काही नाती मिरवायची असतात; मेडलसारखी
काही दाखवायची असतात; दातांसारखी
काही नाती भोगायची असतात; सम्राटासारखी
काही नाती वाहायची असतात; ओझ्यांसारखी
काही नाती ओळखायची असतात; गुपितांसारखी
काही समजून घ्यायची असतात; प्रेमासारखी
काही नाती जोडायची असतात; धाग्यांसारखी
काही पेलायची असतात; गोवर्धनासारखी
नातीगोती हातात नसतात; नशिबासारखी
म्हणूनच काही नाती विसरायची असतात; दुःखासारखी . ( संग्रहीत)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1244
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुन्दर मस्त लिहिलय