साहित्य :- वीस-पंचवीस मोठे आवळे, एक वाटी मीठ, एक वाटी तेल, पाव वाटी मोहरीची डाळ, अर्धी वाटी मिरची पावडर, तीन टे.स्पुन जिरे, तीन टे. स्पुन ओवा, दोन टे. स्पुन पांदेलोण.
कॄती :- प्रथम आवळे चाळणीवर ठेवुन सात-आठ मिनिटे वाफ़वून घ्या, नंतर त्यातील बिया काढून टाका,
प्रत्येक आवळ्याच्या चार फ़ोडी हलक्या हाताने करा, नाहितर लगदा कराल, मोहरीची डाळ थोडावेळ उन्हात
ठेवावी, व नंतर त्याची पुड बनवा, पुड खुप बारीक नको. त्यात थोडे म्हणजे अर्धी वाटी पाणी घालुन ती चांगली फ़ेसुन घ्यावी.ओवा-जिरे न भाजता पूड बनवा,आता हे सगळे एकत्र करा. एक स्वच्छ बरणी घेउन त्यात् तळाला थोडे मीठ पसरवा, व त्यात सर्व एकत्र कालविलेले आवळे फ़ोडी सह भरा. तेल चांगले गरम करुन गार करा, त्यावर तेल घाला. ही बरणी रोज सकाळपासून दुपारपर्यंत उन्हात ठेवा ..आठ-दहा दिवस ठेवा.
आठ- दहा दिवसानंतर मस्त आवळा लोणचे तय्यार.
वाचने
6914
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त!
कर ग उद्याच...आणी दे इकडे
In reply to मस्त! by पैसा
वा!
फ़ेसुन घ्यावी??
हो थोडे पाणी घेउन चांगली
In reply to फ़ेसुन घ्यावी?? by रुपी
फार आवडायचे
फोटु ?? धाग्याचा निषेध !!
हा घ्या फोटो