Skip to main content

आम्ही काय म्हणूं धार्मीक

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 13/12/2010 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही काय म्हणूं धार्मीक
आम्ही काय म्हणूं धार्मीक | आम्ही जगाचे नास्तिक ||१|| आम्ही जप नाही केले कधी | रामनाम नाही आमच्या ओठी ||२|| नाही कधी घडला संतसंग | पाण्यावीण दुष्काळी मेघ ||३|| देवाचीये न लागू चरणा | धुळीच्याच पडलो प्रेमा ||४|| नाही कधी गेलो पंढरीसी | कधी नाही बोललो सावळ्याशी ||५|| कधी नाही लिन झालो | कधी नाही पायी पडलो ||६|| जपजाप्य कधी केले | आठवणीतून निघून गेले ||७|| पंढरीच्या पांडूरंगा | आलो तुझीया संगा ||८|| पापपुण्य निघुनी गेले | माझे स्वरूप तुझे झाले ||९|| सच्च्या म्हणे कोण नास्तिक? | धार्मीकही होई धार्मीक ||१०|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०४/११/२०१०
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1142
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया