कोकण दर्शन - दिवेआगरचा समुद्र-भाग १
लेखनप्रकार
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ४ दिवस सुट्टी घेतली व सकाळी ६ च्या पिंपरी चिंचवड- वाडा एस टी बसने पनवेलला उतरलो. पनवेलला नासिकवरून कारने प्रसाद व हृषीकेश हे दोन भाउ थोड्याच वेळात आले. व पुढे प्रवास चालू केला. कर्नाळ्याचा सुळका थोड्याच वेळात दिसू लागला मुंबई-गोवा महामार्ग कर्नाळ्याच्या पक्षी अभयारण्यातूनच गेलेला आहे. वाटेत मर्कटलीला पाहायला मिळाल्या. पुढे पेण-वडखळ नाका, कोलाड असे करत माणगावला पोहोचलो तिथून डावीकडे वळून म्हसळा-दिवेआगरच्या रस्त्याला लागलो. आता लाल माती, सदाहरित जंगलांचा फील येउ लागला होता. म्हसळा मागे टाकले व व थोड्याच वेळात बोर्ली पंचतनला पोहोचलो. दिवेआगर व बोर्ली अंतर जेमतेम १ किमी पण मध्ये पूर्ण ओसाड जमीन आहे.
दिवेआगरात प्रवेश करताच ओसाड जमिनीची जागा नारळी-पोफळींनी घेतलेली असते. सुवर्णगणेशाचे मंदिर मागे टाकून आम्ही पुढे जातो. आता पोटात कावळे कोकलू लागलेले असतात. आम्ही आता बापटांकडे जातो. तिथल्या सुग्रास भोजनाने तृप्त होतो. मुक्कामाचे ठिकाण मिळायला गर्दी नसल्याने काहीच अडचण येत नाही. थोड्याच वेळात वामकुक्षी आटोपते. आता वेध लागलेले असतात ते समुद्रस्नानाचे. आम्ही किनार्यावर जातो. केवड्याच्या वनातूनच रस्ता आहे. स्वच्छ,सुंदर, सुरक्षित, लांबलचक समुद्रकिनारा पाहूनच भान हरपून आम्ही लगेच पाण्यात उतरतो. सोनेरी वाळू निळयाशार पाण्यात पायांना गुदगुल्या करत असते. मनसोक्त डुंबतो. पाण्यातून बाहेर येतो. किनार्यावरच चटई टाकून बसतो. निवांतपणे.
सुर्यास्ताची वेळ जवळजवळ येत असते. भगवान सहस्त्ररश्मी अजूनही झळाळतच असतो. पण हळू हळू त्याचे तेज डोळ्यांना सहनीय होत जाते. सुवर्ण आता तांबूस व्हायला लागते. पाण्याचाही रंग आता बदलायला लागतो. थोड्याच वेळात सुर्य खालून अर्धा होतो. अजून कमी होतो. शेवटी कमी कमी होत क्षितीजावर एक बारीकशी रेघ दिसूनशी लुप्त होते. सुर्यास्त होतो तो दुसर्या दिवशी पुन्हा सुर्योदयासाठीच.
दिवेआगरातील कोकणी घर-
सुपारीची वाडी-
सुर्यास्ताच्या आधी
सुर्यास्ताच्या शेवटच्या क्षणी-
सुर्यास्तानंतर

सुपारीची वाडी-
सुर्यास्ताच्या आधी
सुर्यास्ताच्या शेवटच्या क्षणी-
सुर्यास्तानंतर

वाचने
11426
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
एकदम सुंदर...........
दिवेआगरला दोन वेळा जाने
स्वसंपादन
व्वा ..............काय झक्कास
मस्त. रहाण्याच्या व्यवस्थेची
In reply to मस्त. रहाण्याच्या व्यवस्थेची by अमोल केळकर
येथे पहा
In reply to मस्त. रहाण्याच्या व्यवस्थेची by अमोल केळकर
धागाकर्त्यांनी सुरेख धागा लिहिलाय.
व्वा वल्ली व्वा !! कोकण
In reply to व्वा वल्ली व्वा !! कोकण by टारझन
तिथे
कोकण दर्शन ........
मी काशिद अन त्या बाजुला
In reply to मी काशिद अन त्या बाजुला by स्पंदना
दुर्दैवाने नाही
मस्त हो वल्ली अप्रतिम
येवा कोकण आपलेच आहे
सगळे फोटो छान! खालून पहिला
छान...
मस्तच