बंद खिडक्या घट्ट बेड्या हालवून शिणले काही
अबोल सत्ता घालुनी माना केली मान्य त्यानी
पान मांडता वेगळे कोणी माती घेउन आले
करु पाहिला विरोध आणिक झेंगट होवुन बसले
तस्त बिचारे बोलु लागले बाजु घेवोनि
लाडुसुध्धा मधेच डुलला फ़ुटता फ़ुटता फ़ुटूनी
पाठ राखण्या एकमेकांची सारे धडपडले
करु पाहिला विरोध आणिक झेंगट होवुन बसले
जरा भाषा, शुद्धी जराशी ऐसे बेत शिजले
जो तो हाणी अशुध्धासी जणु यवन हे मातले
संस्कृत आम्हा नकोच म्हणोनी म्लेंछ हे धावले
करु पाहिला विरोध आणिक झेंगट होवुन बसले
राळ उडवा, अरे शिंच्या, तसलाच तुही गड्या
उडले आमुचे जीव येथुनि जातो रे सौंगड्या
पाय निघेना म्हणोन करण्या काड्या हे रुतले
करु पाहिला विरोध आणिक झेंगट होवुन बसले
प्रतिभा आमुची तिकडे दावु इकडे फ़क्त मळमळ
ईनो घ्यायचे सल्ले देउन म्हणती झाली जळजळ
बघता बघता प्रतिसाद हे सारे गरळ होवुन गेले
करु पाहिला विरोध आणिक झेंगट होवुन बसले
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4733
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
जरा भाषा,
हाण तदमाताय
आणिक झेंगट होवुन बसले.....
सुंदर कविता...!
विचार पटले
In reply to सुंदर कविता...! by विसोबा खेचर
सहमत....
In reply to सुंदर कविता...! by विसोबा खेचर
:)
In reply to सहमत.... by प्रभाकर पेठकर
धन्यवाद...
In reply to :) by विसोबा खेचर
जाहिर माफी
:)
In reply to जाहिर माफी by आंबोळी
हम्म
खरे बोललात.
In reply to हम्म by आजानुकर्ण
मस्त रे
जास्तीच आंबलय