Skip to main content

हळूच द्या मज झोका कान्हा

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 14/12/2010 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
हळूच द्या मज झोका कान्हा
हळूच द्या मज झोका कान्हा चित्त नाही माझे थारा हळूच द्या मज झोका कान्हा ||धृ|| मन विचलीत झाले वासनांनी भरले घुसळोनी लोणी काढूनी घेती तयाप्रमाणे वासना काढाना ||१|| संसारी राहून पाही जगजेठी पापपुण्या लावी गाठी कितीक करावी तुमची आरती जन्ममरणाचा पाळणा हलवा ना ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०४/११/२०१०
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1561
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

संसारी राहून पाही जगजेठी पापपुण्या लावी गाठी कितीक करावी तुमची आरती जन्ममरणाचा पाळणा हलवा ना छान

घुसळोनी लोणी काढूनी घेती तयाप्रमाणे वासना काढाना व्वा ! खुपच मस्त !! लई भारी

मस्त