Skip to main content

Tasty yummy Snacks 1 : Instant Onion Rava Dosa

Tasty yummy Snacks 1 : Instant Onion Rava Dosa

Published on 01/12/2010 - 13:58 प्रकाशित मुखपृष्ठ
साहित्यः बारीक रवा २ चमचे, तांदळाची पिठी २ भांडी, जिरे, मीठ, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर क्रुति: एका वाटीत बारीक रवा घेऊन त्यात थोडे पाणी घालून तो १५/२० मिनिटे भिजू द्यावा. त्यानंतर एका मोठ्या बाउलमध्ये तांदूळाची पिठी घेऊन त्यात हा रवा, थोडे जिरे, हिरव्या मिरच्यांचे पातळ काप/तूकडे, कोथिंबीर, पाणी, चवीपुरते मीठ घालून नीट ढवळा. दोस्याचे पीठ तयार. आता या पिठाचे छान दोसे घाला. लगेच त्यावर वरून कांदा पसरा. मस्त जाळीदार Onion Rava Dosa तयार. त्यावर लोणी घालून तो हिरव्या चटणी बरोबर किंवा (शेंगदाणा चटणी + दही) बरोबर वाढा.

याद्या 5629
प्रतिक्रिया 7

In reply to by पिंगू

चविष्ट स्वादिष्ट नाष्टा १: झटपट कान्दा रवा दोसा आता खुष का :) (आधीच लिहिलेल्या लेखाचे नाव बदलता येत नसल्याने ही २/३ पदार्थांची सेरीज उर्फ मालिका आंग्ल भाषेतील नावानेच लिहिण्यात येईल, याची नोंद घ्यावी :))

फोटो upload करण्यास येथे access नाही. पेन्ड्राइव्ह disabled आहे. घरी नेट नाही. विकेन्ड ला (महत्वाच्या कामांसाठी सुद्धा) नेट ला जायला वेळ नाही. असे हे फोटोचे कोडे सोडवा. उत्तर सांगा. त्यानुसार फोटो चढवला जाईल :-)

फोटु टाकला असता तर अजून छान छान वाटले असते. एक सुचना. रवा ताकात भिजवा. डोसा/उत्तपा हलका होतो आणि चवसुद्धा छान लागते. प्रयोग करून बघा.