समाजातील काही चित्रण अशीही आहेत .. तेच देतो आहे, कविता विभागात देत होतो पण ह्या कविता नाहितच कदाचीत हे आहे चित्र आपल्या आजुबाजुचे .. यातुन एका जरी मुलाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलला तरी छान वाटेल ..
कहाणी .. १.
म्या एक चौथीतली पोर
बा न शाळा बंद केलीया
आता उजवायच म्हन्तुया मला
कोपर्या वरचा हात भट्टीवाला बबन
मागणी घालतुया मला
मायेसSन पुसल म्या
लगीन म्हंन्जी ग काय ?
चींगीचा भाउला अन माझी बाहुली
तसच हे असतय काय ?
बा माझा येडा हाय
रातच्याला लय पिऊन येतो
मायेसSन अन मला रग्गड शिव्या देतो
एक पैका पण घरात ठेवत नाय
मायेच्या जीवाला खुपच घोर
उन्हातान्हात मर मर मरती
रातंदिस काम करुनश्यान
कस बस जगती .. रडतकडत माझ्यासाठी
अशीच म्या एक अभागी पोर
काय सांगू अजून माझी कहानी
म्या नाही कुणी थोर
म्या एक चौथीतली पोर .. अभागी
वाचने
4273
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
कहाणी २ आपुण बोले तो बंम्बया
.
.
.
.
सर्वच्या सर्व प्रकटणे/ कविता
सर्व रिप्लाय देणार्यांचे
In reply to सर्वच्या सर्व प्रकटणे/ कविता by यकु
आपल्या विचारांना आणि आचारांना
In reply to सर्व रिप्लाय देणार्यांचे by गणेशा
खरच छान लिहिलं आहे.
बॉंब स्फोट ची वाचून तर रडूच
समाजातील सर्व स्तरीय मुलांचा
नि:शब्द !
सुन्न करणार्या कविता
सर्व कविता वास्तवदर्शी चित्रण
वाचवत नाही अगदी!
या सर्व कविता मनाला खुप
मस्त
सर्व कविता वास्तवाचे दर्शन
वेदना पोचल्या
सर्व वाचक मित्रांचे मनपुर्वक