Skip to main content

नमस्कार मंडळी...

नमस्कार मंडळी...

Published on 04/12/2010 - 14:01 प्रकाशित मुखपृष्ठ
तशी मिसळ पाव म्हणजे लहानपणा पासूनच माझा जीव कि प्राण...एन्जिनिएरिग नंतर पुण्यात आलो नोकरी साठी. मग काय "काटा-किर्र" , "नेवाळे मिसळ " यांच्या कडे जाने सुरु झाले... असेच एकदा डोक्यात आले...चला आपणच बनवू मिसळ घरच्या घरी...मिसळ बनवायचा संकल्प तर सोडलेला...पण एक प्रश्न्न आ वासून समोर उभा राहिला...मिसळ बनवण्याची कृती कोणाला येते....झाली का पंचायीत...मग काय व्यवसायाने संगणक अभियंता असल्याने सर्व प्रश्नांची उत्तरे गुगल बाबा न माहित असतात हे पक्के माहित होते...गुगल बाबाना मिसळ पाव ची रेसिपी विचारली...बाबा नि तर भली मोठी यादीच समोर ठेवली...आणि तोच तो क्षण होता...आम्हाला मिसळ पाव चे संकेत स्थळ गवसले....देवा शप्पथ खरे सांगतो...हि पहिली मराठी साईट आशी पहिली....कि जो खूप जवळची वाटली...एकदाच्या पाक कृती पाहून आम्ही आमच्या पोटाव प्रयोग करायला सुरु केले...पण काही अपवाद आणि अपघात वगळता....बहुतांशी प्रयत्न आनंददायी होते....नंतर नंतर वीकएंड ला भ्रमंतीचा मूड आला कि...लगेच मिसळपाव ला भेट....फोटोग्राफी चे आकर्षण असल्याने...सतत मिसळ पाव वरील नाव नवीन फोटो पाहणे सुरु झाले...आणि आज मिसळ पाव हा जीवनातील अविभाज्य घटक होऊन बसला आहे...माझ्या सारख्या कित्येकांना मिसळ पाव ने खूप काही दिले त्या बद्दल मिसळ पाव चे खूप खूप आभार....
लेखनप्रकार

याद्या 2861
प्रतिक्रिया 15

मी अपर्णा. मिपा ची तशी नवीच सदस्य. या स्थानावर आल्यापासुन आठवड्यातुन निदान एकदा तरी वाचायला मिळणार्‍या , एखाद्या सुंदर गाण्याच रस्ग्रहण तात्यांच्या शब्दात वाचायची सवय लागलेली! गेले १५ दिवस तात्या मिपावर नाही दिसले. तुम्हाला माहित आहे की नाही ,नाही माहित पण , हे अस रुपड अन असा मोकळे पणा , असा झणझणित पणा या स्थळाला आला तो त्याच्या जन्मदात्या या तात्यांमुळे! तेंव्हा आभार मानायचे तर त्यांचे माना.

मृगजळ आणि अपर्णा अक्षय यांचे मिसळपाववर स्वागत आहे. :) - नीलकांत

In reply to by नीलकांत

अहो अहो निलाकांत? इतकी काही नविन नाही मी की उठुन तुम्ही स्वागत कराव! तशी जुनी आहे मी पण तशी जुनी नाही ना? अन हो मृगजळ तात्यांच्या कल्पनेला म्हणजे अरुपाला रुप देणारे ते हे निला़कांत बर! काय आहे निलाकांत मला कायम दिसणारी माणस दिसेना झाली की थोड अस्वस्थ वाटत. आता कुठे विचारायच तात्या कुठे आहेत म्हणुन या ठिकाणी चान्स मारला.

In reply to by स्पंदना

कोण किती जूणं आहे आणि कुणाला कसं अस्वस्थं वाटतं हे कळण्याइतपत माझा वावर मिपावर आहे. मिपांची ओळख करून देताना जरा उत्साहाला आवर घालावा ही विनंती. तात्यांची आठवण आली तर त्यात चान्स मारण्यासारखे काही नाही. सरळ त्यांना व्य.नि. टाकावा. किंवा सरळ त्यांच्या नावाने लेख लिहावा. चांगलं वाईट दोन्ही एकाच मापाने आणि सहजतेने स्विकारणारा माणुस आहे तात्या. त्यांच्या नावाने उगाच इकडे तिकडे प्रतिक्रिया देत राहणे योग्य नाही. माझा उल्लेख कृपया नीलकांत असा करावा, नीलाकांत नाही. धन्यवाद. - (जाणता) नीलकांत

नमस्कार मित्रानो, मी पण सदस्यरुपाने नवीन आहे येथे... :hat: मी प्रतिक, नाशिककर, डीजे आहे. :)