कर नाही, त्यालाच डर नाही !
महान भारताच्या महान लोकशाहीत संसद गेली १४ दिवस बंद आहे. बातम्यांनी वृत्तपत्रांची पाने वाहून जात आहेत. कोण 'योग्य', कोण 'अयोग्य' ह्याचे रोज विविध विचार वाचून नक्की काय ते कळत नाही.
विविध वृत्तपत्रांमधून ज्या पद्धतीने हि परस्थिती हाताळली गेली हवी होती असे ठासून सांगितले जाते, तेव्हा त्यांनी आजच्या आदर्श पद्धतीचा अभ्यास केलेला असतो नि नसतो, ह्याचाच विचार मनात येतो.
ढोबळ मुद्धे :
१) विरोधकांनी जे संसदबंद चालू केले आहे ते कितपत योग्य आहे ? नसेल, तर मग दुसरा प्रभावी उपाय कोणता ?
२) सरकार विरोधकांची 'संयुक्त संसदीय समिती' (जेपीसी) मागणी मान्य का करत नाही ? असे करण्यामागे सरकारची काय जी भूमिका आहे, ती कितपत योग्य आहे ?
३) गेली १४ दिवस जे संसद बंद आहे त्याची जबाबदारी खरोखर कोणाची ? सरकारची, विरोधकांची, जनतेची कि सर्वांची ?
४) आज सरकारला कोंडीत न पकडता, संसदेत केवळ चर्चेद्वारे मूळ भ्रष्टाचारावर खरोखरीच नियंत्रण आणता येईल काय ?
५) 'संयुक्त संसदीय समिती' (जेपीसी) ची स्थापना जर झाली तर त्याने सरकारला काही तोटा होऊ शकतो का, कि विरोधकांना काही फायदा ?
विरोधी पक्षांची मागणी असंसदीय किंवा संसदविरोधी आहे काय, या प्रश्नाचे उत्तरही "होय' असे देणे अवघड आहे. विविध प्रचार माध्यमांचा सूर असा दिसत आहे कि संसद गोंधळामुळे ९५ कोटींचा भुर्दंड तिजोरीवर पडला आहे, पण जिथे लाखो करोडो रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी निष्पक्षपणे करून दोषींना सजा देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे, तिथे ९५ करोड पणाला लावले तर ते योग्य ठरेल काय ? कि ९५ कोटी वाचविण्यासाठी कामकाज आहे त्याच पद्धतीने पुढे जाऊन द्यायचे आणि भविष्यात पुन्हा परत पहिले पाढे पंचावन्न ?
मिपाकरांना काय वाटते ?
अधिक वाचनासाठी दुवे :
http://72.78.249.124/esakal/20101202/4686897583712771926.htm
http://72.78.249.124/esakal/20101202/5644089233050370712.htm
http://72.78.249.124/esakal/20101202/5534412479250946362.htm
http://72.78.249.124/esakal/20101203/4709642710324116329.htm
http://72.78.249.124/esakal/20101203/5176179306440625244.htm
http://72.78.249.124/esakal/20101129/4694954486635855192.htm
http://72.78.249.124/esakal/20101203/5224506154514494938.htm
http://72.78.249.124/esakal/20101203/4774364087680602051.htm
http://72.78.249.124/esakal/20101202/4720652688987652872.htm
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7029954.cms
http://timesofindia.indiatimes.com/india/Oppn-stalls-Parliament-demands-JPC-probe-into-scams/articleshow/6900542.cms
सरते शेवटी केवळ एकच म्हण आठवते 'कर नाही केवळ त्यालाच डर नाही'
याद्या
2607
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
कठीण आहे
ह्यांना अंकुश लावणे महा
आणखी
पुढे आपण केव्हातरी
In reply to आणखी by नितिन थत्ते
मिपावरील जाणकार ह्या विषयी
संसदेची कोंडी आज अठराव्या दिवशीही कायम राहिली.
मूर्ख आहेत लेकाचे!!!
भि चो आहेत सग्ले
भारतीय संसदेने नोंदविला नवा