Skip to main content

आंब्याची चव चाखून बघा

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 11/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आंब्याची चव चाखून बघा
आबं माझ्या पाटीतलं पिकल्यात सारं चवीला ते लागत्यात न्यारं पिकलेला आंबा हाती घेवून बघा एकदा त्याची चव चाखून बघा ||धृ|| कालपर्यंत कैरी होती पाडाची फांदीनंफांदी लगडली झाडाची आता दुसरीकडं नजर मारू नका एकदा त्याची चव चाखून बघा ||१|| आंबेबन आहे लई मोठं माझं गावामध्ये नाव आहे त्याचं वाडीत कधी येता ते सांगून टाका एकदा त्याची चव चाखून बघा ||२|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०८/११/२०१०
लेखनविषय:

वाचने 1607
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

दफो, जिंकलास मित्रा !!