✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

"इकडचे" आणि "तिकडचे"..

ग
गवि यांनी
Fri, 12/10/2010 - 14:56  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
21412 वाचन

💬 प्रतिसाद (86)

प्रतिक्रिया

पर्याय नसतो हे खरं आहे. पण

रन्गराव
Fri, 12/10/2010 - 21:43 नवीन
पर्याय नसतो हे खरं आहे. पण तरीही असा प्रश्न पडला नाही तर सगळ व्यवस्थित चालू आहे, आपण आणि आपले मित्र बिझी आहेत अशा खोट्या समजुती काढून वेळ मारून नेता येते. असा प्रश्न पडला की समोर आरसा दिसतो, त्यात आपल्या कपाळावर लिहिलेलं असतं " स्वार्थी आणि स्वकेंद्रित". असो कधी ना कधी तर होणार असतेच हे. आज झालं काय आन उद्या झालं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

>>>पण जुनी मैत्री जी

अवलिया
Fri, 12/10/2010 - 18:51 नवीन
>>>पण जुनी मैत्री जी कालपर्यंत एव्हढी घट्ट होती ती अशी मुठीत धरलेल्या वाळूसारखी का वाटतेय असा प्रश्न पडणं स्वाभाविक असावं. याला जीवन ऐसे नाव. सतत बदल घडत असतो. घडावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

+ १

मेघवेडा
Fri, 12/10/2010 - 19:36 नवीन
फ्रेम ऑफ रेफरन्सच्या मुद्द्याबाबत खंप्लीट सहमती. आणखी एक गोष्ट म्हणजे जिथं अपेक्षा आल्या तिथंच प्रॉब्लेम्स होतात. 'नो कंप्लेंट्स, नो डिमाण्ड्स' असं क्लीयरकट तत्व असलं की प्रॉब्लेम्स येत नाहीत. म्हणजे आता मी इतक्या लांबून आलोय इकडं इतक्या काळानंतर. त्यानं/तिनं मला भेटायला इकडे यायला हवं असं धरून बसलो तर कसं चालेल. कोणतीही गोष्ट टिकवायची म्हटली की काही स्पेशल एफर्ट्स हे घ्यावेच लागतात. मैत्रीही याला अपवाद नसावी. तेव्हा जर आपणच कुठलेही आढेवेढे न घेता मित्राला भेटायला गेलो तर त्याला किती सुखद धक्का बसेल! हा विचार करत नसावं पब्लिक म्हणून तुम्ही म्हणता तशा दर्‍या आढळून येतात. बर्‍याच जणांना हे जमत नाही, त्यांचा 'मी' आड येतो आणि तिथंच सगळं अडत. जरा आपला 'मी' जरा बाजूला ठेवून भेटीगाठी केल्या तर काही विशेष प्रॉब्लेम येत नाही हा माझा स्वतःचा अनुभव! पण फ्रेम ऑफ रेफरन्स सारखी नसली की गप्पाही एका ठिकाणी येऊन थांबू शकतात हेही खरंच. परवाचा भानसताईंचा मोरपिसे! हा सुंदर लेख याचंच उदाहरण! बाकी >>जुनी मैत्री जी कालपर्यंत एव्हढी घट्ट होती ती अशी मुठीत धरलेल्या वाळूसारखी का वाटतेय असा प्रश्न पडणं स्वाभाविक असावं. खरंय.. हे व्हायचंच रे धम्या. ती वाळू हातातून कधी ना कधी सुटणारच असते की रे. वाईट वाटून घ्यायचं नाही झालं. नाना म्हणतो तसं "बदल सतत घडत असतो, घडावा!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

छान उत्तर! धमु चे

प्राजु
Fri, 12/10/2010 - 21:39 नवीन
छान उत्तर! धमु चे अभिनंदन! धीस इज लाईफ! इट हॅज टू मूव्ह ऑन! जुने मित्र जरी मागे पडले तरी तितकेच नवे मित्रही जोडले जातात. याचा अर्थ असा होत नाही की, जुने मित्र , मित्र रहातच नाहीत. भलेही तुम्ही त्याला भेटल्या भेटल्या भूतकाळातल्या गप्पा लगेच संपतील.. पण वरचे वर जर एकमेकांच्या संपर्कात राहिलात तर भेटल्यावर नेमके काय बोलायचे हा प्रश्न पडू नये. माझा अनुभव असा आहे, की.. परदेशात आल्यानंतर मला उलट जुन्या मैत्रीणी इंटरनेटच्या माध्यमातून पुन्हा मिळाल्या. ज्या भारतात असताना कुठे आहेत, काय करताहेत काहीच माहिती नव्हते. वरचेवर चँटींग , फोन मुळे भारतात भेटल्यावर काय बोलावं हा प्रश्न नाही पडला. आणि राहता राहिला प्रश्न.. इकडचे तिकडे गेल्यावर आपणहून जात नाहीत नाते वाईकांना भेटायला.. इ.इ. पण.. कोणी काहीही म्हणो.. ती फॅक्ट आहे.. वेळ कमी आणि कामे जास्ती हा प्रकार असतोच असतो. वर्ष्-दोन वर्ष तुंबलेली कामे..(सरकारी/खाजगी/घराच्या संदर्भात इ.इ.) असतातच आणि गेल्या गेल्या काम झाले आहे अशी परिस्थिती भारतात अजूनतरी नाहीये. त्यामुळे सगळ्यांना भेटायची इच्छा खूप असते.. सगळ्यांकडे जायचेही असते.. पण नाही जमत. त्यामुळे आपणच घरी एक मोठ्ठी पार्टी अरेंज करावी आणि सगळ्यांना बोलवावे.. हाच एक पर्याय असतो. शिवाय असंही असतंच.. की, आपण भलेही कोणाकडे जायला निघालो.. तर ज्याच्याकडे जायचे आहे त्यालाही वेळ हवा ना! सगळीच मूठ वळायची अवघड असते.. मग कुठेतरी कधीतरी तो योग जुळून येतो आणि मग गेलेले दिवस परत येतात. आणि हे चक्र चालूच असतं अशाप्रकारे. संबंधांवर थोडी धूळ बसते.. ती साफ करावीच लागते अधूनमधून. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

योग्य विश्लेषण...

चिगो
Sat, 12/11/2010 - 10:38 नवीन
बरोबर बोलतोय धमुभौ... "फ्रेम ऑफ रेफरन्स" अतिशय महत्त्वाची असते.. मी माझ्या शाळेतल्या मित्रांसोबत (दहावीपर्यंतच्या) गप्पा मारतांना जी धमाल केली त्यावर वारंवार बोलू शकतो. पण त्याच मित्रांनी मी तिथून गेल्यावर अकरावी-बारावीत ज्या मस्त्या केल्या, त्यांच्याशी मला रिलेट करता येत नाही.. सेम कॉलेजच्या मित्रांबद्दल. आता कलिग्स आणि नोकरीतल्या मित्रांशी जे बोलतो तसंच शाळेतल्या मित्रांशी नाही बोलू शकत.. त्यामुळे मित्र बदलतात, त्यामुळे मैत्रीही बदलते... बाकी गवि... लगे रहो.. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

ही फ्रेम ऑफ रेफरंस

प्रभो
Sat, 12/11/2010 - 10:56 नवीन
@धम्या: ही फ्रेम ऑफ रेफरंस 'ब्लेंडर्स' च्या आधीची का नंतरची?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

@आयुष्यभरात ठराविकच मित्र

निनाद मुक्काम …
Fri, 12/10/2010 - 18:30 नवीन
@आयुष्यभरात ठराविकच मित्र असतात का? ते मित्र होण्याच्या आधीच्या मित्रांचं काय झालं? दोन मित्र दुरावले की त्यांचे आयुष्यचं उद्ध्वस्त झाले का? तुम्ही जगाच्या कोपर्यात कुठेही राहा प्रिय मैत्रिणीच्या आयुष्यात नवरा नामक शुद्र कीटक आला कि तिची तुमची ताटातूट पक्की मग .
  • Log in or register to post comments

तुम्ही जगाच्या कोपर्यात

Nile
Fri, 12/10/2010 - 19:15 नवीन
तुम्ही जगाच्या कोपर्यात कुठेही राहा प्रिय मैत्रिणीच्या आयुष्यात नवरा नामक शुद्र कीटक आला कि तिची तुमची ताटातूट पक्की मग
तुमच्या साठी ती एक अत्यंत प्रिय मैत्रीण असेल पण तिला तुमच्या पेक्षा प्रिय मित्र मिळाला असा याच अर्थ होत नाही याबद्दल तुम्हाला खात्री आहे का? किंवा, तुमच्या शब्दात, तिच्या जीवना तुम्ही शुद्र किटक होतात पण मग तिला तो भेटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

मला मुळात इकडंच आणि तिकडचं

यकु
Fri, 12/10/2010 - 18:47 नवीन
मला मुळात इकडंच आणि तिकडचं असा फारसा फरक वाटत नाही. दोस्त ते दोस्तच! हां, तिकडे राहात असल्यावर/ जाऊन आल्यावर थोडे थिजून गप्प होतात, पहिल्यासारखे मोकळेढाकळे राहात नाहीत एवढं मात्र अनुभवलंय. थोड्याशा गफ्फा केल्या की पुन्हा पहिल्यासारखे मोकळेढाकळे होतातच! आणि इकडं राहूनही तिकडे डोळे लाऊन बसलेले आणि तिकडं राहूनही इकडं डोळे लाऊन बसलेले पण अनेक जण असतात (ब्लॉग वगैरेंमुळे तर हे स्पष्टपणे दिसतं). तिकडच्याला कंटाळले की इकडे आणि इकड्च्याला कंटाळले की तिकडे.
  • Log in or register to post comments

आमचं मत

छोटा डॉन
Fri, 12/10/2010 - 19:39 नवीन
आमचं एक मत अतिशय चिंतनीय आहे ;) "ह्या जगात कुणी कुणाचा मित्र वगैरे नसतो, अगदीच जर फार प्रेम वगैरे असेल तर फार्फार तर हितचिंतक असु शकतो" सच्चा मित्र एकच .... आपण स्वत: " - ( सर्वांचा हितचिंतक ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments

व्वा?

ईन्टरफेल
Fri, 12/10/2010 - 20:34 नवीन
व्वा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

मैत्रीत कसली आलीये दुर्घटना??

असुर
Fri, 12/10/2010 - 19:55 नवीन
आयच्या गावात! मैत्रीत कसली आलीये दुर्घटना?? मैत्री तर कुठेही असा कायमच राहते असा आपला कायमचा अनुभव आहे. कुणी परदेशी गेला तर काय झालं? च्यायला, असल्या गोष्टी आयुष्यात होतच राहतात, त्यांना प्रत्येक वेळी दुर्घटना म्हटलं तर आयुष्यभर नुसती फ्रॅक्चर आणि मलमपट्ट्या मोजायला लागतील! एखादा मित्र/एखादी मैत्रीण दूर जातो/जाते, पूर्वीसारखा वेळ देऊ शकत नाही तर हे बाकी मित्रांनीदेखील समजून घेतलं पाहीजे. बर्‍याच वेळ देऊ शकत नाही याचं कारण टाईमझोनचा फरक हेही (रादर हेच) असतं. दर वेळी दुर्घटनाच असेल असं नाही! माझा वैयक्तिक अनुभव या बाबतीत फार चांगला आहे. माझे मित्र आणि मी आजही फोनवरून तासनतास गफ्फा मारतो. मी परत गेलो होतो तेव्हाही कुणालाही असं वाटलं नाही की मी काय फार दिवसांनी उगवलो वगैरे. सगळं अगदी मागच्या पानावरुन पुढे सुरु झालं. यात सर्व क्रेडीट माझ्या मित्रांचं आहे. त्यांनी मला या काळात खूप सांभाळून आणि समजून घेतलं! मला मिपावरुन मिळालेले मित्र, ज्यांच्याशी परदेशात असताना इंटरनेटवरुन मैत्री झाली आणि नंतर जे मला भारतात भेटले, त्यांच्याशीसुद्धा आजही चांगला काँटॅक्ट आहे. थँक्स टु मिपा आणि माझे मित्र!! मग हा दुर्घटनेचा रुल कुठे लागू झाला? कुठेही नाही! आणि जसं मी म्हणतोय तसंच थोड्याफार फरकाने बाकीचेदेखील म्हणतील. मग हे जेनेरिकदेखील नाहीये ना! गवि, तुमचं दुर्घटनेचं लॉजिक लावलं ना, तर मित्र/मैत्रीणी दुरावण्याचा सर्वात मोठा अ‍ॅक्सिडेंट तर 'लग्न' म्हणावा लागेल. --असुर
  • Log in or register to post comments

तिकडे राहणारे

आनंद घारे
Fri, 12/10/2010 - 20:08 नवीन
तिकडे राहणारे बहुतेक लोक तिथे सुध्दा इकडच्यासारखेच राहतात आणि आपापल्या घरात आपापला भारत किंवा महाराष्ट्र निर्माण करतात असेच मला दिसले आहे. काही वेळा तिकडे जाऊन परत इकडे आलेला.
  • Log in or register to post comments

इकडे- तिकडे

उपास
Fri, 12/10/2010 - 21:03 नवीन
छे, मी तर उलट म्हणतो गेल्या दहा-वीस वर्षात जग खूप जवळ आलय.. आता तर मी केव्हाही कुठल्याही मित्राला फोन करुन हवं तितकं बोलू शकतो.. त्यांचेही फोन येतात.. वेब कॅम तर अस्तातच.. बरेचदा मी इथून कित्येकांशी तासन तास बोलतो पण मुंबईतल्या मुंबईत त्यांना भेटायला होत नाही महिन्यामहिन्यात.. कुठेतरी एखाद्या लग्नात सगळे भेटतात (ते सुद्धा पोराबाळांच्या तब्येती ठीक असतील तर आणि मेगाब्लॉक नसेल तर..) तिकडे गेलो तर मात्र सगळेच प्रयत्न करतो एकत्र येण्याचा इन्फॅक्ट इथले दोघ तीघ एकदम जाण्याचं जमवू शकलो तर मात्र सगळेच हातातलं जे आहे ते टाकून येतातच.. तात्पर्यः मित्र बदलत राहातातच पण जुने मित्र तुटत नाहीच, जग पुढे चाल्लेय.. ऑरकट, फेसबुक मुळे तर We are always there, just a scrap away.. ;) आणि अडल्या नडल्याला प्रत्यक्ष उपस्थितीत मदत नसली तरी मोरली आणि आर्थिक मदतीचा हात असतोच असतो... शिवाय माझ्या अनुपस्थितीत घरच्यांना काही हवं नको असेल तर बघायला विश्व्वासाने मित्रमंडळी असतातच.. एकंदर जे आहे त्यात चांगली बाजूही आहेच खूप सारी!
  • Log in or register to post comments

होय दुर्घटनाच!!

शुचि
Fri, 12/10/2010 - 21:14 नवीन
मी गरोदर असताना माझ्या ३ मैत्रिणींनी माझी खूप काळजी घेतली कारण मी एकटी होते. नवरा जहाजावर होता. अर्थात ही काळजी आठव्या महीन्यात खाणं-पीणं सांभाळणं यापासून ते मन प्रसन्न ठेवनं , फोन करणं, मॉरल सपोर्ट देणं व अनेक प्रकारची होती. (नवव्या महीन्यात मी आईबाबांकडे पुण्याला गेले) तीघींनाही सोडून अमेरीकेला जाताना खूप वाईट वाटलं. तीघींनाही मी "आई" नावाचं कवितांचं पुस्तक भेट दिलं. त्यांनी मला इकडे (अमेरीकेत) खायला मिळणार नाही म्हणून ईडली, डोसा,पाणीपुरी स्वतः करून खाऊ घातली. मला खूप शुभेच्छा दिल्या. तीघींनी माझ्या आत्म्याला अपार संतुष्टी दिली, मला माया दिली. ज्योतिष शस्त्रात चवथं घर असतं जे - आई, अन्न, मन, भावना , संवेदनशीलता यांचहं कारक असतं. अतिशय प्रेमाने वाढलेल्या अन्नाने फक्त शरीर पोसले जात नसते तर आत्मा तोषत असतो. या तीघीजणी माझ्या पासून दुरावल्या ही दुर्घटनाच होती.
  • Log in or register to post comments

डॉन्रावांनी माझं नाव पहिल्याच प्रतिसादात टाकल्यामुळे

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 12/10/2010 - 21:30 नवीन
डॉन्रावांनी माझं नाव पहिल्याच प्रतिसादात टाकल्यामुळे... लहानपणापासून मित्र-मैत्रिणी जोडायचा आणि पुढे गेल्यावर नवीन मैत्र जोडताना मागच्यांशी संपर्क राहिला नसेल तर मुद्दाम न करण्याचा माझा स्वभावच असावा. दोन शाळा, दोन कॉलेजेस, दोन विद्यापीठं, शिवाय हौशी खगोलाभ्यासकांचा ग्रूप, एक नोकरी आणि आता मिपा अशा नऊ ठिकाणीतरी मी बर्‍यापैकी वेळ घालवला (?) आहे. या बर्‍याचशा ठिकाणचे मित्र-मैत्रिणी म्युचुअली एक्सक्लुझिव्ह (मराठी शब्द?) आहेत. यातलं एकाच ठिकाण परदेशात असलं तरीही बहुतेकशा जुन्या मित्रांशी* माझे फारसे संबंध राहिले नाहीत. जे कोणी इंटरनेटवर आहेत त्यांच्याशी संबंध टिकले, काही लोकं माझ्यासारखेच आहेत त्यामुळे सहा महिन्यांनी संपर्क झाला तरीही कालच एकत्र जेवल्यासारखे आम्ही गप्पा मारतो, सुखदु:ख शेअर करतो. तस्मात परदेशगमन हीच गोष्ट माझ्यासाठी मैत्रीत बाधा आणणारी ठरलेली नाही. ("क्षीण प्रयत्नांच्या" आरोपाचा दोष स्वीकारत...) आज बरोब्बर एक आठवडा झाला, आयुष्यात अमेरिकेत पहिल्यांदा पाऊल ठेवल्याला! इथे येऊन २४ तास पूर्ण झाले नाहीत तर "कशी काय वाटली अमेरीका, ऑस्टीन", "भेटलीस, बोललीस का अमक्या तमक्यांशी?" वगैरे प्रश्नांना खरी उत्तरं द्यावीत का खोटी हा प्रश्न मला पडला. बरं हे प्रश्न विचारणारे इथले आणि तिथले दोन्हीकडचे आहेत. अमेरिका कशी वाटली या प्रश्नाचं उत्तर एका शहराचा तुकडा पाहून मला तरी देता येणार नाही आणि "ऑस्टीन आवडलं का" या प्रश्नाचं उत्तर एका आठवड्यात कसं देणार? नवीन गाडी घेणे**, मोठमोठे मॉल्स असणे, घरात स्वच्छ पाणी असणे (डोंबिवलीकर असाल तरीही), शहरातले काही रस्तेतरी प्रशस्त असणे, महागडे परफ्यूम्स, चॉकलेट्स दुकानात उपलब्ध असणे, या गोष्टी काही फक्त पाश्चात्य देशापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. कदाचित मला या गोष्टींचं खूप जास्त आकर्षण नसल्यामुळेही असेल. उलट परदेशातच थालिपीठाची भाजणी, पोहे, साबुदाणे इ. गोष्टी मिळत नाहीत म्हणून तिथेच मलातरी जास्त वाईट वाटतं. आपल्याकडे 'टॉब्लरॉन' येऊन अनेक वर्ष झाली, हल्ली 'लिंड्ट' वगैरेही चॉकलेट्स मिळतात तर बेडेकरांचा गोडा मसाला मँचेस्टरमधे का मिळत नाही? कदाचित "एका परदेशात" तीन वर्ष रहाण्याचा अनुभव असेल म्हणूनही असेल पण घरी, भारतातल्या लोकांशी गप्पा झाल्या की काल काय खाल्लं, अमुक एक गोष्ट करताना कशी माझी गंमत झाली, तो अमका-ढमका भेटला आणि काय-काय गप्पा झाल्या अशाच गप्पा फोन, चॅट, स्काईपवर होतात. या अशाच गप्पा ठाण्या-पुण्यात असतानाही होत होत्या. अमेरिकेत असंच आहे आणि भारतात कसं काय वाईट आहे अशाच गप्पा मारण्यापुरती ओळख असेल तर त्याला खरंच मैत्री म्हणता येईल का? काही नवीन दिसलं तर ते सांगावंसं वाटणं वेगळं आणि फक्त तिथेच गाडी अडकणं वेगळं! अशी 'मैत्री' मुळात खरोखरच होती का याचा कधी विचार झाला आहे का? हा प्रतिसाद लिहीण्याआधीच एका आंतरजालीय मैत्रिणीशी गप्पा संपल्या, तेव्हा आधी "अमेरिकेतले माझे अनुभव" सांगून झाल्यावर शेवटी गाडी आपले अमक्या विषयांवर विचार किती जुळतात यावर येऊन स्थिरावली. वाढतं अंतर म्हणाल तर आपण कोणत्या लोकांना भेटतो, काय वाचन करतो त्यातूनही वाढू शकतो. एकेकाळी ज्याची आणि मतं अगदी सारखी होती तो माझा सख्ख्या भाऊ आता मला विचारांनी जवळ आहे असं वाटत नाही, असावा अशी अपेक्षाही नाही. असं नाही म्हणूनही समविचारी मित्र सहज जोडले जाऊ शकतात. संधी मिळत नाही, आईवडील आहेत याबरोबर आणखीही एक कारण असू शकतं भारतात परत येण्याचं! आपल्या देशाची सवय झालेली असते. एखाद वर्ष बाहेर एकटं राहून कंटाळा येतो, आपले लोक हवेसे वाटतात. दहा वर्षांपूर्वीपेक्षा भारतात आज बर्‍याच जास्त प्रमाणात सोयी, सुविधा उपलब्ध आहेतही, कर्तबगार लोकांना चांगल्या पगारांच्या नोकर्‍या मिळून स्टँडर्ड ऑफ लाईफ फार न बदलता भारतातही रहाता येतं. बाकी नायल्या म्हणतो तसं, अनेक लोकं असे वागतही असतील. पण माझ्या बघण्यात असे लोकं नाहीत. मी इथली आणि तिथली असतानाही मूळ लेखात लिहील्याप्रमाणे अशी वागले/वागते असं मला वाटत नाही. सामान्यीकरण करणं आवश्यक असल्यास बहुसंख्य जनता कदाचित अशी असेलही, पण माझा संपर्कमात्र "अल्पसंख्यांकां"शीच आला आहे. *मित्र = मित्र-मैत्रिणी या अर्थाने वाचणे. ** गेल्याच महिन्यात फेसबुकावर आमच्या एका 'इथल्या' जालीय मित्राने जुन्या विकलेल्या आणि नव्याकोर्‍या गाड्यांचे फोटो टाकले होते त्याची आठवण झाली. अवांतरः डाण्राव प्रतिसादाची लांबी पाहून बहुदा पुन्हा प्रतिसाद लिहीण्याची 'विनंती' करणार नाही. ;-)
  • Log in or register to post comments

घरात स्वच्छ पाणी असणे

विजुभाऊ
Tue, 12/14/2010 - 11:18 नवीन
घरात स्वच्छ पाणी असणे (डोंबिवलीकर असाल तरीही), ठाणेकरानी डोंबिवलीकराना असे सिंगल आउट करण्याचा हा प्रयत्न आहे. डोंबिवली ही भारताचे आद्य स्लीपिंग टाऊन. कामासाठी सकाळी गाव गाव सोडायचे आणि सम्ध्याकाळी झोपण्यापुरते घरी यायचे ही रीत कष्टाळु डोंबिवलीकरांच्या अम्गवळणी पडली आहे. त्या डोंबिवलीकरांना से सिम्गलाऔट केल्याच्या प्रकाराचा एका पार्लेकराकडुन निषेध
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

+१

स्पा
Tue, 12/14/2010 - 13:38 नवीन
एक डोम्बिवलीकर ............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

काही प्रश्न पडले आहेत. एका

अरुण मनोहर
Sat, 12/11/2010 - 07:26 नवीन
काही प्रश्न पडले आहेत. एका झाडावर मधमाशांची दोन पोळी आहेत. त्यातल्या मधमाशा एकमेकांच्या पोळ्यात (चुकून किंवा मुद्दाम) जात असतील का? आणि जर जात असतील तर, --कोणाच्या लक्षात ही गोष्ट येतही नसेल, की, ---इकडचे आणि तिकडचे ह्या विषयावर त्यांच्यात गुणगुण होत असेल की, ---डसडस होत असेल की, --- आणखी काही?
  • Log in or register to post comments

चांगला

नंदन
Sat, 12/11/2010 - 07:55 नवीन
विषय. चर्चा आणि प्रतिसाद वाचण्यास उत्सुक आहे. या निमित्ताने काही जुने प्रतिसाद आठवले. तूर्तास Getcha Popcorn Ready :)
  • Log in or register to post comments

ओचोसिंको रॉक्स!!

प्रियाली
Sat, 12/11/2010 - 08:01 नवीन
आमचा लै आवडता खेळाडू हाये! एकदम झक्कास!! बाकी, दोन टायमाची भाकरी मिळवण्यात व्यग्र असल्याने फार लिहू शकत नाही. चालू द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

हम्म!!!!

पिवळा डांबिस
Sat, 12/11/2010 - 09:54 नवीन
मूळ धागा वाचून अभिप्राय लिहिणार होतो.... पण इथे येता येता बाकीचे अभिप्राय वाचून मला काय लिहायचंय ते विसरूनच गेलो... आठवलं की परत इथे येईन..... बाकी, मित्र परदेशी जाणं ही "मैत्री " या नात्यांमधली "दुर्घटना" आहे की नाही ? असहमत!!!! खर्‍या निरपेक्ष मैत्रीमध्ये अंतराचा अडथळा येत नाही, हे स्वानुभवावरून!!!
  • Log in or register to post comments

सहमत

बेसनलाडू
Sat, 12/11/2010 - 12:17 नवीन
मित्र परदेशी जाणं ही "मैत्री " या नात्यांमधली "दुर्घटना" आहे की नाही ? असहमत!!!! खर्‍या निरपेक्ष मैत्रीमध्ये अंतराचा अडथळा येत नाही, हे स्वानुभवावरून!!! (सहमत)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

मित्र परदेशी जाणं ही "मैत्री

मनीषा
Sat, 12/11/2010 - 10:15 नवीन
मित्र परदेशी जाणं ही "मैत्री " या नात्यांमधली "दुर्घटना" आहे की नाही ? केवळ परदेशी जाण्यामुळे किंवा न जाण्यामुळे मैत्री चे नातं संपत असेल तर त्या मैत्रीची मर्यादाच तेव्ह्ढी होती असे समजावे.. तसही रोजची व्यग्रता, अनेक समस्या आणि जबाबदार्‍या यातुन आपण किती वेळ आपल्या अगदी परदेशी न गेलेल्या मित्र - मैत्रीणिंना देउ शकतो? नात्यांमधे दुरावा येण्यासाठी आणि तो वाढत जाण्यासाठी परदेशी जाणे हे कारण असू शकत नाही .
  • Log in or register to post comments

हल्लीच कुठेशी वाचलं कि राजाला

शिल्पा ब
Sat, 12/11/2010 - 10:34 नवीन
हल्लीच कुठेशी वाचलं कि राजाला अन बायकांना मित्र मैत्रिणी असत नाहीत म्हणून...
  • Log in or register to post comments

मी एक अनिवासी ह्या नात्याने

निनाद मुक्काम …
Sun, 12/12/2010 - 02:38 नवीन
मी एक अनिवासी ह्या नात्याने माझे मत मांडतो . अमेरिकेत अथवा युकेत अथवा आणि कुठेही ३० ते २० ते १५ अगदी १० वर्षापासून परदेशात राहिलेले अनिवासी असतात ,ते एकतर उच्च शिक्षण च्या निमितान्ने तेथे गेले असतात किंवा उच्च शिक्षणाच्या जोरावर नोकर्या घेऊन घेलेले असतात (हा लेख मी महाराष्ट्रीयन अनिवासी एवढ्याच समूहा ला लक्षात घेऊन लिहित आहे. ) त्यांची परदेश गमनाची मुख्य कारण त्यावेळी भारतात असणारी बेरोजगारी /महागाई /समाजात बुद्धिवंतांना असलेली किंमत /अडाणी व विवेकशून्य लालची लोकांकडे असलेले समाजाचे पर्यायाने देशाचे नेतृत्व (ह्यामुळे भ्रष्टाचाराला मिळालेली प्रतिष्ठा ) व त्याचवेळी समोर अमेरिकन वा एखाद्या परदेशी प्रगत देशाचे मनोरम्य चित्र .म्हणून काही संधी मिळाली तर काहींनी संधी मिळवून अनिवासी झाले .ह्या लोकांना तेथील कायदा सुव्यवस्था /सुब्बता /आधुनिक जीवनशैली(ह्यात मला प्रक्टिकल विचारसरणी ठेवून जगणारी विचारसरणी ज्यात ५ दिवस काम व दोन दिवस आराम (ह्या दोन दिवसात मग आजूबाजूची मराठी डोकी हुडकणे /त्यांनी एकत्र येऊन पार्ट्या करणे /हातात बाटली असणे. अश्या नवीन अनिवासी संस्कृती बद्दल म्हणायचे होते . .पण मराठी साहित्य व परंपरा ह्यांच्यात रमलेला त्यांचा मनातील एका कप्पा उदास होता . व त्याची खुशामत करण्याची मंडले (ह्यांचे उदिष्टे फक्त आपल्या आयुष्यातील गतकाळ आठवणे त्यासाठी मग जुनी गाणी शास्त्रीय गाणी /मराठी नाटके व मराठी सण व परंपरा सांभाळणे ह्या सर्व गोष्टी हिरारीने (काहीश्या जिद्दीने ) सुरु झाले .कारण होते .ह्या परदेशात परकीयांनी जाणते /अजाणते पणी ह्यांना परकीय असल्याची जाणीव करून देणे होय .प्रत्येक वेळी टोमणे व शेलके शेरेच काही गोर्यांकडून नको ऐकायला .पण त्यांची जीवन शैली व मूल्य कितीही झाली तरी ह्या अनिवासी लोकंना पूर्णपणे स्वीकारता नाही आली .आजही ५ मराठी कुटुंबांनी एकत्र येऊन एकच भाषा /खाद्य पदार्थ /एकच विषय (तो एकतर भारता संबंधी राजकारण अथवा सिनेजगतावर वा सद्यस्थितीतील कोणत्याही सामाजिक असामाजिक प्रश्नावर असो किंवा अमेरिकेत स्थिरावताना येणारे दैनंदिन आयुष्यातील प्रश्न जसे मुलांचे शिक्षण / एखादी नवी गोष्ट जसे कार व जागा घ्याची असेल तर सल्ला ह्या विषयांवर जे मेतकुट जमते ते इतर गोर्यांबरोबर होऊच शकत नाही .) मग येथे स्थिरावल्यावर भारतात काय होतंय ह्यांची कल्पना नसल्याने (त्याकाळी सोशल नेटवर्क प्रगत नसल्याने भारतात फोन म्हणजे चैनीची गोष्ट (लांब लचक फोन कॉल) ह्यामुळे भारतात घडणारी सामाजिक स्थित्यंतर ह्यांच्यापासून लपून राहिली .बरे येथे स्तःयिक आहोत .व आता गाडी /घर व आपल्या कर्तबगारीमुळे व बचत व योग्य प्लानिंग मुले अमेरिकन ड्रीम व त्याहून जास्त कमावून बसलेल्या अनिवासी भारतीयांना समाजात एक ओळख हवी होती. ती अमेरिकन समाजात शोधणे शक्य नव्हते .(उद्या एखादा भय्या समजा म्हणजे उदाहरण द्यायचे म्हणून जेष्ठ नेते कृपाशंकर सिंग हे मुंबईत पैसा व्यापार आपल्या सचोटीने कमावून गब्बर झाले म्हणून ते मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नाही बनणार (त्यांचा जीव रमणार हि नाही ) मुंबईच्या उच्चभ्रू टाटा गोदरेज व हिरा व शेअर मध्ये डील करणार्या मुंबईच्या बड्या लोकांमध्ये सुध्धा सामील होऊ शकत नाही .त्यांना खरा मान हा त्यांचा मूळ गावी .(आज मुंबईत काम करतो ह्या एका शब्दावर ह्या लोकंना त्यांच्या राज्यात सुंदर स्थळ मिळते) तर मग आपल्या कर्तबगार अनिवासी भारतीयांनी महार्ष्ट्रातून लेखक /नाटककार / व अनेक नामवंत मंडळीचा आपल्या कडे बोलावून पाहुणचार करू लागले /हेतू एकच आपल्या आयुष्याचे रसभरीत वर्णन कळू दे मायदेशी .दुसरा हेतू म्हणजे थोरा मोठ्यांचे पाय लागुदे आपल्या घराला. पण ह्यात कुठेतरी महाराष्टार्तील मित्र व अनिवासी भारतीय मधील दुरावा व विचार करण्याची प्रवृत्ती बदलते .भारतात आल्यावर ह्या अनिवासी भारतीयांना येथील उणीवा प्रकर्षाने जाणवतात त्यावर प्रखर भाष्य ते करतात .त्यामुळे कुठेतरी एक शीत युद्ध सुरु होते .बाकी काही वर्षापूर्वी परदेशातून आल्यावर खाऊ म्हणून चोकालेत आणणे (आमच्या लहानपणी आम्हाला क्वचित पेन वा अश्या गोष्टी मिळत हॉलीवूड मधून पाहिलेले परदेश वास्तवात काही प्रमाणात फोटोत पाहायला मिळणे )ह्यामुळे परदेशातून कोणी येणार म्हणून पूर्ण गल्लीत दवंडी असायची .अनेक दूरदूरचे नातेवाईक येऊन कौतुक सोहळे व्हायचे .पण खुपदा माझ्या पाहण्यात असे आले आहे कि हि लोक अजूनही आपला भूतकाळ जगण्यासाठी त्याकाळातील गाणी अथवा इतर विषय हेच अजेंड्यावर ठेवतात . . हीच लोक कार्यकारणीवर असतात .त्यामुळे नवीन आलेले अनिवासी वा विद्यार्थी त्यांच्याशी समरस होऊ शकत नाहीत( १०० % मराठी कलावंत ज्यात श्रेयस /पुष्कर /भारती अचार्केकर /किशोर प्रधान /विजू खोटे /क्रांती रेडेकर असलेले नाटक लेखन व निर्माते दाभोळकर ह्यांचे नाटक युरोपात दौरे होत असतांना महारष्ट्र मंडळात लंडन मध्ये होऊ दिले नाही .कारण नाटक इंग्लिश मध्ये होते .(खरे तर ह्यांची तरुण पिढीला हे मराठी व हिंदी फ्युजन असलेले नाटक अधिक आवडले असते कारण ह्याच्या बोलीभाषेत अर्धे शब्द मराठी तर अर्धे इंग्लिश असतात . .२ ,)मध्ये मी माझ्या पिढीला अंतर्भूत करेन .जे ५ ते७ वर्षापूर्वी अनिवासी झाले .आम्ही जेव्हा भारत सोडला तेव्हा नेट संस्कृती आपल्या इथे बाळसे धरू लागली होती .जागतीकरणामुळे महासत्ता बनण्याची चाहूल लागली होती (आपण त्या भाग्यवान २० % मध्याम्वार्गीयात मोडतो ज्यासाठी परकीय व स्वकीय बहुराष्ट्र कंपन्या त्यांचे जगातील अद्यावत सामुग्री अत्यंत आकर्षक स्वरुपात आपल्यासाठी उपलब्ध केली आहे .उदा भारतातील मोबाईल कंपन्याचे टेरिफ सध्या जगात सर्वात आकर्षक व स्वत आहेत .) त्यामुळे भारत वियोग आम्हाला याहू व आदी मेसेंजर मूळे जाणवला नाही . अवंतिका मध्ये काय झाले हे आठवड्याचे संशिप्त वृत्तांत एका chat मध्ये कळत होते मराठी पेपर वाचता येत होते .अर्थात २००० नन्तर जेव्हा जेव्हा भारतात आलो मुंबई व पुण्यात ५ वर्षापूर्वीची बेरोजगारी कमी व सुब्बता दिसत होती .किंबहुना आमच्या मित्र मंडळीत आम्ही तुमच्या पेक्षा कमी नाही हि दाखवायची अहमिका होती .(हे पाहून एक भारतीय म्हणून मला तरी खूप बरे वाटले .दृष्टीकोन हा बराच व्यापक आणि प्रक्टिकल होता .(ह्या पिढीत एखाद्या मुलीसाठी देवदास होणे माझ्यामते ओल्ड फेशन होते .त्यापेक्षा दिल चाहता हे मधील किंवा तू नही तो कोई और सही अर्थात पहिले लगीन करियरचे असा व्यवहारी दृष्टीकोन दिसला .) आता यु ट्यूब मूळे झी मराठी व इतर मराठी संस्थालामुळे मराठी शो व पुरस्कार सोहळे पाहता येतात .फु बाई फु मध्ये कोण चाबूक काम करते ह्यावर चर्चा व इंटर नेट मधील torent मूळे अमेरिकन व जगातील गाजलेल्या टीवी मालिका व सिनेमे चकट फु पाहायला मिळत असल्याने भारतीय व अनिवासी भारतीय ह्यात फारसा फरक दिसत नाही आहे , किंबहुना अनिवासिपेक्षा भारतीयच फार्म विले वर जास्त सापडतील .ओर्कुट व फेसबुक ने आपणास एका समान फेस दिले आहे असे मला वाटते .आम्ही नोकरी व घर ह्यामधील प्रवासात वाचणारा वेळ मिपा व आदी मराठी संस्थळावर घालवतो . .काही आधुनिक अनिवासी परकीय बिग ब्रदर मध्ये काय आहे आमच्या डॉली ची सर आहे का कुणाला ? म्हणून देशी अवतार चवीने पाहतात. म्हणून यु ट्यूब जिंदाबाद. आम्ही खुपते तिथे गुप्ते काही आठवड्याने का होईना उशिरा पाहतो (आखातामध्ये सर्व भारतीय वाहिन्या दिसतात हेच लोण तमाम जगभरात पोहचेल .किंवा काही वर्षात नेट टीवी बाळसे धरेल .आज भारतीय लहान मुलांना ( मुंबईतील)माझ्या पाहणीतील हेना मोन्तेना माहित असते .पण मुग्धा सुध्धा माहित असते .ते टिंग्या पाहून हळहळत नाहीत कारण हि संस्कृती त्यांना व अनिवासी शिशु पिढीला सारखीच नवीन असते .. आहे .भावी पिढीतील भारतीय व अनिवासी भारतीय ह्यांच्यात माझ्या मते वैचारिक दृष्ट्या विशेष फरक राहणार नाही आहे .पण अनिवासी भारतीयांनी आपली थोडी मानसिकता बदलायला हवी ( आय मीन स्वताच्या भाव विश्वातून बाहेर येऊन सत्य स्वीकारले पाहिजे .एक उदाहरण द्यायचे त अमेरिकेतील साहित्य संमेलन/ वक्ता अविनाश धरमाधिकारी /.ते जेव्हा भाषणात म्हणाले कि सिलीकोन VALLEY ची दुसरी भाषा मराठी आहे (प्रचंड टाळ्या व सहमती )पण मग म्हणाले त्यांनी येथील ओपेरा वा नाटक पहिली त्यातील टेक्निकल प्रगती पाहता आपली नाटक काहीच नाही .तेव्हा मात्र साप दिसल्यागत शांतता (आम्ही सत्य स्वीकारत नाही .आज भिकार डेली सोप मुळे मराठी तरुण पिढी जर नेट वरून इंग्लिश मालिका पहायला लागले डिस्ने वा हॉलीवूड सिनेमे पहिले तर मग दोष कोणाचा ? हि पिढी मग परदेशात आल्यावर ते महारष्ट्र मंडळात एकरूप होत नाही कारण तेथे अजूनही २० वर्षापूर्वीचे महार्ष्ट्रीय सांस्कृतिक उपक्रम होतात . मग समवयस्क नवे अनिवासी भारतीय एकत्र येऊन स्वताची नवीन संस्कृती निर्माण करतात .(ते राज ठाकरे किंवा इतर मराठी विषयाला वाहिलेल्या कम्युनिटीवर असतात .व आधुनिकता व पारंपरिकता ह्याचा मेळ घालायचा प्रयत्नात असतात .त्यांना भारतात आल्यावर अजिबात परके वाटत नाही .किंबहुना भारतात येतांना मुंबईतील सागरी सेतूवरून फिरायची मनीषा असते .थोडे हिरवे पैसे खिशात असल्याने भारतीय नव चंगळवादी संस्कृती भोगण्याचा प्रयत्न असतो .व परदेशात भारताविषयी स्तुती सुमने एकूण सुखावत असतो .ते आपल्या भारतीय असण्याचा माज दाखवतो परदेशात .(शायनिंग इंडिया वा उगवत्या महासत्तेचे वारसदार म्हणूनच परदेशात जगतात . .)आपल्या मातीशी परदेशात गेल्यावरच महती कळते .कारण घरकी मुर्गी दाल बराबर .
  • Log in or register to post comments

एक स्वतंत्र लेखच लिही ना..

प्राजु
Sun, 12/12/2010 - 04:03 नवीन
एक स्वतंत्र लेखच लिही ना.. :) बाकी आमच्या डान्रावांना मागे टाकलंस! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

बाकी आमच्या डान्रावांना मागे

विंजिनेर
Sun, 12/12/2010 - 14:33 नवीन
बाकी आमच्या डान्रावांना मागे टाकलंस!
म्हणजे प्राजूतै तुला उत्तराच्या (मुद्द्यांना धरून्/सोडून लिहायच्या) स्टाईलमुळे असं वाटतंय का उत्तराच्या लांबीमुळे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

धरुन?? खरंच???

Nile
Sun, 12/12/2010 - 14:42 नवीन
धरुन?? खरंच???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

नायल्या, नायल्या, अरे आंजावर

विंजिनेर
Sun, 12/12/2010 - 14:48 नवीन
नायल्या, नायल्या, अरे आंजावर काही शब्दांची पेरणी "पॉलिटिकल करेक्टनेस" दाखवण्यासाठीच असते हे का आता तुला सांगायला हवं? इथे लिहिणार्‍याबरोबर वाचणार्‍याचं मन सुद्धा दुखावलं जाऊ नये ह्याची जाणीव आहे बरं मला! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

आंजावर.... ... मन सुद्धा

Nile
Sun, 12/12/2010 - 15:39 नवीन
आंजावर.... ... मन सुद्धा दुखावलं जाऊ नये
च्यायला, ह्या आंजावरील अनुभवी लोकांना नक्की झालंय तरी काय! काहीतरी विपरीतच बोलुन राह्यलेत. परवा तो नंदन सुद्धा असंच काहीतरी बोलत होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

काही विचार

राजेश घासकडवी
Sun, 12/12/2010 - 03:05 नवीन
कॉलेजमध्ये असताना कमी जबाबदारी असते, भरपूर वेळ असतो, मैत्री होण्यासाठी वाव भरपूर असतो, आणि एकंदरीतच धमाल खूप असते. त्यामुळे त्या काळात मैत्री बळकट ठेवणं सहज सोपं असतं. ती तशी ठेवण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात हेच नंतर समजतं. ते दिवस संपले की अनेक कारणांमुळे हे नातं बदलतं. माझ्या मते इकडचे-तिकडचे हे 'एखाद्या नात्यात फरक पडणे' या सर्वसाधारण घडणाऱ्या गोष्टीच्या अनेक कारणांपैकी एक आहे. इतर कारणं (बऱ्याच लोकांनी लिहिलेली आहेत) - लग्न - नवीन नोकरी - नवीन ठिकाण - संसाराच्या जबाबदाऱ्या - संपर्काची साधनं - स्वभावातील बदल - मुळातच नाती भक्कम ठेवण्याचा त्या नात्यातल्या दोहोंचा स्वभाव, गरज, इच्छा - मुळातला त्या नात्याचा घट्टपणा यापैकी काही परिस्थितीजन्य आहेत, काही व्यक्तिगत आहेत. नवीन पिढ्यांना संपर्काच्या साधनांचा काहीच प्रश्न नाही. इंटरनेट, टीव्ही, फोन मुळे आमूलाग्र क्रांती झालेली आहे. पण आपल्या कक्षा रुंदावतात, फोकस बदलतो हे मुख्य कारण अजून आहेच. तेव्हा मुळात मैत्री किती जिवाभावाची होती, व ती समुद्रापल्याडही जपून ठेवावीशी किती वाटतात हेच शेवटी महत्त्वाचं. माझा व्यक्तिगत अनुभव हा अशी नाती जोपासण्याचे कष्ट न घेतल्यामुळे व थोड्याफार प्रमाणात माझ्या विसराळू स्वभावामुळे हातातून गळून गेलेल्या वाळूचा आहे. इकडचे-तिकडचे मधलं अंतर कारणीभूत ठरलं पण ते ओलांडण्याचे कष्ट घेतले असते तर हातात बरंच काही शिल्लक राहिलं असतं.
  • Log in or register to post comments

कर्तबगारी

तिमा
Sun, 12/12/2010 - 12:03 नवीन
आम्ही तरुणपणी आमची कर्तबगारी (२०० अर्ज पाठवण्याची चिकाटी)) कमी पडल्यामुळे 'तिकडे' जाऊ नाही शकलो. आणि आता म्हातारपणी पण मुलीचे घर बघायला जाताना व्हिसा मिळण्यात ज्या अडचणी आल्या (स्पेशल स्क्रुटिनी), त्या आमच्या कर्तबगारीमुळेच.(रसायनशास्त्रातली उच्च पदवी मिळवल्याचे पातक केल्यामुळे)
  • Log in or register to post comments

माझं मत

स्मिता.
Mon, 12/13/2010 - 15:27 नवीन
मूळ लेख आणि सर्वांच्या प्रतिक्रिया वाचल्यात. त्यातल्या धमू यांच्या एकंदरीत आणि अदिती आणि मेवे यांच्या प्रतिक्रियेतील काही भागांशी सहमत आहे. माझ्या मते मैत्रीमध्ये दुर्घटना होण्यासाठी 'तिकडे' जाण्याचीच गरज आहे असे नाही. जरा लहानपणापासूनचा आढावा घेतला तरी लक्षात येतं की आपण एकाच शहरात, एकाच शाळा/कॉलेजात असूनही कालांतराने मित्रमैत्रिणी बदलतात. तसेच धमू म्हणतात तसे 'फ्रेम ऑफ रेफरंस' वेगळ्या झाल्याने शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने शहर बदलल्यावर जुन्या मित्रांसोबत गप्पा तेवढ्या रंगत नाहीत. मुळात केवळ रोज कट्ट्यावर भेटून २-४ तास मनसोक्त गप्पा मारणे, कुठेतरी फिरायला जाणे, इ. गोष्टी म्हणजेच मैत्री असते का? आणि खरं तर या गोष्टीसुद्धा एका 'फ्रेम ऑफ रेफरंस' मध्ये राहूनच शक्य होतात. बहुतेक लोक लग्नापूर्वी मित्रांसोबत तासन् तास गप्पा मारतात. मात्र लग्न झाल्यावर मनातले सुख-दु:ख सांगायला, विचारविनिमय करायला, जबाबदारी वाटून घ्यायला कोणीतरी असल्यावर 'सो कॉल्ड' मित्रांची आठवण कमीच येते. त्यामुळे केव्हातरी समोर आल्यावर या मित्रांसोबत एक अवघडलेपणा असतोच. अदिती म्हणतात त्याप्रमाणे कधी-कधी असंही होतं की १-२ वर्षांनी भेटलेल्या मित्रांसोबतही अगदी काल एका ताटात जेवल्याप्रमाणे मोकळ्या गप्पा होतात. मधला संपर्क नसलेला काळ कुणाच्याही लक्षात येत नाही. तेथे कुठलीही दुर्घटना जाणवत नाही. एकूण काय, तर 'मैत्रीमधील दुर्घटना' ही फक्त 'तिकडे' जाण्यावरच अवलंबून नसून त्या मैत्रीवरच अवलंबून असते... 'तिकडे' जाणे हे एक कारण असू शकते. ------------------------------------------------------------------------------------------- अवांतर : पुण्याला शिकायला आल्यानंतर माझ्या शाळेतल्या बहुतेक मैत्रिणी दुरावल्या होत्या. नंतर नोकरीच्या निमित्ताने मी बंगलोरला असताना त्यातल्या एकीचे लग्न होवून ती बंगलोरला आली. आम्ही दोघी १२वी पर्यंत कायम सोबत असायचो. रिकाम्या वेळात एकमेकींकडे जाऊन गप्पा मारत बसत असू. ती मला बंगलोरात भेटल्यावर, मधली ४-५ वर्ष काहीही संपर्क नसताना (मला तिच्या लग्नाचं आमंत्रण देखील नव्हतं! ), आम्ही पुन्हा तेवढ्याच मोकळेपणाने गप्पा मारल्या. कुठेही, कसलाही अवघडलेपणा नव्हता. अर्थात, आम्हा दोघींमध्ये कोणीही तिकडे गेलेले नव्हते :प
  • Log in or register to post comments

नातेवाईक

आंसमा शख्स
Tue, 12/14/2010 - 10:05 नवीन
नातेवाईक विसरला का? आमचा एक मित्र तिकडे गेला तर त्याला पैसा मागून मागून जीव नकोसा केला सगळ्या नातेवाईकांनी. आता तर तो आई बापाचाही फोन घेत नाही कारण ते पण तेच करतात. अब्बाजानला चढवायचा अजून एक मजला घरावर. हा पोरगा झाला त्याचा एटीएम. फक्त आम्मीला फोन करतो तीचा जीव तुटतो त्याच्यासाटी. पण आता बंद झाले सगळे. शिव्या देतात तिकडे गेला आन बदलला म्हणून. पण आधी केलेली मदत विसरले सगळे.
  • Log in or register to post comments

तिकडे गेल्यामुळे स्वभाव

गांधीवादी
Wed, 12/15/2010 - 06:18 नवीन
तिकडे गेल्यामुळे स्वभाव बदलने(?), हा मला वाटते एक स्वतंत्र विचार करण्याचा मुद्दा आहे. खूप पैलू आहेत आपल्या एकाच प्रतिसादात. अश्या दृष्टीने एक नवीन चर्चा सुरु व्हावी अशी अपेक्षा आहे. जसे, तिकडे गेलेल्यांना इकडून कोणते कटू-गोड अनुभव आले, त्यातून ते काय शिकले ? हजारो मैलावरून आपापली नाती जपत असताना कसे वागले गेले पाहिजे ? आदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंसमा शख्स
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा