चेंडू मारियेला
यशोदे तुझा कृष्ण निराला
राधेश्याम! चेंडू मारियेला
कशी जावू यमुने तीराला
राधेश्याम! चेंडू मारियेला .... ॥धृ०॥
रंगी श्रीरंग, नरनारी संग
मारी पिचकारी, भिजवितो अंग
दिसरात हर जागियेला .... ॥१॥
रगडी गुलाल, गळा,मान,गाली
राधा लाल लाल, शरमिली झाली
चराचर सुर लाजियेला ....॥२॥
माधवाचा घोष, जाहला जल्लोष
बेधुंद नाचताती, मुरलीचा जोष
अरविंद क्षण पाहियेला .... ॥३॥
गंगाधर मुटे
..................................................
(१९८०-८५ चे सुमारास लिहिलेली गौळण)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1827
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान !!
+१
In reply to छान !! by अवलिया
अतिशय सुंदर
मस्त ! सुंदर !! आवडली !!!
खूप सुंदर!!