काश्मिर हा मुद्दा असा आहे की कोणी कितीही वेळा चर्चा करोत मात्र दरवेळी नव्याने चर्चा कराविशी वाटते. सध्या कारण आहे ते म्हणजे "इंडीया आफ्टर गांधी" हे पुस्तक. यातील "A Valley Bloody and Beautiful' हे प्रकरण नुकतेच वाचले. काश्मिर बद्दल अनेक नव्या गोष्टी कळल्या. त्यातील काहि रोचक तुकड्यांचा स्वैर अनुवाद इथे देतो आहे.
---------
राजा हरीसिंग सप्टेंबर १९२५ पासून काश्मिरचा महाराजा होता. त्याचा बराचसा वेळ "मुंबई रेसकोर्स" आणि शिकारीस जात असे. त्याच्या चौथ्या बायकोची तर तक्रार होती की तो 'कधीही लोकांच्या संकटाच्यावेळी त्यांच्यासोबत नसतो - त्यांना भेटत नाही. त्याच्याभोवती ठराविक लोकांचं कोंडाळं असतं - त्याला त्याच्याबाहेर काय चाललंय याचा पत्ताही नसतो"
---------
शेख मुहम्मद अब्दुल्ला हे अलिगढ विद्यापिठातून मास्टर्स डिग्री मिळवलेले असूनही त्यांना सरकारी नोकरी मिळत नव्हती. त्यांनाच असं नाही तर राज्यातील मुसलमानांना (जे बहुसंख्य होते) सरकारी नोकरी मिळणे कठीण होते. याविरूद्ध त्यांनी उठवलेल्या आवाजाचे रुपांतर पुढे १९३२साली 'ऑल जम्मु काश्मिर मुस्लिम कॉन्फरन्स' ह्या महाराजांच्या धोरणाला विरोध करणार्या पक्षात झाले. व अजून सहा वर्षांनी हिंदु व शीखांना पक्षात समाविष्ट करून त्यांनी "नॅशनल कॉन्फरन्स" बनवली.
---
याच सुमारास शेख अब्दुला नेहरुंना भेटले. सुदैवाने हिंदु-मुसलमान एकतेच्या समान दृष्टीकोनामुळे ह्या दोन्ही हट्टी नेत्यांचे सूर जुळले. पुढे शेख अब्दुल्ला यांनी महाराजांविरूद्ध बंड पुकारले. चाळीसच्या दशकात दोनदा जेलची हवा खाऊन आलेले शेख अब्दुल्ला काश्मिरींच्या गळ्यातील ताईत बनले होते. १९४६ ला त्यांनी "डोग्रा" सम्राटाला "चले जाव" चा इशारा दिला आणि सत्ता काश्मिरी जनतेच्या हवाली करण्याचे आवाहन केले.
----
इथपर्यंतही काश्मिर हा "ब्रिटीश इंडीया"चा भाग नव्हता. नेहरुंचा शेख अब्दुल्ला यांना पाठिंबा होता. त्यांना भेटायाला गेले असताना हरिसिंगांनी नेहरूंना काश्मिरमधे प्रवेश नाकारला होता व सीमेवरून "ब्रिटीश इंडिया"त परत पाठवले होते.
---
पुढे ब्रिटीश जाणार हे नक्की झाल्यावर 'रामचंद्र काक' या आपल्या पंतप्रधानाच्या सल्ल्याने वागणार्या राजाने स्वतंत्र रहायचा निर्णय घेतला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी काश्मिरने भारत किंवा पाकिस्तानात सहभागाचा करार केलेला नव्हता
---
२९ सप्टेंबरला शेख अब्दुल्ला सुटल्यावर पाकिस्तानला आशा होती की हा मुस्लिम नेता पाकिस्तानात जाण्यात इच्छा प्रकट करेल मात्र त्यांनी जेल मधून सुटताच राजाकडे सत्ता "काश्मिरी जनतेकडे" देण्याची मागणी केली व सत्तांतर झाल्यावर जनता ठरवेल की कोणत्या देशात जायचे ते.
---
१२ ऑक्टोबर रोजी काश्मिरच्या उपपंतप्रधानांनी स्पष्ट केले की त्यांनी स्वतंत्र रहायचा निर्णय घेतला आहे. मात्र जर भारत किंवा पाकिस्तानने बळाचा वापर केला तर तो करणार्याच्या विरूद्ध निर्णय आम्हाला घ्यावा लागेल
---
२२ ऑक्टोबर रोजी अचानक नॉर्थ-वेस्टच्या स्थानिक पठाणी टोळ्यांनी काश्मिरवर हल्ला केला. तो त्यांनी का केला व त्यांना कोणाचं सहकार्य होते याबद्द्ल पुस्तकात माहिती दिलेली नाही.
---
भारतीयांचा समज आहे की ह्या टोळ्या पाकिस्तानने घुसवल्या होत्या. तर पाकिस्तान असे केल्याला नकार देते. एक कारण पुढे केले जाते की ह्या टोळ्या हिंदु व मुसलमान सगळ्यांवर अत्याचार करत होत्या. त्यांना कोणत्याच प्रस्थापितांचे राज्य नको होते
---
२४ ऑक्टोबरला उरी तर २५ ला टोळ्या बारामुला ला पोचल्या होत्या. मेनन राजाला भेटले पण कोणत्याही करारा ऐवजी पंतप्रधानांना घेऊन दिल्लीला परतले. २६ ला पुन्हा एक मिटिंग झाली व २६ ला रात्री महाराजाला पळावे लागले व तो जम्मुला आला. तिथे २७ला पहाटे झोपेत असताना मेनन पोचले. २७ पहाटेच भारतीय सैन्य श्रीनगरला उतरले.
---
पाकिस्तानचा आरोप आहे की राजाला विश्वासात न घेता भारताने त्यावेळी सरळ सरळ घुसखोरी केली. तर भारत मेनन यांनी 'अगदी शेवटच्या क्षणी' करार केल्याचे सांगतो.
---
पुढे जिनांना समजाऊन थकलेले नेहरू अचानक १ जानेवारी रोजी काश्मिर प्रश्न युनो मधे नेतात. युनो 'जैसे थे' रहाण्याचा आदेश देते. मात्र तरीही नेहरू ३ महिने युद्ध चालु ठेवतात. इथे नेहरूंनी आपली युनो जाण्याची चुक कबूल केली आहे. ते पश्चातापाने माऊंटबॅटन यांना सांगतात "इथले (युनोतले) सत्तेचे राजकारण पाहून मी व्यथीत झालो आहे. "इथिक्स" न पाळता केलेले हे राजकारण असेल असे वाटले नव्हते."
---
आता मला पडलेले काहि प्रश्न:
१. भारताने काश्मिरच्या राजाबरोबर २७ ऑक्टोबरच्या आधी (किंबहूना सैन्य उतरायच्या आधी) करार केला हे खोडून काढणारे पुरावे उपलब्ध आहेत का?
२. पठाणी (भविष्यातील तालिबानी?) 'ट्रायबल' टोळ्यांना हल्ला करतेवेळी / त्याआधी पाकिस्तानची थेट मदत (आर्थिक/सामरिक) असल्याचे पुरावे भारताकडे आहेत का? कोणते? [पाठिंबा होता, प्रत्यक्ष मदत होती का? ]
३. काश्मिर भारताचे अविभाज्य अंग असल्याचा ठराव फार नंतर (बहुतेक ९० च्या दशकात) संसदेत मांडला गेला, त्याआधी त्यास स्वतंत्र वागणूक दिली जात असे. काश्मिरचे भारतात 'विलीनीकरण' होणारा करार झाला आहे का? (हा प्रश्न विचारायचे कारण हरीसिंगांनी भारतीय सैन्याची मदत घेतली, त्याबदल्यात भारतीयांनी संरक्षण व परराष्ट्र धोरणावर अंकुश मिळवला. मात्र स्वत:ची अशी वेगळी घटना असलेले काश्मिर स्वायत्त भारतीय प्रजासत्ताकाचे 'स्वायत्त' राज्य झाले. या सगळ्यात काश्मिरबरोबर 'विलिनीकरणाचा' करार झाला का याचा उल्लेख मिळाला नाही.)
४. मे १९४८ मधे शेख अब्दुल्ला यांनी काश्मिरचा स्वातंत्र्योत्सव साजरा केला त्यात नेहरूही समाविष्ट होते. नेहरूंच्या अनेक भाषणात काश्मिरचा उल्लेख एखाद्या वेगळ्या राष्ट्रासारखा केला जातो मग बर्याच नंतर (बहुदा नव्वदाव्या दशकात) भारताला संसदेत काश्मिर भारताचा अविभाज्य घटक असल्याचे मंजूर का करावे लागले?
५. सध्याच्या परिस्थितीत 'एल.ओ.सी.' ला आंतरराष्ट्रीय सीमा करणे याव्यतिरिक्त 'प्रॅक्टीकल' तोडगा दिसतो का?
वाचने
30592
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
राज्यातील मुसलमान बहुसंख्य
दुमत आढळले नाही
In reply to राज्यातील मुसलमान बहुसंख्य by रन्गराव
हाहाहाहा
In reply to दुमत आढळले नाही by ऋषिकेश
हा हा हा
In reply to हाहाहाहा by श्रावण मोडक
भलतेच विनोदी आहात तुम्ही.
In reply to हाहाहाहा by श्रावण मोडक
तो प्रश्न पडण्याची काही कारण
In reply to दुमत आढळले नाही by ऋषिकेश
धन्यवाद
In reply to तो प्रश्न पडण्याची काही कारण by रन्गराव
ह्या बाबतीत सहानुभीती दाखवणे
In reply to धन्यवाद by ऋषिकेश
नाऽऽद खुळा!
In reply to ह्या बाबतीत सहानुभीती दाखवणे by रन्गराव
थोडेसेच
In reply to ह्या बाबतीत सहानुभीती दाखवणे by रन्गराव
थत्ते एक चुक केलीत. त्याच
In reply to थोडेसेच by नितिन थत्ते
गुंतागुंत
In reply to थत्ते एक चुक केलीत. त्याच by रन्गराव
मुळ मुद्यापासून थोड दूर
In reply to गुंतागुंत by श्रावण मोडक
हाहाहा
In reply to मुळ मुद्यापासून थोड दूर by रन्गराव
सहानुभुती अजिबात नाही
In reply to ह्या बाबतीत सहानुभीती दाखवणे by रन्गराव
अप्रतिम प्रतिसाद.
In reply to ह्या बाबतीत सहानुभीती दाखवणे by रन्गराव
खूप छान प्रतिवाद साहेब...
In reply to ह्या बाबतीत सहानुभीती दाखवणे by रन्गराव
धागा
थत्ते काका कुठे आहेत?????
काश्मिर संबंधित बरीचशी
धन्यवाद!
In reply to काश्मिर संबंधित बरीचशी by पुष्करिणी
खुप माहिती मिळाली ऋषीकेश.
या धाग्यावर
भावना आणि वस्तुस्थिती...!!
हम्म!
In reply to भावना आणि वस्तुस्थिती...!! by इन्द्र्राज पवार
धन्यवाद
In reply to भावना आणि वस्तुस्थिती...!! by इन्द्र्राज पवार
कश्मिर
In reply to धन्यवाद by ऋषिकेश
+१
In reply to कश्मिर by ए.चंद्रशेखर
>>मंडळी सारखे काश्मिरचे धागे
In reply to +१ by ऋषिकेश
"तळ्यात कीं मळ्यात" करू नये एवढेच माझे म्हणणे आहे
कौंतर टेरेरिझम
In reply to "तळ्यात कीं मळ्यात" करू नये एवढेच माझे म्हणणे आहे by सुधीर काळे
कौंतर टेरेरिझम
In reply to "तळ्यात कीं मळ्यात" करू नये एवढेच माझे म्हणणे आहे by सुधीर काळे
"शिमला करारा"त 'LOC' ला आंतरराष्ट्रीय सीमा करण्याचे ठरले होते
भूमिकेविषयी....!
तरी बिनधास्तपणे लिहा. मला असेच लिखाण आवडेल.
In reply to भूमिकेविषयी....! by इन्द्र्राज पवार
धन्यवाद ऋषिकेश
जमीन की माणसेदेखिल?
विचारमंथन...!!
चर्चा
काश्मीर भारतात असल्या मुळे भारताचा किती
संस्थानिक आणि अॅक्सेशनचे जंजाळ
+१
In reply to संस्थानिक आणि अॅक्सेशनचे जंजाळ by इन्द्र्राज पवार
दिवाणबहादुर रामचंद्र काक...!
In reply to +१ by सुनील
+१
In reply to दिवाणबहादुर रामचंद्र काक...! by इन्द्र्राज पवार
दुव्याबद्दल धन्यवाद. अवांतर :
In reply to +१ by ऋषिकेश
आर्किऑलॉजिस्ट काक...!!
In reply to +१ by ऋषिकेश
जियो!
In reply to संस्थानिक आणि अॅक्सेशनचे जंजाळ by इन्द्र्राज पवार
एक आवश्यक दुरुस्ती....!
In reply to संस्थानिक आणि अॅक्सेशनचे जंजाळ by इन्द्र्राज पवार
मीही बरेच दिवस हेच समजत होतो
In reply to एक आवश्यक दुरुस्ती....! by इन्द्र्राज पवार
+१
In reply to मीही बरेच दिवस हेच समजत होतो by फारएन्ड
http://www.youtube.com/watch?v=PihzQ-SGus8&feature=related
खरे आहे
In reply to http://www.youtube.com/watch?v=PihzQ-SGus8&feature=related by निनाद मुक्काम …
सुरेख प्रतिसाद!
In reply to खरे आहे by हुप्प्या
सत्य चित्र...!
In reply to सुरेख प्रतिसाद! by सुधीर काळे
वाजपेयींच्याकडे ती ताकत नव्हती जी नेहरू, शास्त्री वगैरेंकडे होती
In reply to सत्य चित्र...! by इन्द्र्राज पवार
फारच मस्त चर्चा
In reply to वाजपेयींच्याकडे ती ताकत नव्हती जी नेहरू, शास्त्री वगैरेंकडे होती by सुधीर काळे
मुद्दा
In reply to http://www.youtube.com/watch?v=PihzQ-SGus8&feature=related by निनाद मुक्काम …
न समजणारे दोन-तीन प्रश्न आहेत ते इथे लिहिले आहेत!
In reply to मुद्दा by नितिन थत्ते
महंमद जलालुद्दिन या जम्मू येथील गृहस्थाचे प्रतिसाद
In reply to न समजणारे दोन-तीन प्रश्न आहेत ते इथे लिहिले आहेत! by सुधीर काळे
स्वतंत्र राहण्याचा अहंकार....!!
'राजकारण्यांचा खेळ होतो आणि सैनिकांचा जीव जातो' हे बरोबर नाहीं
In reply to स्वतंत्र राहण्याचा अहंकार....!! by इन्द्र्राज पवार
सुंदर चर्चा
माझी मते / उत्तरे
In reply to सुंदर चर्चा by पैसा
काश्मीर प्रश्न फारच नाजुक अवस्थेत
धागा वाचनखुण म्हणुन साठवला
वाचनखून
हा धागा व त्यातील प्रतिसाद
+१
In reply to हा धागा व त्यातील प्रतिसाद by श्रीगुरुजी