मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

युगलगीत : आलीया थंडी, साधूया संधी, चल पेटवू शेकोटी

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
काव्यरस
युगलगीत : आलीया थंडी, साधूया संधी, चल पेटवू शेकोटी
तो: आलीया थंडी, साधूया संधी, चल पेटवू शेकोटी ||धॄ|| ती: नको नको आता नको, माझा बा आनल काठी तो: नको तू अशी दुर पळू नको नको तू अशी दुर राहू नको दोन प्रेमाच्या फुलामधी तिसरा भुंगा तू आनू नको ती: असं नको करू, जवळ नको येवू माझा भाऊ लागलं आपल्या पाठी तो: अर्रर्रर्रर्रर्रर्र, ह्या असल्या थंडीत चल पेटवू आपण शेकोटी ||१|| तो: ते बघ तुला दिसतंय काय ती: काय? तो: अगं, ते बघ तुला दिसतंय काय एक राघू, त्याची मैना, चोच चोचीत जाय ते बघ.....तिकडं माझी नजर जाय ती: कुठं? तो: आगं, ते बघ.....तिकडं माझी नजर जाय उस पिकलाय, तुला खायचा काय? ती: नको नको, आत्ता नको देवू आपन घरला जावू लोकं बोलत्यात आपल्या पाठी तो: आरं बाब्बो, ह्या असल्या थंडीत चल पेटवू आपण शेकोटी ||२|| तो: आली थंडी साधू संधी चल पेटवू शेकोटी ||धॄ|| दोघ : लाला लाला... अंहं अंहं...लाला लाला लाला ला - पाषाणभेद (दगडफोड्या) ११/१२/२०१०

वाचने 2743 वाचनखूण प्रतिक्रिया 5

टारझन 12/12/2010 - 13:04
वा पाभे वा !! आहो ही कविता त्या चिंटु च्या बाबांना पण ऐकवा हो .. परवा कुठे ते चिंटु ला सांगत होते .. सकाळी उठुन पळायला जाण्याइतका छाण व्यायाम नाही कुठला ! ... हे म्हणजे घरचं सोडून पळत्याच्या मागे ;) बाकी थंडीत पत्ता लवकर सापडत नाही म्हणे :)