Skip to main content

"मिसळपाव" ची लोकप्रभेने घेतलेली दखल

लेखक स्पा यांनी मंगळवार, 07/12/2010 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसत्तेच्या "लोकप्रभा" या साप्ताहिकाने या आठवड्याच्या अंकात "मिसळपाव" च्या प्रसिद्धीची दखल घेतलेली आहे यामुळे मिसळपाव अजूनच बहरेल, आणि नवीन नवीन "सभासद" दाखल होतील हीच आशा. आणि "मिसळपाव" ला हार्दिक शुभेछा http://www.loksatta.com/lokprabha/20101210/sanket.htm

वाचने 5363
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

In reply to by अवलिया

स्पायाचे अभिनंदन...तो लोकप्रभा वाचतो ही नवीन माहिती मिळाली.

मस्त :) उल्लेख पाहुन आनंद झाला :) तमाम मिपाकरांचे अभिनंदन :) - छोटा डॉन

मिसळ्पावचे तसेच सर्व नामांकित सदस्यांचे अभिनंदन.. मी तर एका (सकाळ/लोकसत्ता) वर्तमानपत्रातील पुरवणीतील लेखामुळेच मिसळ्पावशी जुळ्लोय..

In reply to by मन१

+१ मिसळपावनेही लोकप्रभाची दखल घेतलेली आहे हे कळवण्यात यावे.

In reply to by नगरीनिरंजन

>>मिसळपावनेही लोकप्रभाची दखल घेतलेली आहे हे कळवण्यात यावे. =)) =)) =)) जबरा !!! कळवा हो कळवा. शिवाय मिपावर शुद्धलेखन आणि इतर थोतांडापेक्षा चांगले लेखन ह्याला प्राधान्य आहे हे ही त्यांना कळवा बरं का. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

आणि इथले संपादक तिथल्या संपादकांपेक्षा चांगले आहेत हे पण कळवा. च्यामारी लोकप्रभेत माझा एक पण लेख अजुन आला नाही.. ;) इथे निदान दोन चार तरी आले (वा राहिले) आहेत :)

In reply to by अवलिया

ह्या ह्या ह्या ह्या ह्या ह्या ह्या ह्या..... यातल्या एका वाक्याने घैवरुन आले हो!! च्यायला, त्या लोळणार्‍या स्मायल्या कुठे गेल्या राव? आत्ता सगळ्यात जास्त गरज होती ना!!! :D --असुर

In reply to by असुर

ह्या पुणेरी प्रतिक्रिया पाहून, लोक्प्रभावले म्हणतील, कुठून झक मारली आणि यांची "दखल" घेतली

In reply to by स्पा

हा नुसता ग्रंथ नसुन ज्ञाणेश्वरी आहे , तेंव्हा मिसळपाववरचे ज्ञाणेश्वर ओळखा आणि त्यांना विचारा

In reply to by अवलिया

लोकप्रभा म्हणजे ते कावळे शिटल्यागत फाँट आहे तेच का ? तेज्यायला त्यांना आधी कुठल्या पॅरा शेजारी कुठला फोटो छापायचा ते शिकवा ! असो... आणि हो अशा प्रकारच्या लेखनास मिपामुळे उद्युक्त झाल्याबद्दल त्यांनी मिपाचे काही ॠण वगैरे मानले असते तरी चालले असते हे पण कळवा त्यांना. परा भयंकर संस्थापक मिसळपाव दुर्लक्षित पँथर

In reply to by परिकथेतील राजकुमार

आणि हो अशा प्रकारच्या लेखनास मिपामुळे उद्युक्त झाल्याबद्दल त्यांनी मिपाचे काही ॠण वगैरे मानले असते तरी चालले असते हे पण कळवा त्यांना. >अवश्य ........... जशी आपली मर्जी............ पक्ष श्रेष्ठी जसं संगतील तसं..... स्पावड्या कार्यकारी अध्यक्ष मिसळपाव दुर्लक्षित पँथर

आणि मिपावरील सर्व सदस्यांचे देखील कौतुक!! (पर्यायाने स्वःताचे कौतुक.. ;) च्यायला, दुसरं कोण करणार आहे? )

आता मुंबई .डोंबिवली /ठाणे भागातिल मराठी वाचक व सारस्वत मिसळपाव मध्ये सामील होतील . मराठा तितुका मेळवावा .महाराष्ट्रे धर्म वाढवावा .

महाराष्ट्र मंडळ, कुवेत च्या वेबसाइट वर सुद्धा मिपा ची डायरेक्ट एन्ट्री दिली आहे. बघा http://www.maharashtramandalkw.org/ मराठी वेब संकेतस्थळे या सदराखाली तुम्हाला सापडेल. मिपा रॉक्स............ अभिनंदन.

लोकसत्तेच्या "लोकप्रभा" या साप्ताहिकाने या आठवड्याच्या अंकात "मिसळपाव" च्या प्रसिद्धीची दखल घेतलेली आहे
हे वाचून आनंद वाटला.. अभिनंदन व शुभेच्छा.. (संस्थापक) तात्या.