✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

संगीत नाटक - ०१ - कट्यार का़ळजांत घुसली

५
५० फक्त यांनी
Sat, 11/27/2010 - 16:23  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2782 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

परिक्षण आवड्ले

लॉरी टांगटूंगकर
Sat, 11/27/2010 - 16:36 नवीन
या संगीत नाटकांच्या सुवर्ण काळात न जन्मल्याचा पश्चाताप जास्तच होतो आहे. सहमत. एकदा तरी अभिषेकीना समोर बसून ऐकायचे होते .१ दिवस फक्त टाइम मशीन मिळू देत .थोड्या फार गोष्टी रेकॉर्डेड आहेत त्यावरच तहान भागवावी लागते .
  • Log in or register to post comments

बालगंधर्व नाट्यगृह म्हणजे

JAGOMOHANPYARE
Sat, 11/27/2010 - 17:32 नवीन
बालगंधर्व नाट्यगृह म्हणजे नेमके कुठले? गावाचे नाव लिहा.... पेपरात रोज जाहिराती बघतो, पण कुठे दिसत नाही, म्हणून विचारलं........ पूर्वी हे ४ तासाचे ३ अंकी नाटक होते...त्याची सी डी मिळते... त्यात पंडितजींचेही एक पद आहे... भजनाविण दिन गेले.... २ अंकी नाटकात पंडितजी हे पात्र नाही..
  • Log in or register to post comments

JAGOMOHANPYARE

मी-सौरभ
Sun, 11/28/2010 - 23:55 नवीन
पुणेकरांनो जागो .... बाळा 'JAGOMOHANPYARE' तुला बालगंधर्व माहीत नाही अरेरे... तुझ्या घराचा पत्ता लिहून ठेवत जा हो खिशात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

तुलना होईल म्हणून पाहयाचे धैर्य होत नाही.

चिंतामणी
Sat, 11/27/2010 - 18:15 नवीन
या संगीत नाटकांच्या सुवर्ण काळात न जन्मल्याचा पश्चाताप जास्तच होतो आहे. अगदी सुवर्णकाळात जरी जन्मलो नसलो तरी चांगला काळ बघायला नक्कीच मिळाला. या काळात पं.जितेन्द्र अभीषेकी ह्या महान व्यक्तीमत्वाने नाट्यसंगीत नुसतेच जिवंत ठेवले नाही तर त्याची व्याप्ती वाढविली. मत्स्यगंधा, गोरा कुंभार, धाडीला का तिने वनी राम, ययाती देवयानी, हे बंध रेशमाचे इत्यादी अनेक नाटक संगीतामुळे गाजली. कट्यार म्हणजे तर मेरुमणी असे म्हणायला हरकत नाही. कट्यारमधील खां साहेबांची भुमीका पं.वसंतराव देशपांड्यांनी अजरामल करून ठेवली होती. ती अजून मनात कोरलेली आहे. (जोडीला प्रसाद सावकार, फैयाज, भार्गवराम आचरेकर अशी फौज होती). त्या मनावर कोरलेल्या पं.वसंतराव देशपांड्यांनी अजरामल केलेल्या भुमीकेशी राहूलची तुलना होणार म्हणून पाहयाचे धैर्य होत नाही. (पंडीतजी हे पात्रच गाळले असेल काटछाट करताना हे समजल्यावर पाहण्याची इच्छाच गेली)
  • Log in or register to post comments

नवीन दोन अंकी नाटकही छान

JAGOMOHANPYARE
Sat, 11/27/2010 - 18:38 नवीन
नवीन दोन अंकी नाटकही छान वाटले.. ४ -५ महिन्यापूर्वी नाटक विले पार्ले -दीनानाथ ला पाहिले होते... राहूल देशपांडेंची भूमिका आणि गायकी सुंदरच आहे... दुधाची तहान ताकावर असे काही अजिबात वाटत नाही.. अगदी ओरिजिनलच.... सदाशिवची भूमिका करणार्यानीही छान गायकी सादर केली.. आलाप अगदी पं. अभिषेकी स्टाइल... पहिला स्वर लावल्यावरच गायकी लक्षात आली.... दोघांची जुगलबंदी सुंदरच... पुरिया धनाश्री मधील खुश रहे सनम मेरा ही बंदिश देखील या नाटकात आहे.. सी डी मध्येही आहे.... पंडितजी हे पात्र नाही, ते फक्त निवेदनातून संदर्भात घेतले आहे.... पण तरीही ठीक आहे... दोन अंकी नाटकही देखणेच वाटले... तेंव्हापासून रोज पेपरात जाहिराती बघतो..... अजुन कुठे जाहिरात दिसली नाही.. :(
  • Log in or register to post comments

सुबोध भावे आणि महेश काळे..

बहुगुणी
Sat, 11/27/2010 - 20:17 नवीन
..ही दोन कलाकारांची नावं खालील ट्रेलर मधून कळली, पण इतर पात्रं साकार करणार्‍या कलाकारांची नावं कळली नाहीत. एकूण या ट्रेलर मध्ये नेपथ्याची तसंच कलाकारांचंही कसं ट्रान्सफॉर्मेशन होत गेलं ते चांगलं दाखवलं आहे असं वाटलं. चार्शादः उत्तम परीक्षणाबद्दल आभार! Image removed.
  • Log in or register to post comments

भरत चे सादरीकरण अधिक सरस

मी_ओंकार
Tue, 11/30/2010 - 17:55 नवीन
'कट्यार' हे एक अप्रतिम संगीत नाटक तीन वेळा बघायला मिळाले. 'भरत नाट्य' ने सादर केलेले दोनदा तर सुबोध भावे आणि राहूल देशपांडे यांचे एकदा बघितले. पण मला आवडला तो भरत चा प्रयोग. भरत च्या प्रयोगात सदाशिव अत्यंत उत्तम जमला आहे. नाटकाचा मूळ गाभा असलेला 'गाते रहो जीते रहो' प्रसंग नाटक संपल्यावरही लक्षात राहतो. एखाद्या छापासारखा. सुबोध भावेच्या सादरीकरणात सदाशिव ची केशभूषा, कपडे, हावभाव आत्ताच्या काळातले वाटतात. त्याच्या स्वभावातील मऊपणा, त्याची तळमळ थोडी कमी वाटते. शिवाय या प्रयोगात 'दिन गेले भजनाविण सारे' हे पद नाही आहे त्यामुळे चुकल्यासारखे वाटले. अर्थात राहूल देशपांडे मस्तच. आवाजाची जात वेगळी आहे हे अगदी पहिल्या सुरापासून जाणवते. त्याच्यासाठी आणि सुबोध भावे साठी प्रयोग बघणे मस्ट. बाकी 'मुका' या संवादासाठी टाळ्या अर्थातच दारव्हेकरांना. - ओंकार.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा