२ कविता देत आहे, एक आईच्या भुमीकेमधुन आणि दुसरी मुळ कविता अविनाश काकांनी लिहिलेली बाबांच्या भुमिकेतुन ...
अविनाश काकांची कविता वाचताना अजुनही मन भरुन येते.. ...
-----------
१.
मी.. तू अन तुझा पपा
आपल छोटस नटलेल जग..
सासरी तू गेल्या पासुन
बैचेन झाले आहे अगदी, हे घरट ..
तुझी ती रुम, तुझी पुस्तके ,
तुझा कॉम्प, सारं तसच
अगदी शांत ...
आता तुझ्या बाबांची लुडबुड नाही
की तुझा किलबिलाट तेथे
अगदी निरस वाटते आहे ग पोरी
आठवतं मला अता ते
तुझा पसारा पाहुन माझं ओरडणं
जास्त काम पडयचं मला
पण ह्यानी तुझी बाजू घेतली तरी
रागारागातच सारं आवरणं
रोज सकाळची तुमची ती मस्ती
आणि ते भांडन .. विसरेल कशी मी
हा.. तुमच्या त्या चिडचिडीत
विसरायची मी नाष्टा करताना
त्यात मीट टाकायचे
अन मग तुम्हालाच कारण धरुन ओरडायचे
अता रोज नाष्टा करताना काही मिस नाही होत
तरी पण बरेच काही मिस वाटते आहे
तुझे ते मैत्रीणीं बरोबर
घरात ढुडघुस घालणे
कार्ट्यांनो SS म्हणत माझ नेहमीच तुम्हाला रागावणे
पण नाही ग .. अता मला सार परत हव आहे
पण .. पण अता ते शक्य नाहीये
कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस ...
रात्री जेवताना .. तुमचे लक्ष नसायचे जेवाताना
सारखे आपले ते पी. जे. आणि काही नसेल तर
माझ्या वरती हळुच प्रेमळ टोमणे
अन माझं आपलं मग पुन्हा ओरडणे
लाडवून ठेवून बिघडवली आहे लेकीला
म्हणत यांनाही बजावणे..
पण अता सार बदलल आहे. .
कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस ...
कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस ...
---- शब्दमेघ ( "स्त्री..भावनांचा प्रवास" या माझ्या डायरी मधुन )
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4332
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
भाग १ : माझी मुलगी तु मी
अतिशय
माझी मुलगी
प्रकाश आणि निवेदिता ताई
In reply to माझी मुलगी by प्रकाश१११
येवुद्यात नविन कविता