साहित्यः बारीक रवा २ चमचे, तांदळाची पिठी २ भांडी, जिरे, मीठ, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर
क्रुति: एका वाटीत बारीक रवा घेऊन त्यात थोडे पाणी घालून तो १५/२० मिनिटे भिजू द्यावा. त्यानंतर एका मोठ्या बाउलमध्ये तांदूळाची पिठी घेऊन त्यात हा रवा, थोडे जिरे, हिरव्या मिरच्यांचे पातळ काप/तूकडे, कोथिंबीर, पाणी, चवीपुरते मीठ घालून नीट ढवळा. दोस्याचे पीठ तयार.
आता या पिठाचे छान दोसे घाला. लगेच त्यावर वरून कांदा पसरा. मस्त जाळीदार Onion Rava Dosa तयार. त्यावर लोणी घालून तो हिरव्या चटणी बरोबर किंवा (शेंगदाणा चटणी + दही) बरोबर वाढा.
वाचने
5631
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान दोस्याचे छान फोटो टाकायला विसरलात?
चविष्ट स्वादिष्ट नाष्टा १: झटपट कान्दा रवा दोसा
In reply to छान दोस्याचे छान फोटो टाकायला विसरलात? by पिंगू
फोटो upload करण्यास येथे
नको नको..फोटो नको. जीभ खवळते
हा.. हा.. जीभ खवळते हे मात्र
फोटो बघून जीव आणि जीभ जाळून
छान.