Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शुचि on Mon, 12/13/2010 - 04:55
एका रूक्ष माईंड मॅपमध्ये मला अमेरीका आतापर्यंत कशी वाटली ते आपल्यापुढे मांडते आहे. हे जितकं अमेरीकेचं प्रतिबिंब आहे अर्थात तितकच माझ्या स्वभावाचंदेखील प्रतिबिंब आहे. एखाद्या लेखकाला, वैज्ञानिकाला, अभियंत्याला, एखाद्या कवीला हीच अमेरीका खूप खूप वेगळी भासू शकेल, चांगल्या अथवा वाईट कोणत्याही रीतीने. आपण प्रयत्न करू यात का हे या धाग्यात सांगण्याचा की अमेरीका व्यक्तीशःआपल्याला कशी वाटली ते? हा माईंड मॅप -
प्रत्येक देशाचे कवी, गायक , अन्य कलाकार हे त्या त्या देशाचे अघोषित राजदूत असतात. आता माझ्या व्यवहारी, रूक्ष माईंड मॅप नंतर पुढील स्वर्गीय आवाजातील फ्रँक सिनात्रा चे गाणे ऐका. त्याला कशी वाटते अमेरीका? :) ...... केवळ स्वर्गीय आवाजातील हे गाणं ऐकून कोणालाही वाटेल अमेरीका म्हणजे स्वर्ग आहे. खूप ग्लॅमरस असं हे गाणं तितकच मंतरलेलं संगीत आणि आवाज लाभलेलं. पण अमेरीका खरच अशी आहे का? चला तर चर्चा करू या. :)
  • Log in or register to post comments
  • 12299 views

प्रतिक्रिया

Submitted by गांधीवादी on Mon, 12/13/2010 - 06:32

Permalink

>>आपण प्रयत्न करू यात का हे

>>आपण प्रयत्न करू यात का हे या धाग्यात सांगण्याचा की अमेरीका व्यक्तीशःआपल्याला कशी वाटली ते? माफ करा, अमेरिकेत प्रत्यक्ष गेलेलो नाही, ऐकीव माहितीच्या आधारे मत देणे योग्य वाटत नाही. भारतीयांना या मायानगरीचे सुप्त आकर्षण आहेच, त्यामुळे इतरांच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील. >>आता माझ्या व्यवहारी, रूक्ष माईंड मॅप नंतर.......... असो, पण हे मला 'माईंड मॅप कसे करावे' यासाठी एक उत्तम नमुना म्हणून आवडला. अवांतर : कालच 'फंस गये ओबामा' हा हिंदी सिनेमा पहिले त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by सूर्य on Mon, 12/13/2010 - 11:38

In reply to >>आपण प्रयत्न करू यात का हे by गांधीवादी

Permalink

पण हे मला 'माईंड मॅप कसे

पण हे मला 'माईंड मॅप कसे करावे' यासाठी एक उत्तम नमुना म्हणून आवडला. अगदी हेच म्हणतो. माईंड मॅप कसे करावे हे लक्षात येत आहे. तसेच बहुतेक सर्व मतांशी सहमत आहे. - सूर्य.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 12/13/2010 - 06:36

Permalink

+१

श्री. गांधीवादी यांच्या प्रत्येक शब्दाशी सहमत असाच नकाशा जर मुंबईच्या बाबतीत बनवला तर नक्की मत मांडेन
  • Log in or register to post comments

Submitted by मराठे on Mon, 12/13/2010 - 07:03

Permalink

माईंडमॅप मस्त

माईंडमॅप मस्त जमलाय. अमेरिकेबद्धल आवडणारी गोष्टः मी अमेरिकेत राहायला आल्यानंतर मला माझ्या कुटूंबासाठी जास्त वेळ देता येउ लागला. भारतात असताना दिवसांतले २-३ तास प्रवासात जात. त्यानंतर बायको-मुलाबरोबर फारसा वेळ मिळत नसे. त्याचप्रमाणे भारतात असताना सारखं वेगवेगळ्या प्रॉजेक्ट्स साठी फिरावं लागायचं. इथे आल्यानंतर सुदैवाने मी ५-५:३० पर्यंत घरी येउ शकतो. नंतरचा सगळा वेळ कुटूंबासाठी देता येतो. अमेरिकेबद्धल न आवडणारी गोष्टः जवळ पैसा / सुबत्ता आहे म्हणून जरूरीपेक्षा जास्त खरेदी करणे व त्यापायी निसर्गसंपत्तीचा , पैशाचा अपव्यय करणे. एक उदाहरण म्हणून सांगतो, इथल्या शाळेत मुलगा जायला लागला तेव्हा त्याला मधल्या सुट्टीसाठी दिलेला डबा जर संपला नाही तर उरलेलं सरळ कचर्‍याच्या डब्यात फेकायला सांगतात. हे आम्हाला जेव्हा समजलं तेव्हा मग आम्हीच त्याला उरलेलं न फेकता डब्यातंच ठेवायला सांगितलं. ही "फेकायची" वृत्ती मला अजिबात आवडत नाही. ("थोडा खाओ थोडा फेको"... जाने भी दो यारों)
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 12/13/2010 - 08:33

Permalink

वर केलेला अमेरिकेच्या आकलनाचा

वर केलेला अमेरिकेच्या आकलनाचा विचार, त्यात फेड या संस्थेचा अंतर्भाव नसल्याने अर्धवट आहे. सबब प्रतिसाद नाही. मात्र इतरांचे प्रतिसाद वाचत आहे :)
  • Log in or register to post comments

Submitted by चांगभलं on Mon, 12/13/2010 - 09:36

In reply to वर केलेला अमेरिकेच्या आकलनाचा by अवलिया

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Mon, 12/13/2010 - 10:16

Permalink

विषय चांगला आहे.

पण चर्चेत भाग घेणे शक्य नाही. सं.मं.ला विनंती. धागा "फक्त अनिवासी भारतियांच्या प्रतिक्रीयेसाठी" असा मार्क करावा. (निवासी भारतीय) चिंतामणी
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Mon, 12/13/2010 - 13:25

In reply to विषय चांगला आहे. by चिंतामणी

Permalink

विषय चांगला आहे. पण चर्चेत

विषय चांगला आहे. पण चर्चेत भाग घेणे शक्य नाही. शुचीनी विसा दिला तर जाइन न मग काय ते सन्गेन. (अनिवासी भारतीय)
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Mon, 12/13/2010 - 13:26

In reply to विषय चांगला आहे. पण चर्चेत by पर्नल नेने मराठे

Permalink

शुचि कधीपासुन विसा द्यायला

शुचि कधीपासुन विसा द्यायला लागली?
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Mon, 12/13/2010 - 13:28

In reply to शुचि कधीपासुन विसा द्यायला by शिल्पा ब

Permalink

आतातर तिला द्यावाच लागेल कय

आतातर तिला द्यावाच लागेल ;) कय ते $ घे पण मला स्पॉन्सर करच ग =))
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Mon, 12/13/2010 - 13:30

In reply to आतातर तिला द्यावाच लागेल कय by पर्नल नेने मराठे

Permalink

LOL

LOL
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Mon, 12/13/2010 - 14:23

In reply to आतातर तिला द्यावाच लागेल कय by पर्नल नेने मराठे

Permalink

नेऊन आण

पूर्वी म्हातारी मंडळी "एकदा मला काशीला नेऊन आण" असे म्हणायची त्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Mon, 12/13/2010 - 14:24

In reply to नेऊन आण by नितिन थत्ते

Permalink

:)

रोचक प्रतिसाद. चुचुआज्जींची प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Mon, 12/13/2010 - 14:25

In reply to नेऊन आण by नितिन थत्ते

Permalink

आपण अजूनही तरुण आहात (असे

आपण अजूनही तरुण आहात (असे आपल्याला वाटते ) याची दखल घेतली आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Mon, 12/13/2010 - 14:39

In reply to नेऊन आण by नितिन थत्ते

Permalink

ह्यांना म्हातारी न काशी ह्या

ह्यांना म्हातारी न काशी ह्या शिवाय दुसरे काही दिसतच नाही :( ह्यानांच अमेरिकेला पाठवायची खरी गरज आहे. शुचे , मला नको पण ह्या थत्तेंना विसा दे ग बै !!! ;) आणी ह्यांना पब , कसिनो न काय ते तिकदे नेउन आण =))
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Mon, 12/13/2010 - 14:42

In reply to ह्यांना म्हातारी न काशी ह्या by पर्नल नेने मराठे

Permalink

पब अन कासिनोत काय असतं? दारू

पब अन कासिनोत काय असतं? दारू अन जुगार...तिकडे गेल्याने काय फरक पडतो गं चुचु?
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Mon, 12/13/2010 - 14:49

In reply to पब अन कासिनोत काय असतं? दारू by शिल्पा ब

Permalink

ह्म्म्..........ह्याला उत्तर

ह्म्म्..........ह्याला उत्तर द्यायची जबाबदारी नानाने उचलली आहे हे ग्रुहित धरुयात ;)
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Mon, 12/13/2010 - 15:07

In reply to ह्म्म्..........ह्याला उत्तर by पर्नल नेने मराठे

Permalink

असं नाना ला गृहीत धरुन सिंगल

असं नाना ला गृहीत धरुन सिंगल आउट करणे मला जाम खटकलेले आहे. ... कृपया णाणातर्फे चुचुवर शिस्तभंगाची कार्यवाही व्हावी. - चम्चु
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Mon, 12/13/2010 - 15:11

In reply to असं नाना ला गृहीत धरुन सिंगल by टारझन

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Mon, 12/13/2010 - 15:21

In reply to असं नाना ला गृहीत धरुन सिंगल by टारझन

Permalink

टार्‍या नको असे करुस, आपलिच

टार्‍या नको असे करुस, आपलिच मानसे आहेत. सोडुन दे. अ‍ॅक्चुलि त्या बाया आहेत, पन त्या आपल्याच बाया आहेत असे लिहिने चान्ग्ले वाटत नाय.
  • Log in or register to post comments

Submitted by बद्दु on Mon, 12/13/2010 - 17:44

In reply to टार्‍या नको असे करुस, आपलिच by नरेशकुमार

Permalink

हे हे हे हे हे

हे हे हे हे हेहे हे हे हे हेहे हे हे हे हे
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Mon, 12/13/2010 - 15:13

In reply to ह्यांना म्हातारी न काशी ह्या by पर्नल नेने मराठे

Permalink

चालेल

>>शुचे , मला नको पण ह्या थत्तेंना विसा दे ग बै !!! Wink आणी ह्यांना पब , कसिनो न काय ते तिकदे नेउन आण पण ते व्हिश्यासाठी $ तूच देणार ना? ता. क. आणि पब + कॅसिनोचे $ वेगळे इकडे आधीच पाठवून द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 12/13/2010 - 14:36

In reply to विषय चांगला आहे. by चिंतामणी

Permalink

+१

"फक्त अनिवासी भारतियांच्या प्रतिक्रीयेसाठी" असा मार्क करावा.
विशिष्ठ लोकांनी विशिष्ठ लोकांसाठी काढलेला अजुन एक धागा. चालु द्या...
तुम्हाला अमेरीका कशी वाटते?
त्यानी अमेरीकेला किंवा अमेरीकस्नना काय शाट फरक पडतो ?
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 12/13/2010 - 17:10

In reply to +१ by परिकथेतील राजकुमार

Permalink

+२

त्यानी अमेरीकेला किंवा अमेरीकस्नना काय शाट फरक पडतो ? Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Mon, 12/13/2010 - 10:30

Permalink

:)

सुंदर सुंदर साड्यां घेंण्या जांयचे कोठे ..... सांग णा सखये .. मज तु सांग णा सखये ... -(१०१ मेगाहर्टझ्) आर्जे टारझन अय्या टारझन तु बाळाराम मधे कसा ? नाकापोका चिंगापो पिकाचुका नाकांगा
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Mon, 12/13/2010 - 10:44

In reply to :) by टारझन

Permalink

टार्‍या साड्या म्हणटले कि साले अमेरिकन सिक्युरिटी वाले

रांगेतुन बाहेर नेवुन झडती घेतात.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Mon, 12/13/2010 - 10:51

In reply to टार्‍या साड्या म्हणटले कि साले अमेरिकन सिक्युरिटी वाले by वेताळ

Permalink

:)

हा प्रतिसाद कोणाला झेपेल की नाही ह्या बाबद साशंक होतो ... पण वेताळ ने बरोबर मुद्द्यावर बोट ठेऊन मला गहिवरुन आणलेले आहे. वा वेताळ .. .तुम्हीच देशहितार्थ प्रतिसाद देऊ शकतात . - पेताड
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Mon, 12/13/2010 - 10:58

In reply to :) by टारझन

Permalink

डोल्ल्यात पानी आले.

टारझनसुध्दा गहिवरतो हे वाचुन डोल्ल्यात पानी आले.
  • Log in or register to post comments

Submitted by युयुत्सु on Mon, 12/13/2010 - 10:34

Permalink

विलासलालसा विलासीनां यद्देशे

विलासलालसा विलासीनां यद्देशे परिपूर्यते। मनोरथानां सा भूमि: अमेरीका इति उच्यते॥ अर्थ- विलासी लोकांच्या विलासाच्या इच्छा ज्या देशात पूर्ण होतात त्या मनोरथांच्या भूमीला अमेरीका असे म्हणतात. (या ऋचेचे कर्ते ऋषि आम्हीच! - युयुत्सु)
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 12/13/2010 - 10:54

Permalink

हं..

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Mon, 12/13/2010 - 10:56

In reply to हं.. by गवि

Permalink

वाsssssव! सुरेख!!

वाsssssव! सुरेख!!
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Mon, 12/13/2010 - 10:59

Permalink

हे अमेरिकेला जाणार्‍याच्या वयावर अवलंबून आहे

मी वयाच्या ३६व्या वर्षापासून आणि अनिवासी भारतीय नव्हतो तेंव्हांपासून अमेरिकेला कंपनीच्या कामांसाठी वारंवार जात आलेलो आहे आणि अलीकडे माझी दोन्ही मुले आणि दोन्ही नाती (granddaughters) तिथे असल्याने 'रतीबा'सारखा जातो! माझ्या मते तारुण्यात प्रकृती ठणठणीत असताना अमेरिकेसारखा दुसरा देश नाही आणि वाढत्या वयाबरोबर प्रकृती उताराला लागली कीं भारतासारखा दुसरा देश नाहीं!
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Mon, 12/13/2010 - 10:58

Permalink

सुंदर चित्र.......

अतिशय अभ्यासपुर्ण निष्कर्ष काढला आहे. तरुण वयात जाण्यासाठी????? ह्याबद्दल नीट माहिती द्याल का काका? आम्ही तर तरुणांसाठी पुर्वेतील एका देशाचे नाव एकुन होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Mon, 12/13/2010 - 11:04

Permalink

मनातील शंकासुरासारखा दुसरा असुर नाहीं!

हाहाहा! मनातील शंकासुरासारखा दुसरा असुर नाहीं! तरुणपणी औषधोपचार लागत नाहींत आणि म्हातारपणी अमेरिकेतील औषधोपचार परवडत नाहींत!
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 12/13/2010 - 11:09

In reply to मनातील शंकासुरासारखा दुसरा असुर नाहीं! by सुधीर काळे

Permalink

तरुण वयात

तरुण वयात जाण्यासाठी????? ह्याबद्दल नीट माहिती द्याल का काका? आम्ही तर तरुणांसाठी पुर्वेतील एका देशाचे नाव एकुन होतो. तरुणांसाठी असलेल्या पूर्वेकडील उपरिनिर्दिष्ट देशात तरुणपणी गेल्यास तातडीने आणि दीर्घकालीन औषधोपचारांची गरज पडण्याची "रिस्क" असते.. असे ऐकतो.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Mon, 12/13/2010 - 11:11

Permalink

अलिकडे जपाणी तेलाची जाहिरात

अलिकडे जपाणी तेलाची जाहिरात जोरदार चालते टिव्ही वर @@ गेल्या आठवड्यात बाबांबरोबर टिव्ही पहात होतो ... ही जाहिरात कसली आहे माहितीच नव्हती. एक गारुडी येतो .. पेटारा खोलतो .. आणि त्यातल्या णागा समोर पुंगी वाजवायला लागतो .. णाग जागचा ढिंम्म हालत नाही ... ते पाहून बाबा आणि मी लै मोठमोठ्याने खोखो-धोधो स्टाईल मधे हसलो .. . तोच गारुडी खिशातुन एका तेलाची बाटली काढतो आणि त्या णागावर टाकतो ... तोच णाग एकदम फना काढुन २ फुट उभा रहातो . मग "जापानी तेल ... आपके सबसे *** पलो का साथी " नंतर बाबा गॅलरीत निघुन जातात .. आणि मी ओशाळलेल्या तोंडाने पाणी प्यायला किचन मधे जातो . असो . तात्पर्य ज्या म्हातार्‍यांना औषधोपचार परवडत नाही त्यांन्ना स्मृती समर्पित ;) - टारुं चुं सुं
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Mon, 12/13/2010 - 11:52

In reply to अलिकडे जपाणी तेलाची जाहिरात by टारझन

Permalink

तोच णाग एकदम फना काढुन २ फुट

तोच णाग एकदम फना काढुन २ फुट उभा रहातो . प्रसन्ग अगदि डोळ्यासमोर ताठ उभा केला आहेस.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 12/13/2010 - 11:21

Permalink

शुची झकास माइन्ड मॅप

शुची झकास माइन्ड मॅप
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Mon, 12/13/2010 - 11:26

Permalink

<<<तुम्हाला अमेरीका कशी

<<<तुम्हाला अमेरीका कशी वाटते? इथे सासरचे नसल्याने मोकळं आणि रीलॅक्स वाटतंय ;)
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Mon, 12/13/2010 - 11:29

In reply to <<<तुम्हाला अमेरीका कशी by शिल्पा ब

Permalink

इथे अमेरिकेविषयी तुमची मते

इथे अमेरिकेविषयी तुमची मते काय आहेत असे अपेक्षित असावे. आपण दिलेले उत्तर तुम्ही सासरी सोडुन कुठेही असता तरी लागु पडते असे वाटते. चु.भु.द्या.घ्या. - लादेण
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Mon, 12/13/2010 - 11:33

In reply to इथे अमेरिकेविषयी तुमची मते by टारझन

Permalink

हो, पण भारतात कुठेही असले तरी

हो, पण भारतात कुठेही असले तरी सासरचे टपकतातच....हे बरंच लांब आणि महाग (हेल्थ इन्शुरन्स वगैरे) पडते...त्यामुळे थोडे सुख...आणि हेच आमचे अमेरिकेबद्दलचे मत आहे...काय प्रॉब्लेम?
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Mon, 12/13/2010 - 11:42

In reply to हो, पण भारतात कुठेही असले तरी by शिल्पा ब

Permalink

तरीच तुम्ही संस्थळावर इतका

तरीच तुम्ही संस्थळावर इतका उच्छाद मांडता वाटतं, काही बंधनंच नाहीत म्हणल्यावर काय! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Mon, 12/13/2010 - 11:45

In reply to तरीच तुम्ही संस्थळावर इतका by Nile

Permalink

मग तुम्हाला सासुरवास कोण

मग तुम्हाला सासुरवास कोण करणार? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Mon, 12/13/2010 - 12:00

In reply to हो, पण भारतात कुठेही असले तरी by शिल्पा ब

Permalink

देवा मला अशी सुन देउ नकोस

देवा मला अशी सुन देउ नकोस रे............................................................(डोळा मारन्याच चित्र ) (डोळा मारन्याच चित्र कसे लावतात ?)
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Mon, 12/13/2010 - 12:04

In reply to देवा मला अशी सुन देउ नकोस by नरेशकुमार

Permalink

हो पण मुलगी मात्र लांबच रहावी

हो पण मुलगी मात्र लांबच रहावी असं मनातल्या मनात म्हणालात की नाही? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 12/13/2010 - 12:17

In reply to देवा मला अशी सुन देउ नकोस by नरेशकुमार

Permalink

( डोळा मारन्याच चित्र कसे

( डोळा मारन्याच चित्र कसे लावतात?) हे असे Image removed. किंवा मग असे Image removed. का मग तुम्हाला हे असे म्हणायचे आहे Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Mon, 12/13/2010 - 18:08

In reply to ( डोळा मारन्याच चित्र कसे by विजुभाऊ

Permalink

इजुभौ, कन्च्या तोन्डनि

इजुभौ, कन्च्या तोन्डनि सान्गु, कि कोनत डोला मारलेलं चित्र आवल्ल ते. मला लाज वाटु र्‍हायली.
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Mon, 12/13/2010 - 11:42

Permalink

टार्‍या वर शुची काकुने एक मॅप मध्ये मुद्दा टाकला आहे बघ तो.

असा देश जिथे स्वःताची मुले शोधावी लागतात. आता तरी पटला का तो तुला?
  • Log in or register to post comments

Submitted by नरेशकुमार on Mon, 12/13/2010 - 11:57

In reply to टार्‍या वर शुची काकुने एक मॅप मध्ये मुद्दा टाकला आहे बघ तो. by वेताळ

Permalink

असा देश जिथे स्वःताची मुले

असा देश जिथे स्वःताची मुले DNA चाचन्या करुन शोधावी लागतात. अस पन आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Tue, 12/14/2010 - 01:07

In reply to असा देश जिथे स्वःताची मुले by नरेशकुमार

Permalink

चाचण्यांची जरूरी नाही.

ढकलपत्रातुन आलेला हा नमुना बघ. सगळ्या अमेरिकन मुलांची नाव, जॅकसन विलसन मार्कसन रोबिनसन केनसन जॉनसन डेविडसन जेमसन सॅमसन अशी का असतात? कारण त्यांच्या आयांना लक्षात ठेवायला बर पडत कि कोणाचा बाप कोण आहे ते.. ;)
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com