पण मला लिंबू सरबत आणि पन्हे पण तितकेच आवडते.
नीरा, शहाळं आणि आवळा सरबत आरोग्यदायी म्हणून चांगले आहेत.
सॉफ्ट ड्रिंक्समध्ये म्हणाल तर मला हल्ली आलेले मिल्कमेड पल्पी ऑरेंज आवडते.
मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
मलाही लिंबू सरबत,पन्हे,लस्सी,ताक, नारळपाणी सगळच आवडतं मी आजपर्यंत फक्त एकदा टेस्ट करायला सोडा पिऊन पाहिलाय नंतर कधीच नाही प्यायला...आवडतच नाही मला अजिबात....
पेप्सी सोडले तर सर्वच पेये आवडतात.
इतर मधे ताक , लस्सी , मोसंबी ज्यूस आणि सोलकढी ...जेवणाबरोबर तर आवडतेच पण इतरवेळी सुध्दा बर्फाचा खडा टाकून सरबतासारखी एक पेय म्हणून आवडते. ईश्वरी
माठाच्या गार पाण्यात केलेलं घरगुती लिंबू सरबत....
आवडतं पण कोणीतरी छाऽऽऽन पैकी करून दिले पाहिजे.
कोकण पेश्शल कोकम सरबत!
हेही आवडतं. पण बाहेर उन मी म्हणत असावे. लिंबू सरबत उन्हे नसली तरी आवडते.
शक्तिवर्धक गोड, थंडगार नीरा
सकाळच्या वेळी जास्त मजा येते.
रॉ मँगो ज्युस! म्हणजे आपलं ते कैरीचं पन्हं हो! :)
सिझनल. वर्षभर नाही मिळत. मिळते तेंव्हा जाम आवडते.
पित्तशामक आवळा सरबत...
अजून चव घेतली नाही. पण बहुतेक आवडणार नाही. (उगीच आवळाआवळी आवडत नाही).
आम्ही ठाकर ठाकर - करवंदाचं सरबत :)
अजून चव घेतली नाही. आवडेलसे वाटत नाही.
देवाची करणी अन् नारळात पाणी!
ऑल टाईम ग्रेट.
कोक, पेप्सी इत्यादी सॉफ्ट ड्रिन्कस्
कोक, पेप्सी फक्त 'रम' बरोबर. एरवी अजिबात नाही.
इतर..(इतरवाल्यांनी प्रतिसादामध्ये कृपया आपल्या आवडीच्या पेयाचाउल्लेख करावा!)
ह्याची एक मोठी यादी पूर्वीच दिली आहे. ती वाचावी. सारखं-सारखं काय आम्हाला दारू खूप आवडतेचा जप करायचा?
प्रतिक्रिया
अरेरे..
आमचं लिंबू सरबत मागे पडलं! :(
एकच पर्याय का?
In reply to अरेरे.. by विसोबा खेचर
तात्या,
येथेही एकच पर्याय निवडण्याची सोय का ठेवली? त्यामुळे अडचण येत आहे. आम्हाला वर दिलेल्यातली ३-४ पेये आवडतात.
नीरा ...
In reply to अरेरे.. by विसोबा खेचर
काश ! अमेरिकेत नीरा मिळत असती !!!
ये दिल मांगे मोअर ही मोअर.....
तात्यानु वरील सर्वच पेय मला फार आवडतात..(सॉफ्ट ड्रिन्कस् सोडुन)
पण मला फार आवडलेले सरबत हे पेरुचे....जबरद्स्त चव....
(माठातले वाळायुक्त गार पाणी प्यायलेला)
मदनबाण.....
इतरः माझी आवड
कोक, पेप्सी इत्यादी सॉफ्ट (?) ड्रिंक्स सोडून बाकी सर्व पर्याय.
कोक,
कोक, पेप्सी इत्यादी सॉफ्ट ड्रिंक्स सोडून बाकी सर्व पर्याय.
माझे मत कोकम सरबताला..
पण मला लिंबू सरबत आणि पन्हे पण तितकेच आवडते.
नीरा, शहाळं आणि आवळा सरबत आरोग्यदायी म्हणून चांगले आहेत.
सॉफ्ट ड्रिंक्समध्ये म्हणाल तर मला हल्ली आलेले मिल्कमेड पल्पी ऑरेंज आवडते.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
सहमत ...
In reply to माझे मत कोकम सरबताला.. by मनस्वी
>>सॉफ्ट ड्रिंक्समध्ये म्हणाल तर मला हल्ली आलेले मिल्कमेड पल्पी ऑरेंज आवडते.
खरचं, अल्टिमेट आहे "पल्पी ऑरेंज "!!!
अवांतर : इतर पेयात मला "तुळशीचा सात्विक चहा" आवडतो ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना https://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
इतर - थंडगार
ताक
(मठ्ठ) केळकर
कोकणातल्य
कोकणातल्या किनारपट्टीतल्या गावातील (दिवे-आगर, केळशी, गुहागर वगैरे) शहाळ्याच्या पाण्याशी कसलीच तुलना होऊ शकत नाही..
अरे वा!
सध्या नीरा आपल्या निकटतम प्रतिद्वंदीयोंसे आगे है! :)
आमचं घरगुती, माठाच्या पाण्याचं लिंबू सरबत सालं मागे पडलं! :(
तात्या.
लिंबू सरबत
In reply to अरे वा! by विसोबा खेचर
आम्ही लिंबू सरबताला जिन्कवण्याचा प्रयत्न करत आहोत
मजेदार विदुषक
पेय
लिंबू सरबत,पन्हे,लस्सी,ताक.. ही सर्व मंडळी फार आवडतात.ह्यांच्यात डावेउजवे नाही करता येणार..:)
कोक,पेप्सी इ. ना पसंती नाही.
स्वाती
लिंबू सरबतच!
तशी बरीच पेये आवडतात.....(अर्थात - पेप्सी वगैरे कोणतंही शीतपेय अजिबात नाही!)
पण आमची पसंती मात्र एकच.... लिंबू सरबत!!
नीरा
नीरा हीच निराळी. बाकी सगळे सारखेच!
मात्र आमचा आवडता उसाचा रस यात नाही याचा खेद वाटतो.
आपला,
(रसिक) आजानुकर्ण
...लिंबाचे सरबत
...लिंबाचे सरबत
होस्टेलला असताना करायचो.
माठ नव्हता , सरबत करून बाटलीत भरून त्या बाटलीला ओले कापड गुंडाळून खिडकीच्या बाहेर ठेवायचे.
१५-२० मिनिटांत मस्त गारेगार सरबत तयार.....
लिबाचे सरबत
त्यचि तुलना कशाशिच होवु शकनार नाहि. भुक तहान दोन्हि भागते. परत जास्त खर्चिक पन नाहि.
कैरीचं पन्हं :)
एकाची निवड करायची तर कैरीचं पन्हं :)
बाकी उसाचा रस आणि माठातील वाळा घातलेलं थंडगार पाणी नसल्याने चुकल्यासारखं वाटलं
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
हो ना
मलाही लिंबू सरबत,पन्हे,लस्सी,ताक, नारळपाणी सगळच आवडतं मी आजपर्यंत फक्त एकदा टेस्ट करायला सोडा पिऊन पाहिलाय नंतर कधीच नाही प्यायला...आवडतच नाही मला अजिबात....
नीरा!
आपल्याला १ नंबर आवडते........
तसं म्हणाल तर सर्व पर्याय आवडतात.....
इतर मध्ये थंडगार चिल्ड हेनिकेन!
(१२ कॅन फ्रीजमध्ये ठेवणारा) टिंग्या ;)
लिंबू सरबत
लिंबू सरबत झिंदाबाद !!
(वर तीन पैकी दोन शब्द फार्सी-अरबी दिसताहेत :) )
--लिखाळ.
थंडगार नीरा
आत्तापर्यंत तरी नीरा या पेयाची अबाधित आघाडी आहे :)
नीरा जिंदाबाद
--
ध्रुव
हो,
In reply to थंडगार नीरा by ध्रुव
खरं आहे!
साला नीरा सतत आघाडीवर राहील असं वाटलं नव्हतं! :)
आमच्या लिंबू सरबताचं डिपोझिटच जप्त होईल की काय अशी आता भिती वाटू लागली आहे! :)
ताई, माई, अक्का, विचार करा पक्का,
अन् लिंबूसरबतावरच मारा शिक्का!
:)
आपला,
(लिंबूसरबत पक्षाचा प्रचारक) तात्या.
अरे,
In reply to हो, by विसोबा खेचर
जिंकुन जिंकुन जिंकणार कोण?
नीरा शिवाय आहेच कोण!
आपला,
(नीरा पक्षाचा प्रचारक) टिंग्या :)
बरोबर
In reply to अरे, by ब्रिटिश टिंग्या
लक्षात ठेवा,
मिपाचा हिरा,
आपली नीरा :)
--
(नीराप्रेमी)ध्रुव
आरे त्या
आरे त्या करवंदाच्या सरबताला कोणीतरी आपल म्हणारे.... :''(
आंबिल...
:(
ताकातील आंबिलाला तिकिट मिळालेले दिसत नाही?:)
माझे सर्वात आवडते पेय...
डिपॉसिट जप्त!
आवळा सरबत, करवंद सरबत अन् सॉफ्ट ड्रिंक्सचं!
तात्या, आपण लिंबू सरबतावर मारलाय बरंका शिक्का!
डरो मत, आता नं ३ ला आलंय आपलं लाडकं सरबत :)
चतुरंग
कोकम सरबत
आमचं कोकम सरबत मस्त टक्कर देऊन राहिलंय भाऊ.
कोकम सरबत जिंकलं तर पुढच्या सात्विक ओसरी ला (झालीच तर / जेव्हा होइल तेव्हा) सगळ्यांना माझ्या तर्फे फुकट कोकम सरबत पाजण्यात येइल :)
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा https://adijoshi.blogspot.com/
त्या ओसरीला
In reply to कोकम सरबत by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
हजर रहायचा प्रयत्न करेन ;)
मत कुणाला दिले सांगायला नकोच ;)
(सूचक)बेसनलाडू
आयला , कोकण्याचे कोकम आले की पुढं
ढाक्कीचिकी ढाक्कीचिकी ढाक्कीचिकी ढा.
पुण्याचे पेशवे
आयला!
नीरा मागे पडून कोकम पुढे?!
देवगडाचा विजय असो...! :)
आपला,
(कोकणी) तात्या देवगडकर.
वा तात्यानूं
In reply to आयला! by विसोबा खेचर
वा वा वा वा तात्यानूं.
कोकम सरबत पुढे येतंलसं बगून कचकन टोपी बदलून देवगडकर झालात की वो :)
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा https://adijoshi.blogspot.com/
आयला
नीराबाई मागे आणि कोकमशेठ पुढे?
आपला,
(निराळा) आजानुकर्ण
सर्वच पेये
पेप्सी सोडले तर सर्वच पेये आवडतात.
इतर मधे ताक , लस्सी , मोसंबी ज्यूस आणि सोलकढी ...जेवणाबरोबर तर आवडतेच पण इतरवेळी सुध्दा बर्फाचा खडा टाकून सरबतासारखी एक पेय म्हणून आवडते.
ईश्वरी
आवाज कुणाचा?
आवाज कुणाचा?
वाद्च नाही, आमच्या लिंबू सरबताचा. :))
कोकम सरबतच जिंकणार
रात्रीची जास्त झाल्यावर सकाळी लिंबू सरबत औषध म्हणून घेतो तितकंच.
पण आमचं कोकम सरबत अप्रतीमच असतं. उगाच नाही अम्रुत कोकम म्हणत त्याला :)
हा पोल जिंकणार कोण...
कोकम सरबत आणखी कोण... :)
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा https://adijoshi.blogspot.com/
.
.
हो,
मला ही असेच वाटते की कोकम सरबत बाजी मारेल.
:((
अरे कोणीतरी आमच्या नीरेला मतं द्या रे!
शहाळे...........
जरा विचार केला तर लक्षात येईल की इतर सगळी पेयांना नैसर्गिक लेबल लावले तरी ती processed पेये आहेत.
खूप पेये आवडतात...
माठाच्या गार पाण्यात केलेलं घरगुती लिंबू सरबत....
आवडतं पण कोणीतरी छाऽऽऽन पैकी करून दिले पाहिजे.
कोकण पेश्शल कोकम सरबत!
हेही आवडतं. पण बाहेर उन मी म्हणत असावे. लिंबू सरबत उन्हे नसली तरी आवडते.
शक्तिवर्धक गोड, थंडगार नीरा
सकाळच्या वेळी जास्त मजा येते.
रॉ मँगो ज्युस! म्हणजे आपलं ते कैरीचं पन्हं हो! :)
सिझनल. वर्षभर नाही मिळत. मिळते तेंव्हा जाम आवडते.
पित्तशामक आवळा सरबत...
अजून चव घेतली नाही. पण बहुतेक आवडणार नाही. (उगीच आवळाआवळी आवडत नाही).
आम्ही ठाकर ठाकर - करवंदाचं सरबत :)
अजून चव घेतली नाही. आवडेलसे वाटत नाही.
देवाची करणी अन् नारळात पाणी!
ऑल टाईम ग्रेट.
कोक, पेप्सी इत्यादी सॉफ्ट ड्रिन्कस्
कोक, पेप्सी फक्त 'रम' बरोबर. एरवी अजिबात नाही.
इतर..(इतरवाल्यांनी प्रतिसादामध्ये कृपया आपल्या आवडीच्या पेयाचाउल्लेख करावा!)
ह्याची एक मोठी यादी पूर्वीच दिली आहे. ती वाचावी. सारखं-सारखं काय आम्हाला दारू खूप आवडतेचा जप करायचा?
लि॑बू सरबत///
!!!!!!!!!!! !!!!!!!!!!!!
!!!!!!!!!!!!! !!!!!!!!!!!
!!!!!!!!!!! !!!!!!!!!!!!!
जेव्हा येइल मरगळ ,
जेव्हा येइल मर गत ,
जेव्हा-जेव्हा येते..............
तेव्हाच गोड लागतो आमचा सरबत
लि॑बू सरबत!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
लिंबु सरबत!
संजय अभ्यंकर
https://smabhyan.blogspot.com/
लिंबू सरबत....
नेहमीच आवाडत कधी ही.....
Sweet Sonu
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
छांछ...कुठे गेली
नागपुरच्या उन्हांत थंडगार ऊसाचा रस केव्हाही आवडतो. शिवाय जेवल्या नंतर थंडगार छांछची मजाच निराळी... =P~ =P~
मला तर स्वप्नातही भुक लागते....
कोकम सरबत!
वरिलपैकी सॉफ्ट ड्रिन्कस् आणि नीरा ह्या व्यतिरिक्त सर्व काही आवडत. अजून काहि गोष्टीही आवडतात, धण्याच पाणी आणि गुलाबाचे सरबात (सबजा घातलेल).
आमची आवड
माठाच्या गार पाण्यात केलेलं घरगुती लिंबू सरबत....
आवडतं पण आईने केलेले.
कोकण पेश्शल कोकम सरबत!
हेही आवडतं. पण बर्फ न टाकता....माझी जी मस्तच करते
शक्तिवर्धक गोड, थंडगार नीरा
कधी पण ओके
रॉ मँगो ज्युस! म्हणजे आपलं ते कैरीचं पन्हं हो!
वर्षभर आवडते व मिळते.
पित्तशामक आवळा सरबत...
चव घेतली. आवडली. आळेफट्यावर छान मिळते.
आम्ही ठाकर ठाकर - करवंदाचं सरबत
मस्तच असते.
देवाची करणी अन् नारळात पाणी!
ऑल टाईम ग्रेट.
कोक, पेप्सी इत्यादी सॉफ्ट ड्रिन्कस्
कोक, पेप्सी फक्त 'रम' बरोबर. एरवी अजिबात नाही.
इतर.. दारू कुठलाही ब्रॅड
लिंबूसरबत..
नेहमीच ...
कोकम्/नारळपाणि सुद्धा आवडत..
नीरा/ पेप्सी कोक अजिबात आवडत नाही..
लि॑बू सरबत
लि॑बू सरबत!
कडक उन्हात,
थ॑ड वार्यात,
कापशी बर्फात,
लि॑बू सरबत!
आईच्या हातच,
कोपर्यावरच्या भैय्याच्या
लाल फड्क्यातील
काळ्या माठातील
लि॑बू सरबत!!