हळुवार कातरवेळी
गच्च मिठी शहारलेली
चंदेरी किणार ल्यालेली
आकाशी ओढणी रंगबिरंगी
तव गालावर रेशमी
किरणांची केशरी लाली
जांभुळनयनात हरवली
गच्च मिठी शहारलेली
सोहळा रजनीगंधाचा
स्पर्श रेशमी आनंदी ..
लाजुनी दडला सूर्य
ओठांची निशब्द बोली..
---- शब्दमेघ (१४ डिसेंबर २०१०)
* अवांतर :
१. जांभुळनयन हा शब्दप्रयोग मी पहिल्यांदाच केला आहे, कदाचीत आश्चर्य वाटु शकते, पण माझ्या एका मैत्रीणेचे मोठे काळे पाणीदार डोळे पाहुन मला नेहमी जांभळाचीच आठवण यायची .. ही कविता त्या जांभुळनयनांना अर्पण ....
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2247
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
हळूवार कविता! छान आहे.
९.४७ वाजता थंडीच्या दिवसांत
व्वा!... मस्त..छान जमलिये!
हळुवार कातरवेळी गच्च मिठी
वा...सुंदर सोहळा
वा! जांभुळनयन!! मस्त शब्द.
हळुवार कातरवेळीगच्च मिठी