Skip to main content

(गाडी सुटली , रुमाल हलले)

लेखक अडगळ यांनी गुरुवार, 16/12/2010 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ कविता : संदीप खरे गाडी सुटली , हमाल हलले , काढा चाळीस पटकन बोले, गाडी सुटली , पाकीट निघता , हमाल डोळे हसरे झाले, गाडी सुटली नोट वीसाची , हातामधुनि तरी सुटेना , चार बोचकी चाळीस रुपडे , पटू दे म्हटले तरी पटेना, का रे इतका जीव जाळुनी , नोट वीसाची हाती मिळते, डोळ्यादेखत गायब होते , खुर्दा चिल्लर हाती उरते. गाडी गेली फलाटावरी , लालपणाचा गलका झाला, गाडी गेली , सोडा मारुन जीव तापला हलका झाला. हे भलते अवजड असते , कुणी प्रचंडसे पेटारे , ते लांब लांब नेताना, डोक्याच्या उप्पर आणि काहिसे खूप घेताना, पायांनी झाडत लाथा , घुसवीत मुंडके माथा, कुणी ढांगेखालुनि घुसतो, कुणी बगलेमधुनि घुसते. हे भलते अवघड असते. कधी टाकून कोठे टोपी , टाकून रुमाल गुलाबी , पटपटा शीटा हेराव्या , मोकळ्या नि सर्वाआधी , हे मागाहुन आलेले , पायरीत अडखळलेले, ब्यागा नि जागा मोजून , का दोन हरवल्या म्हणती. हे भलते अवघड असते. तुम्ही मनात म्हणता आता , हिच्या कानाखाली देतू, इतक्यात म्हणे ती , अय्या , मोजल्या बरोबर का तु ? ती मोजत ब्यागा सुटते अन चप्पल हरवून येते, नवर्‍याच्या चपला घालून , मग डबाच हरवून बसते. हे भलते अवघड असते. कळते की झाली वेळ, आता न पाहावी वाट , घेऊन हमाली आपली , बोळाची धरावी वाट, पाकीट उघडण्यापूर्वी , चाळीस कशाचे म्हणते, तुमचे ना माझे म्हणता , मग नोट वीसाची मिळते. हे भलते अवघड असते. परतीच्या वाटेवरती , वैतागून जड पायांनी , ओठावर शिवी पुराणी , कचकचीत अन ओघवती, मग पायांना बोळाची ती वाट खुणावत असते, सोड्याच्या घोटामध्ये हे दु:ख फस्फसत असते. हे भलते अवघड असते.
लेखनविषय:

वाचने 3345
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

कधी टाकून कोठे टोपी , टाकून रुमाल गुलाबी , पटपटा शीटा हेराव्या , मोकळ्या नि सर्वाआधी , हे मागाहुन आलेले , पायरीत अडखळलेले, ब्यागा नि जागा मोजून , का दोन हरवल्या म्हणती. छान नि मस्त.!!

कविता एकदम छान झाली आहे .. आवडली .. फक्त कळते की झाली वेळ, आता न पाहावी वाट , घेऊन हमाली आपली , बोळाची धरावी वाट, पाकीट उघडण्यापूर्वी , चाळीस कशाचे म्हणते, तुमचे ना माझे म्हणता , मग नोट वीसाची मिळते. हे भलते अवघड असते. ह्या कडव्याचा संधर्भ लागत नाहिये मला .. सांगताल का ?

अग्गग्गग्गग्गं.. लै लै भारी! अडगळीतून निघालेलं आणि एक अत्युच्च विडंबन! प्रत्येक ओळीला टाळ्या नि हशा ग्यारंटीड! मस्तच!

विडंबन झकास जमलं आहे. विशेषतः एवढ्या मोठ्या कवितेचं विडंबन करणं, लांबलचक सूत्र धरून ठेवून प्रतिकविता करणं हे सोपं काम नाही. हॅट्स ऑफ.

अडगळराव ! :-) एकदम झ्याक !

एक नंबर ईडंबन अडगळराव. मजा आली.