✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जागरण गोंधळ : आई देवी अंबेचा जागर मी करीतो

प — पाषाणभेद, गुरुवार, 12/09/2010 - 13:03
जागरण गोंधळः आई देवी अंबेचा जागर मी करीतो
आई देवी अंबेचा जागर मी करीतो जागर करीतो देवी अंबेचा गोंधळ मी घालीतो ||धृ|| आई तू ग माझी गुणी नउवारी पातळ नेसूनी कपाळी मळवट लाल लेवूनी आई बसली सिंहावरी देवी अंबेमातेला वंदन करीतो वंदन करीतो तुळजाभवानीच्या पायी नमीतो पायी नमीतो आई देवी अंबेचा जागर मी करीतो ||१|| सुरू होई अश्विन महिना मनी आनंद काही मावेना नवरात्राच्या ग सोहळी नऊ दिवस आरती ओवाळी नऊ दिवसांचे उपास मी करीतो उपास करीतो सप्तश्रूंगीची मी ओटी भरीतो ओटी भरीतो आई देवी अंबेचा जागर मी करीतो ||२|| साडीचोळी खणा नारळाची ओटी भरली मी अंबिकेची दिवा रातंदिस तेवतो घट मातीचा मी पुजीतो पंचपक्वांनाचा नैव्येद्य दावितो नैव्येद्य दावितो रेणूका मातेला तांबूल मी देतो तांबूल देतो आई देवी अंबेचा जागर मी करीतो ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) ०४/११/२०१०

प्रतिक्रिया द्या
4352 वाचन

💬 प्रतिसाद (5)

मस्त रे पाभे !!

अवलिया
गुरुवार, 12/09/2010 - 14:46 नवीन
मस्त रे पाभे !!
  • Log in or register to post comments

मस्त गाणं आहे रे पाभे!

मेघवेडा
गुरुवार, 12/09/2010 - 14:49 नवीन
मस्त गाणं आहे रे पाभे! दणदणावत म्हणायला मजा येईल!
  • Log in or register to post comments

अप्रतिम ... अतिशय मस्त ..

गणेशा
गुरुवार, 12/09/2010 - 15:35 नवीन
अप्रतिम ... अतिशय मस्त .. म्हणताना ही खुप छान वाट्ले
  • Log in or register to post comments

आवडली, अगदी डोळ्यासमोर आली आई

स्पंदना
गुरुवार, 12/09/2010 - 18:12 नवीन
आवडली, अगदी डोळ्यासमोर आली आई भवानी! खुप दिवसांनी आलात पाभे? कुठे होतात?
  • Log in or register to post comments

सुंदरच

शुचि
गुरुवार, 12/09/2010 - 20:39 नवीन
सुंदरच
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा