12/21/2010 - 15:25 नवीन
त्या साठी गीतेच्या तिस-या अध्यायाचा अभ्यास करायला लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

गोंधळ !!

अर्धवटराव
Mon, 12/20/2010 - 10:39 नवीन
शुचीताईंनी सांगितलेल्या कथेतुन एक अर्थ असाहि निघतोय.. आपल्या पोराबाळांना कापुन हंडीत टाकल्यानंतर त्या गारुड्याने तपस्व्यांकडे आपला होरा वळवला. तेंव्हा प्राणभयाने ते तपस्वी पळुन गेले. इथे गारुड्याच्या ऐवजी एखादा वाघ, अजगर आला असता किंवा वादळ, ढगफुटी, स्वाइनफ्लू, चिनी/कसाबचे आक्रमण, यादे/मै प्रेमकी दिवानी हु सारखा चित्रपट, राखी सावंतचा रिएलिटी शो, सासभी बहु थी चा एपीसोड, महागाई, मिपा वरच्या अनेक उद्बोधक चर्चा असलं कुठलही जीवघेणं संकट आलं असतं तरिही प्राणाभयाने ते तपस्वी पळालेच असते. त्यातुन निश्कर्ष असा कि त्यांना दत्तप्रभूंशी काहि आत्मीयता/घेणंदेणं नव्हतं तर सरळ सरळ प्रभूंकडुन काहि वर्गणी वगैरे गोळा करायची होती... पण या वर्गणीतुन ऐश करणे तर दूरच, इथे जीवावर बेतायची वेळ आलि म्हटल्यावर त्यांनी आपला गाशा गुंडाळाला. आता यात नरबळीचं समर्थन वा नरबळीचा कुठल्याहि प्रकारच्या भक्तीशी संबध कुठे येतोय बरं ??? समर्थ निर्मोही. त्यांना नसेल आपल्या जीवाची फिकर किंवा नसेल मनात काहि मागण्याची ईच्छा वगैरे. म्हणुन बसले ते आसन जमवुन... "बघुन घेउ" या तोर्‍यात. (आलीच हाथापाईची वेळ तर त्या गारुड्याची हाडं नरम करायला समर्थांना तसही जड नसतं. १२०० नमस्कार घालायचे असं ऐकुन आहे महाराज हां...) (पळकुटा) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

त्यातुन निश्कर्ष असा कि

विलासराव
Mon, 12/20/2010 - 12:50 नवीन
त्यातुन निश्कर्ष असा कि त्यांना दत्तप्रभूंशी काहि आत्मीयता/घेणंदेणं नव्हतं तर सरळ सरळ प्रभूंकडुन काहि वर्गणी वगैरे गोळा करायची होती... पण या वर्गणीतुन ऐश करणे तर दूरच, इथे जीवावर बेतायची वेळ आलि म्हटल्यावर त्यांनी आपला गाशा गुंडाळाला. आता यात नरबळीचं समर्थन वा नरबळीचा कुठल्याहि प्रकारच्या भक्तीशी संबध कुठे येतोय बरं ??? समर्थ निर्मोही. त्यांना नसेल आपल्या जीवाची फिकर किंवा नसेल मनात काहि मागण्याची ईच्छा वगैरे. म्हणुन बसले ते आसन जमवुन... "बघुन घेउ" या तोर्‍यात. (आलीच हाथापाईची वेळ तर त्या गारुड्याची हाडं नरम करायला समर्थांना तसही जड नसतं. १२०० नमस्कार घालायचे असं ऐकुन आहे महाराज हां...) हा हा हा . मस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

अरे बाप रे!

कवितानागेश
Mon, 12/20/2010 - 11:06 नवीन
इथे बराच 'नरसंहार' सुरु झालाय! (शुद्ध शाकाहारी) माउ
  • Log in or register to post comments

२० डिसेंबर २०१० ही दत्तात्रेय

परिकथेतील राजकुमार
Mon, 12/20/2010 - 12:19 नवीन
२० डिसेंबर २०१० ही दत्तात्रेय जयंती. या दिवसाचे निमित्त साधून, पुढील गोष्ट ही माझ्याकडे असलेल्या पुस्तकांतून जशीच्या तशी उतरवली आहे. पुस्तकाचे नाव आहे - "चरित्र चिंतन -प प श्रीमदवासुदेवानंदसरस्वती (टेंबे) स्वामी महाराज". या पुस्तकाचे लेखक आहेत - डॉ वासुदेव व्यंकटेश देशमुख. संपादकांना योग्य वाटल्यास हा धागा ठेवावा अथवा उडवावा.
शुचि ह्यांनी कुठेही हि कथा त्यांची असल्याचे अथवा हि सत्यकथा आहे असे विधान केल्याचे वाचण्यात नाही. तेंव्हा हि कथा त्यांनीच लिहिली असल्यागत त्यांच्यावर होणारी टिका अवाजवी आहे असे वाटते. बाकी ज्यांना अशा कथा अंधश्रध्दा पसरवणार्‍या अथवा भाकड वाटतात व ज्यांनी ह्याबद्दल संयमाने लेखीकेला विरोध केला आहे अशा सदस्यांविषयी काही तक्रार नाही. त्यांच्या मताचा आदरच आहे. राहिला लेखनाच्या रतिबाचा मुद्दा.... शुचिमामीला माझे मत ठावुक आहेच ;) ह्या १ जानेवारीला तिला १२ डायर्‍या द्यायचा माझा विचार आहे. आणि लिहिणे वगैरे बंद करु नकोस गो. अध्ये मध्ये लिहित जा, तू लिहिले नाहीस तर आम्ही हक्काने हिणकस प्रतिसाद कुठे देणार ?
  • Log in or register to post comments

दत्त दत्त दत्ताची गाय गायीचे

अविनाशकुलकर्णी
Mon, 12/20/2010 - 12:59 नवीन
दत्त दत्त दत्ताची गाय गायीचे दुध दुधाचे लोणी लोण्यचे तुप तुपाची बेरी मारुतिची घंटा वाजे घण घण... दत्त दत्त . . . . मारुतिची घंटा वाजे घण घण... ................................ १०० वेळा जप करा...सारी उत्तरे मिळतिल
  • Log in or register to post comments

दत्त दत्त दत्ताची गाय गाईच

परिकथेतील राजकुमार
Mon, 12/20/2010 - 13:01 नवीन
दत्त दत्त दत्ताची गाय गाईच दूध दुधाच दही दह्याच ताक ताकावरच लोणी लोण्याच तूप तुपाचा डेरा डेऱ्याची माती मातीचा गणपती गणपतीची घंटा घण घण घण .. असे आहे ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

अरेरे करायला गेलो मारुति अन

अविनाशकुलकर्णी
Mon, 12/20/2010 - 13:04 नवीन
अरेरे करायला गेलो मारुति अन झाला गणपति
  • Log in or register to post comments

एका चांगल्या धाग्याला आलेल्या

मृत्युन्जय
Mon, 12/20/2010 - 13:15 नवीन
एका चांगल्या धाग्याला आलेल्या बकवास प्रतिक्रिया याहुन जास्त काही लिहित नाही. लेख नीट न वाचता प्रतिक्रिया देण्याची आणि मत प्रदर्शित करण्याची लोकांना नसती घाई का असते ते कळाले नाही. नंतर विचारजंत म्हणले की पोटशूळ उठतो. कथेत कुठेही पोरांचा बळी द्यावा असे सांगितले गेलेले नाही आहे. पोरांचा बळी दिला जाणे ही केवळ एक माया होती (माया कोण असे कृपया विचारु नये), भ्रम होता असेच कथेतुन ध्वनित होते. सर्व भोंदु ब्राह्मण पळुन गेल्यानंतर "दृष्य नाहीसे झाले" असे म्हणले आहे. म्हणजे प्रत्यक्षात मुलांचा बळी दिला गेलेला नव्हता तर ते सर्व केवळ इल्युजन (म्हणजे मायाच) होते हे स्पष्ट होते. कथेचा सारांश असा आहे की देवदर्शन असे सहजासहजी होत नाही. केवळ सिद्ध पुरुषांनाच (स्त्रिया देखील) ते प्राप्त होते. भोंदु बाबांना स्वतःला ही देवदर्शन होणे शक्य नाही आणि त्यांच्या सान्निध्यात राहुन इतरेजणांना देखील होणे नाही.
  • Log in or register to post comments

बरोबर आहे.

कवितानागेश
Mon, 12/20/2010 - 15:02 नवीन
http://www.misalpav.com/node/15926#comment-268858
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

+१ वरचे काही प्रतिसाद वाचून

पुष्करिणी
Mon, 12/20/2010 - 15:42 नवीन
+१ वरचे काही प्रतिसाद वाचून असं वाटतं की रामायण,महाभारत,इतर पुराणकथा, विक्रम्-वेताळ, रजनीकांतचे सिनेमे इ.इ. वाचून- ऐकून- टिव्हीवर पाहून कित्येक लोकांचे बळी गेले असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

+१

नितिन थत्ते
Mon, 12/20/2010 - 15:46 नवीन
असेच म्हणतो. बाकी कथा अगदी फालतू आहे (म्हणजे जो विषय मांडू पाहत आहे त्याच्याशी सुसंगत पण कॉमनसेन्सशी फारकत घेणारी) याबाबत एकूण सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

+२

बिपिन कार्यकर्ते
Mon, 12/20/2010 - 15:51 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

पटले नाही

समीरसूर
Tue, 12/21/2010 - 10:59 नवीन
>> कथेत कुठेही पोरांचा बळी द्यावा असे सांगितले गेलेले नाही आहे. पोरांचा बळी दिला जाणे ही केवळ एक माया होती (माया कोण असे कृपया विचारु नये), भ्रम होता असेच कथेतुन ध्वनित होते. सर्व भोंदु ब्राह्मण पळुन गेल्यानंतर "दृष्य नाहीसे झाले" असे म्हणले आहे. म्हणजे प्रत्यक्षात मुलांचा बळी दिला गेलेला नव्हता तर ते सर्व केवळ इल्युजन (म्हणजे मायाच) होते हे स्पष्ट होते. मुळात हा जो विचार आहे तोच पटण्यासारखा नाही. माया दर्शविण्यासाठी पोरांनाच बळी द्यायला हवे असे का? आणि लहान मुलांना कापून त्यांचे मास शिजविण्याची कृती बघून ब्राह्मणच काय साक्षात ब्रह्मदेवदेखील पळून जाईल. भयावह असेच ते कृत्य आहे आणि असल्या कृत्याला घाबरणे हा काही गुन्हा असू शकत नाही. मग ते ब्राह्मण भोंदू कसे काय ठरू शकतात? कुणालातरी इतके पराकोटीचे घाबरवून त्याच्या भक्तीची पातळी किंवा पोहोच तपासणे म्हणजे १००० फूट कड्यावरून एखाद्याला लोटून देऊन त्याला पडतांना बेसनाचा लाडू खाऊ घालण्यासारखे आहे. आणि मग लाडू तोंडात कोंबतांना "वा वा तू पडतोयस खाली, ही माया आहे, घाबरू नकोस, पडला तरी मोक्षपदी जाशील, खा, लाडू खा...मज्जा कर" असे म्हणणे कदाचित देवाला किंवा देवपदाला पोहोचलेल्या व्यक्तीला सोपे वाटत असेल पण जो पडतोय त्याची काय फाटत असेल याची कल्पनाच केलेली बरी. तो आपला "चुलीत गेला तुझा लाडू आणि मसणात गेलं तुझं मोक्षपद, आधी मला वर काढ. माझी पोरं माझी वाट बघतायत." असे ओरडून आकाशपाताळ एक करत असेल. आणि भक्ती तपासण्यासाठी माया हवीच कशाला? भक्ती हा एक अनुभव आहे. एखाद्या देवळात आपसूक हात जोडले जाणे ही भक्ती, कुणाचे वाईट न चिंतणे ही भक्ती, कुणाला त्रास न देणे ही भक्ती, गावातल्या एखाद्या छोट्याश्या देवळात क्षणभर बसल्यावर मनाला जी शांतता लाभते ती भक्ती, निसर्गाच्या सान्निध्यात असतांना आपल्या सगळ्या चिंता विसरून एखाद्या पाकळीसारखे हलके वाटणे ही भक्ती... भक्ती ही एक अनुभुती असायला हवी, तलवार उगारून उरात फुटते ती भीती, भक्ती नव्हे. म्हणजे मी जर भक्ती नाही केली तर देव असच काहीतरी भयंकर (पोरांना कापणे वगैरे) करून माझी वाट लावेल असा जर विचार येऊन भक्तीचा मळा फुलत असेल तर असली भक्ती फारच कुचकामी आणि अप्पलपोटी म्हणायला हवी. >>एका चांगल्या धाग्याला आलेल्या बकवास प्रतिक्रिया याहुन जास्त काही लिहित नाही. लेख नीट न वाचता प्रतिक्रिया देण्याची आणि मत प्रदर्शित करण्याची लोकांना नसती घाई का असते ते कळाले नाही. नंतर विचारजंत म्हणले की पोटशूळ उठतो. धागा चांगला होता यात वादच नाही. भक्तीचा ऊहापोह करणारा वाटला असता तर अधिक चांगला वाटला असता. पण दुर्दैवाने गोष्टीचे आणि माया, देवदर्शन वगैरे कालबाह्य संकल्पनांचे समर्थन करण्याचा सूर धाग्यातून पाझरत होता. गोष्ट फारच अतार्किक होती आणि प्रतिसाद गोष्टीच्या अतार्किकपणावर आलेत. त्यामुळे प्रतिसाद योग्यच आहेत असे म्हणायला हवे. अजून एक गोष्ट मला आठवते; चिलया बाळाची. दत्त चिलयाबाळाच्या आईला बाळाचे मास खायला मागतात आणि ती देते. नंतर तिची भक्ती बघून दत्त तिला बाळ परत करतात. काही तरी अर्थ आहे का या गोष्टीत? या भक्तीच्या रक्तबंबाळ परीक्षेत बाळाने काय घोडे मारले की त्याचा असा करूण अंत व्हावा? आणि भक्ती तपासण्याची ही कुठली अभिनव पद्धत? आणि ही परीक्षा पास करून उपयोग काय? ही परीक्षा पास करण्याआधी आणि नंतर चिलयाबाळाच्या आईच्या आयुष्यात काय फरक पडला असेल? >>कथेचा सारांश असा आहे की देवदर्शन असे सहजासहजी होत नाही. केवळ सिद्ध पुरुषांनाच (स्त्रिया देखील) ते प्राप्त होते. भोंदु बाबांना स्वतःला ही देवदर्शन होणे शक्य नाही आणि त्यांच्या सान्निध्यात राहुन इतरेजणांना देखील होणे नाही. देवदर्शनाचा हेतू काय? कशासाठी हवे देवदर्शन? ही पण सकाम भक्तीच नव्हे काय? मी तर असे म्हणेन की मला देवदर्शनाची देखील आस नाही इतकी माझी भक्ती निर्गुण, निराकार आणि निष्काम आहे. शेवटी देवदर्शनासाठी इतका अट्टाहास ही देखील एक कामना झाली म्हणजे एका अर्थाने ती भक्ती स्वार्थाने लडबडलेली आहे, सकाम आहे, सविकार आहे मग असल्या भक्तीचा काय उपयोग? फक्त माझ्या पोराला चांगली नोकरी दे, चांगली बायको दे, एक बंगला दे असल्या मागण्यांसाठी या भक्तीचा उपयोग करायचा का? आज एखादी व्यक्ती माझा प्राण वाचवते, खूप तहान लागल्यावर मला पाणी देते, माझं हरवलेलं पाकीट मला प्रामाणिकपणे परत करते, मला लहानपणी परीक्षेसाठी पेन न्यायचे विसरल्यावर शाळेच्या इमारतीच्या बांधकामावर असलेल्या एका मजूराने त्याचे पेन दिले होते, या सगळ्या व्यक्ती माझ्यासाठी देवच आहेत. तो एक साधा मजूर होता पण त्याने मला त्यावेळेस जी मदत केली होती ती मी जन्मभर विसरू शकणार नाही. माणसातले हे देवपण आणि त्या देवपणाची भक्ती श्रेष्ठ की पोरांना कापण्याची माया बघून निगरगट्टपणे आलेली भित्री भक्ती श्रेष्ठ? ही माझी वैयक्तिक मते आहेत. चुकीची असू शकतात. चुकत असल्यास क्षमस्व. :-) --समीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

मला वाटतं, जी एंची कथा आहे,

गवि
Tue, 12/21/2010 - 11:11 नवीन
मला वाटतं, जी एंची कथा आहे, शेतकरी आर्थिक कारणापायी बैल विकायला बाजारात घेऊन जातो. बैल विकला जात नाही म्हणून त्याला घरी परत घेऊन येताना तो शेतकरी आणि बैल यांत काय नातं असेल ? ज्या क्षणी विकायला काढला त्या क्षणी जे व्हायचं ते झालं होतं. (नक्की काय ते शब्दात लिहीत नाही. लिहिता येत नाही) आता परत आला तरी काय फरक पडतो ? तसेच्..काहीही उद्देशाने घातले पोराला ठार करुन शिजायला..तिथेच काय व्हायचे ते झाले. पुढे परत मिळाले बाळ तरी काय? आणि मधल्या काळात देवप्राप्ती, मोक्षप्राप्ती काहीही अलौकिक मिळाले तरी काय? तात्पर्यच पाहू आणि बाकी सगळे सोडू म्हटले तर मग काथ्याकूट, कौल वगैरे सर्व सेक्षनच व्हॉईड होतील. चिलया बाळ, आईचे डोके उडवणारा परशुराम वगैरे उदाहरणे म्हणूनच पहिल्याच कॉमेंटमधे दिली होती. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

ज्या क्षणी विकायला काढला त्या

Pain
Wed, 12/22/2010 - 09:33 नवीन
ज्या क्षणी विकायला काढला त्या क्षणी जे व्हायचं ते झालं होतं. (नक्की काय ते शब्दात लिहीत नाही. लिहिता येत नाही) आता परत आला तरी काय फरक पडतो ? तसेच्..काहीही उद्देशाने घातले पोराला ठार करुन शिजायला..तिथेच काय व्हायचे ते झाले. पुढे परत मिळाले बाळ तरी काय? आणि मधल्या काळात देवप्राप्ती, मोक्षप्राप्ती काहीही अलौकिक मिळाले तरी काय? तात्पर्यच पाहू आणि बाकी सगळे सोडू म्हटले तर मग काथ्याकूट, कौल वगैरे सर्व सेक्षनच व्हॉईड होतील. अगदी खरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

फार दिवसांनी मिपावर आल्यावर

भडकमकर मास्तर
Mon, 12/20/2010 - 16:07 नवीन
फार दिवसांनी मिपावर आल्यावर ही अत्यंत महत्त्वाच्या विषयावरची चर्चा वाचली... फारच आवडली.... सर्वांना शुभेच्छा.... मिपावर असेच दर्जेदार विषय पुन्हापुन्हा वाचायला मिळोत अशी नम्र भावना व्यक्त करतो....
  • Log in or register to post comments

बहुतांश सहमत

प्रियाली
Mon, 12/20/2010 - 18:01 नवीन
फार दिवसांनी हा भाग सोडून इतर भागाशी सहमती.
मिपावर असेच दर्जेदार विषय पुन्हापुन्हा वाचायला मिळोत अशी नम्र भावना व्यक्त करतो....
अगदी!! महान लेख आणि महान प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

संपूर्ण सहमत

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 12/20/2010 - 23:13 नवीन
प्रियालीचं नाव वगळता सदर प्रतिसादाला संपूर्ण सहमती. (दुसर्‍याच्या नावाने सहमत व्हायला मी थोडीच निष्काम अथवा सकाम अथवा कसेही भक्त अथवा देव आहे?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

१०० वा प्रतीसाद. अभिनंदन शुचि

स्वानन्द
Mon, 12/20/2010 - 17:08 नवीन
१०० वा प्रतीसाद. अभिनंदन शुचि ताई. सातत्याने ५० च्या वर प्रतीसाद खेचणार्‍या शुचि ताईंना कुठल्या सन्मानाने गौरविले जावे बरे? ;)
  • Log in or register to post comments

बेश्ट इमोसनल अत्याचार

सुप्परमॅन
Mon, 12/20/2010 - 17:16 नवीन
बेश्ट इमोसनल अत्याचार ऑफ मिपा हा सन्मान कसा वाटतो? मिपाचा दर्जानिश्चिती करणार्‍या शुचितैंच्या लेखाचे कौतुक वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

एका चांगल्या धाग्याला आलेल्या

इंटरनेटस्नेही
Mon, 12/20/2010 - 19:04 नवीन
एका चांगल्या धाग्याला आलेल्या बकवास प्रतिक्रिया याहुन जास्त काही लिहित नाही. लेख नीट न वाचता प्रतिक्रिया देण्याची आणि मत प्रदर्शित करण्याची लोकांना नसती घाई का असते ते कळाले नाही. नंतर विचारजंत म्हणले की पोटशूळ उठतो. वरील श्री. मृत्युंजय यांच्याशी एकदम सहमत.
  • Log in or register to post comments

>>प्रभू रामचंद्र हे स्वामी

पक्या
Tue, 12/21/2010 - 08:33 नवीन
>>प्रभू रामचंद्र हे स्वामी समर्थांचे उपास्य दैवत. पुढील कथेतून स्वामी समर्थांची दत्तभक्ती दिसून येते. बहुतेकांना माहित असावे स्वामी समर्थ श्री प्रभू रामचंद्रांचे परमभक्त होते.पण त्यांना हे माहित नसावे की ते दत्तभक्त ही होते. आणि ते दर्शवण्यासाठी पुढील कथेचा उपयोग केलेला आहे. शुचिताईंचा हा मुद्दा कोणीही ध्यानात घेतला नाही. (त्यांनी एक आरती पण दिली आहे.) ह्यात अंधश्रध्दा पसरवण्यासारखे असे काहीच वाटत नाही. पोरे कापलेली पाहिल्यावर ब्राम्हण घाबरले आणि त्यात आपल्यावर पण ही वेळ येते कि काय (हंडी भरत नाही म्हणून) असे वाटून ते पळू लागले. देवाची भक्ती करताना 'मीपणा' गळून गेलेला पाहिजे. म्हणूनच समर्थ जागचे हलले नाहीत. कथेच्या काळानुसार ब्राम्हणांना पराकोटीचे भय दाखवण्यासाठि ही रुपके गोष्टीत वापरली असतील. जर आताचा काळ असता तर कथालेखकाने वेगळ्या काही रुपकांचा वापर करुन भयरस निर्माण केला असता. उदा. परग्रहावरील काही शक्ति, मिपावरील प्रतिसादकर्ते रूपी भुतं . कथालेखकाने जर समोर राक्षस दाखवला असता किंवा प्रेते , हडळी दाखवल्या असता तरी ब्राम्हण घाबरले असते असे वाचकाला वाटू शकते पण ते कथा लेखकाला नसेल वाटले . ह्या एका रूपकावरून एचढा गदारोळ काही सदस्यांनी घातला आहे . त्यांनी बहुतेक लेख नीट समजून न घेताच , काही शब्द फक्त वाचून , हे असे असते काय कधी असा विचार करुन एकांगी प्रतिसाद दिले आहेत.
  • Log in or register to post comments

एक नंबरची टुकार भाकड कथा!

रम्या
Tue, 12/21/2010 - 16:47 नवीन
एक नंबरची टुकार भाकड कथा! रुपक म्हणा, माया म्हणा, आशय म्हणा, किंवा काहीही म्हणा. धर्म, चालीरीती याप्रमाणे देवाला ही सुधारायचे दिवस आलेत. कुणाचं तरी रुप घेऊन कोणता तरी देव येतो नि म्हणतो काप पोराला नि दे मला खायला. च्यायला नि कोण म्हणतो ते रुपक आहे, माया आहे, वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करा, तो तात्पर्यचा भाग नाही. सालं सगळं टुकार नि भिकार.
  • Log in or register to post comments

पॉपकॉर्न आणि योग्य फांदीवरची

नीधप
Tue, 12/21/2010 - 17:44 नवीन
पॉपकॉर्न आणि योग्य फांदीवरची योग्य जागा शोधली असती पण म्याच अजून किती वेळ चालू असणार हे ? काही कल्पना कुणाला?
  • Log in or register to post comments

शुचि, तुमच्या माहितीस्तव...

योगप्रभू
Wed, 12/22/2010 - 13:18 नवीन
शुचि, तुम्ही समर्थ रामदास आणि दत्तदर्शनाबाबतचा प्रसंग नमूद केला आहे. दत्त हे दैवत भक्तांची अशीच परीक्षा पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे. संत एकनाथांच्या चरित्रातही अशीच गोष्ट आहे. एकनाथ हे नाथ संप्रदायातील अधिकारी संत जनार्दनस्वामींचे शिष्य. जनार्दनस्वामी हे देवगिरीचे किल्लेदारही होते. एकनाथ त्यांच्या हाताखाली राहून कारभारातही मदत करत. जनार्दनस्वामी बहुतेकवेळा तपश्चर्येत मग्न असत, परंतु नाथांच्या आध्यात्मिक प्रगतीकडे त्यांचे बारकाईने लक्ष असे. ते प्रेमाने एकनाथाला 'एका' नावाने संबोधत. शिष्याला संप्रदायाची दीक्षा देण्याची वेळ आली, हे ओळखून जनार्दनस्वामींनी एक दिवस एकनाथांना बरोबर घेतले आणि दोघे निबीड अरण्यात गेले. तेथे गेल्यावर जनार्दनस्वामी मुद्दाम एकनाथांना म्हणाले, की येथे एक मलंग (मुसलमान फकीर) माझा मित्र आहे. त्याला भेटूया. दोघे तिकडे गेले तर किळस यावी असे दृश्य होते. घाणेरड्या वास मारणार्‍या कपड्यातला तो फकीर लोळत पडला होता. आसपास बरेच खरकटे, हाडके पडली होती. त्यात चार घाणेरडी कुत्री हिंडत होती. त्या फकीराजवळ डोळ्यात सुरमा घातलेली एक मुसलमान बाई बसली होती आणि ते दोघे कुणाचीही लाज न बाळगता अश्लील बोलत होते, गलिच्छ शिव्या देत होते. जनार्दनस्वामींना बघताच फकीर म्हणाला, 'आवो बम्मन! इधर बैठो कम्बलपर' जनार्दनस्वामी नि:संकोचपणे त्या घाणेरड्या उकीरड्यात बसले आणि त्यांनी एकनाथांची ओळख करुन दिली. त्यावर तो फकीर तुच्छतेने म्हटला, ' इस बम्मन के छोरे कु इदर क्यों लाया?' त्यावर जनार्दनस्वामी म्हटले, 'आंबा पाडाला आल्याचे कानावर घालायचे होते.' तेवढ्यात ती बाई एका वाडग्यात दूध आणि शिळी भाकरी घेऊन आली. त्यालाही वास मारत होता. पुन्हा ती बाई केसात कराकरा खाजवून नखावरच उवा मारत होती. एकनाथांनी ती भाकरी खायला नकार दिला. मग फकीराने जनार्दनस्वामींना पान बनवायला आणि पाय चेपायला सांगितले. तो सगळा प्रकार बघून नाथांना तिथून पळून जावेसे वाटू लागले. आपले गुरू त्रिकाळ संध्या करणारे शुचिर्भूत ब्राह्मण असताना एका मुसलमान फकीराशी नको त्या जवळिकीने का वागताहेत, हे त्यांना समजेना. त्यानंतर त्या फकीराने एकनाथांना जवळ बोलवले आणि म्हणाला, ' हमारे घर की रोटी नही खाता है ना. तो बिडा खा.' असे म्हणून त्या फकीराने नाथांना मांडीवर बसवले आणि आपल्या मुखातला उष्टा विडा भरवला. गंमत म्हणजे जनार्दनस्वामी पण नाथांना 'विडा खा' म्हणून खुणा करत होते. शिसारी येत असतानाही गुरुची आज्ञा म्हणून त्यांनी तो चोथा चावला आणि त्यांची एकदम समाधी लागली. जनार्दनस्वामींनी हलकेच त्यांच्या कपाळाला स्पर्श केला. नाथांनी डोळे उघडले तर पूर्वीचे ते घाणेरडे दृश्य नाहीसे झाले होते. समोर 'तीन शिरे सहा हात' असलेले दत्त प्रसन्न मुद्रेने त्यांच्याकडे पाहात होते. मागे शुभ्र धेनु होती. दत्तात्रेयांनी स्वतः नाथांच्या कानात गुरूमंत्र सांगून त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली आणि जनार्दनस्वामींचा एका खर्‍या अर्थाने जगाचा नाथ 'एकनाथ' झाला. (खरे तर अशा कथित भाकड आणि किळसवाण्या अनेक विचित्र कथा अनेक संतांच्या चरित्रात पाहायला मिळतात. संत गजानन महाराजांच्या तोंडातील कफाचा बेडका चोळल्याने एका कुष्ठरोग्याच्या व्रणातील पू व जखमा भरुन आल्या आणि महाराज जिथे स्नान करत तेथील माती अंगाला लावल्याने त्याचा रोग गेला, हा प्रसंग पोथीत वर्णन केला आहे. मला एवढेच वाटते, की ज्यांना असले काही पटत नसेल त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करावे, हे उत्तम. विनाकारण हमरीतुमरीवर येण्यात काय अर्थ आहे? शुचि यांनी लेखनात सुरवातीलाच कथेचा संदर्भ नमूद केला असुनही जणू काही त्यांनीच स्वतःच्या कल्पनेतून कथा रचल्यात, अशा थाटात काहींनी टीका केली आहे. एका प्रतिक्रियेत तर 'विकृत मनोवृत्तीची लेखिका' असा काहीसा उल्लेख आहे. संपादक मंडळाने कृपया हा प्रतिसाद उडवावा, अशी अपेक्षा. कोणतीही टीका ही संबंधित लेखन समोर ठेऊन केली जावी. शुचि यांच्या आजवरच्या लेखनाची शैली लक्षात न घेता त्यांच्याबाबत असले शब्दप्रयोग करणे सदस्यांना शोभत नाही.)
  • Log in or register to post comments

वरचा लेख पुरेसा नव्हता

सुप्परमॅन
Wed, 12/22/2010 - 16:09 नवीन
हे घ्या! वरचा किळसवाणा लेख पुरेसा नव्हता म्हणून हे आणखी. असल्या किळसवाण्या भाकड गोष्टींतूनच लोकांची सुटका व्हावी असे इतरांना वाटते. बरं आता लिहिताच आहात किळसवाणं तर सांगा की असल्या किळसवाण्या भाकडकथा संतसाहित्यात का आढळतात? आपल्या रामायण महाभारतात का नाही सापडत? रामदासस्वामींनी नाही लिहिल्या त्या असल्या विकृत आणि किळसवाण्या गोष्टी? त्यांच्याकडे लिहिण्यासारख, करण्यासारख खूप होतं म्हणून का? लोकांना जे पटत नाही त्याकडे दुर्लक्ष करावे असे सांगणारे आपण कोण? असे होते तर आमोद शिंदे यांच्यावर लोक का धावून गेले? त्यांनी जे लिहिले ते लोकांना पटले नाही म्हणून ना? म्हणजेच, तुमच्या म्हणण्याप्रमाणे जेथे तुमच्या भावना दुखावतात तेथे लोकांनी दुर्लक्ष करावे.
एका प्रतिक्रियेत तर 'विकृत मनोवृत्तीची लेखिका' असा काहीसा उल्लेख आहे. संपादक मंडळाने कृपया हा प्रतिसाद उडवावा, अशी अपेक्षा.
दुर्लक्ष करायचे होते ना त्याकडे. :) जमले नाही का? स्वतःला जमत नाही आणि दुसर्‍यांना शिकवण? >>शुचि यांच्या आजवरच्या लेखनाची शैली लक्षात न घेता त्यांच्याबाबत असले शब्दप्रयोग करणे सदस्यांना शोभत नाही. शुचिंची शैलि कोणती? बाई पुरुष संबंध, माइंडमॅप्स आणि अध्यात्माच्या भाकड कथा. ज्यांचे विश्लेषण त्यांना येत नाही पण जे शब्द त्या वापरतात त्यांचा अर्थही माहित नाही असे ना. शुचि म्हणजे मिसळपावच्या सिद्धहस्त लेखिका असल्यासारखे बोलताय म्हाराज!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

तुमचा सल्ला मानतो...

योगप्रभू
Wed, 12/22/2010 - 20:57 नवीन
धन्यवाद आपली सूचना पटल्यामुळे या प्रतिसादाकडे दुर्लक्ष करतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुप्परमॅन

+१

आमोद शिंदे
Wed, 12/22/2010 - 21:05 नवीन
संपूर्ण प्रतिसाद +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुप्परमॅन

कळत नाही..

समीरसूर
Wed, 12/22/2010 - 15:47 नवीन
कथा वाचली. काही कळत नाही. असल्या कथा आपल्या धार्मिक वाड.मयात का आणि कशा आल्या असतील याचे आश्चर्य वाटते. किंबहुना कुठल्याही धर्माच्या शास्त्रांमध्ये असल्या कथा असतील तर सामान्य लोकांचा किती गोंधळ उडत असेल याची कल्पनाच केलेली बरी. एकदा आपण 'प्रपंच करावा नेटका' ची हाळी देतो, मग आपण भक्तीचे परमोच्च टोक गाठण्यासाठी सगळा संसार सोडून तपश्चर्या करण्याच्या कृत्याला भक्तीभावाने समर्थन देतो. 'कर्म करत राहणे हीच खरी पूजा' अशी शिकवण शिकत असतांनाच अशा कथा कानावर पडतात. मग सामान्य माणसाने करायचे काय? आजच्या युगात सगळं सोडून अशी घनघोर तपश्चर्या करणे शक्य आहे काय? या कथा सगळ्या काल्पनिक असल्या पाहिजेत. देव शोधायलाच हवा हा अट्टाहास कशासाठी असतो हेच मला कळत नाही. तपश्चर्येच्या ५०% वेळ जर पर्यावरणाचे रक्षण, प्रबोधन, शिक्षणाविषयी जागृती, पाण्याच्या दुर्भिक्षाविषयी जागृती या व अशा प्रश्नांवर घालवला तर कितीतरी पट जास्त भक्तीचा आनंद मिळेल; मग भक्तीच्या असल्या कठीण आणि निरर्थक परीक्षा द्यायला वेळच मिळणार नाही. आपले अध्यात्म खूप चुकीच्या दिशेने गेले आहे असे वाटते. सगळ्याच धर्मांच्या बाबतीत असे घडले आहे. मुस्लिमांना धर्मांधतेचा शाप आहे. अल्लाहची मर्जी, जिहाद, कुटुंबनियोजनास विरोध, लसीकरणास विरोध, पराकोटीचा धर्माचा पगडा या निरर्थक अध्यात्मभूमिकेतून मुस्लिम जात आहेत आणि दुर्दैवाने अजूनही असल्या भाकड धार्मिकतेला बळी पडत आहेत. हिंदूंचे अतार्किक ईश्वरवेड असल्या निर्बुद्ध कथांमधून दिसते. शिवाय अंधश्रद्धा आहेतच. ख्रिश्चन धर्मीय धर्मप्रसाराच्या रोगाचे बळी आहेत. जिकडे तिकडे ख्रिश्चन धर्माचा प्रसार जोमात सुरु आहे. आजच्या युगात धर्म ही संकल्पना बदलून सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी अशी मानवधर्माची कल्पना प्रत्यक्षात येण्याची गरज असतांना माणसानेच तयार केलेली ही भूते अजून माणसाच्या मानगुटीवरून उतरायला तयार नाहीत हे खरच दुर्दैव आहे! --समीर
  • Log in or register to post comments

एक अशी शक्यता आहे..की जे

गवि
Wed, 12/22/2010 - 16:26 नवीन
एक अशी शक्यता आहे..की जे संसारी आहेत आणि ज्यांना मुलं बाळं झाली आहेत (मजसारखे) त्यांना कदाचित मुलांच्या "त्या" भीषण उल्लेखाने जास्त अस्वस्थ झाले असावे. आपल्या बाळाचा स्पर्श ज्यांना झाला आहे आणि ज्यांच्या आजूबाजूला ती अस्तित्वात आहेत त्यांना ती कल्पनाही असह्य वाटली असावी. निव्वळ तात्पर्य पाहण्याचा "ऑब्जेक्टिव्ह" फिल्टर या भावनेला थांबवू शकला नसावा. सगळं एकदम "सब्जेक्टिव्ह" झालं असावं. कारण "आई / बाप" म्हणून मिळालेला पोराचा स्पर्श आणि सहवास हा इतका अवर्णनीय आनंददायक आहे की याहून अधिक परमेश्वरप्राप्ती वेगळी काय असणार अशी पक्की खात्री होते. आणि असली काही उच्च दर्जाची प्राप्ती आणि हवी असेल परीक्षा तरी माझा बळी घे बाबा पण मायावी रुपात किंवा अगदी स्वप्नातही माझ्या पोराला धक्का नको लावूस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा