मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आवळ्याचे लोणचे----

निवेदिता-ताई · · पाककृती
साहित्य :- वीस-पंचवीस मोठे आवळे, एक वाटी मीठ, एक वाटी तेल, पाव वाटी मोहरीची डाळ, अर्धी वाटी मिरची पावडर, तीन टे.स्पुन जिरे, तीन टे. स्पुन ओवा, दोन टे. स्पुन पांदेलोण. कॄती :- प्रथम आवळे चाळणीवर ठेवुन सात-आठ मिनिटे वाफ़वून घ्या, नंतर त्यातील बिया काढून टाका, प्रत्येक आवळ्याच्या चार फ़ोडी हलक्या हाताने करा, नाहितर लगदा कराल, मोहरीची डाळ थोडावेळ उन्हात ठेवावी, व नंतर त्याची पुड बनवा, पुड खुप बारीक नको. त्यात थोडे म्हणजे अर्धी वाटी पाणी घालुन ती चांगली फ़ेसुन घ्यावी.ओवा-जिरे न भाजता पूड बनवा,आता हे सगळे एकत्र करा. एक स्वच्छ बरणी घेउन त्यात् तळाला थोडे मीठ पसरवा, व त्यात सर्व एकत्र कालविलेले आवळे फ़ोडी सह भरा. तेल चांगले गरम करुन गार करा, त्यावर तेल घाला. ही बरणी रोज सकाळपासून दुपारपर्यंत उन्हात ठेवा ..आठ-दहा दिवस ठेवा. आठ- दहा दिवसानंतर मस्त आवळा लोणचे तय्यार.

वाचने 6910 वाचनखूण प्रतिक्रिया 8

पैसा 12/12/2010 - 22:36
आताच तोंडाला पाणी सुटलंय. मी काल आवळे आणलेत. पण मोहरी फेसून पाकृ कुठे मिळत नव्हती. उद्या करतेच!

भानस 13/12/2010 - 04:23
तोंपासु... :) लगेच करावेसे वाटतेय पण.... इतक्या स्नोमध्ये आता कुठून आणावे.... :( फोटो दिला आहेस का गं बरोबर... ( का फक्त मलाच दिसत नाहीये?? )

रुपी 14/12/2010 - 02:58
डाळ फ़ेसुन घ्यावी म्हणजे नक्की काय? आणि मग पाण्यासहीत घालायची का लोणच्यात?

आंसमा शख्स 14/12/2010 - 09:47
लहानपणी फार खायचो. एका मित्राच्या घरी मिळायचे म्हणून दर उन्हाळात त्यांच्या कडे सारखा जायचो. आवडले आता करून पाहतो.