मरण्यात अर्थ नाही
मरण्यात अर्थ नाही
.
संवेदनेत आता, जगण्यात अर्थ नाही
जाळून या मनाला, सजण्यात अर्थ नाही
आहे दिले तुला मी, आयुष्य दान माझे
आता वळून मागे, बघण्यात अर्थ नाही
ते भाग्यवंत थोडे, शिखरास गाठती जे
आता पुढेच जावे, हटण्यात अर्थ नाही
ही खिंड राखताना, मृत्यूसवे लढावे
जखमांस घाबरोनी, पळण्यात अर्थ नाही
हो अभय एकदाचा, निश्चिंत निश्चयाने
ऐसे क्षणाक्षणाला, मरण्यात अर्थ नाही
गंगाधर मुटे
.....................................................
क्या बात है ! सुरेख !!
+१
वा वा मस्तच! कवितांच्या सहसा
हो अभय एकदाचा, निश्चिंत
मस्त... थोडी थट्टा करावी
आहे दिले तुला मी, आयुष्य दान
धन्यवाद.
अप्रतिम!
ते भाग्यवंत थोडे, शिखरास
व्वा !! वीररस कसा ओसांडुन