१. माझी मुलगी ..
माझी मुलगी
तीच का ही ?
माझ्या पदराला धरून
लुटूलुटू मागे येणारी
लाघवी गोड हास्याने
माझे सर्वांग उत्तेजीत करणारी ...
कीती बदललेत ना दिवस ?
आज एक मुलगा येणार आहे पहायला ...
साडी नाही नेसणार
मॅचींग बीचींग नाही पाहणार म्हणतेय
तीच ही , आठवतय मला.. कुठल्याही कार्यक्रमाला
अगदी नको म्हंटले तरी साडी नेसणार म्हणुन हट्ट करणारी
नेलपेंट, बांगड्या आणी साडीही सगळे कशे मॅचींग असनारी
पण कायमच्या नाटकाला अता कंटाळली आहे बिच्चारी
आणि मी तरी काय करू ?
मुलीच्या बाजाराचे स्वागत ही आनंदानेच करु ?
अगदी कॉलेजला जायला लागली
तेंव्हा ही काळजी वाटायची
आणि आता .. आता भिती वाटते..
वाटते उगाच संस्कृतीने असे धिंदोडे काढले आहेत
भावनांचे, मनाचे.... आणि शरीराचेही
नाही तर काय, उगाच काही ही विचारायचे
वरुन खाल पर्यंत स्कॅनिंग करायचे
आणि खोट काढायची बस्स ..
येव्हडे कष्ट घेतलेत कशासाठी
स्वतंत्र विचार करता यावा ,
स्वताच्या पायावर उभे रहाव यासाठीच ना
मग असे वाटते आहे आता
का आपणही असे सामिल होतोय या बाजरात
आणि बैलाला जसे वेसन बांधुन उभे करतात विक्रीला
तसे समाजाच्या, घराच्या प्रतिष्टेचे वेसन बांधुन
आपनच आपल्या मुलीला असे मनातून खच्ची करतोय
---- शब्दमेघ ( "स्त्री..भावनांचा प्रवास" या माझ्या डायरी मधुन )
- २. कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस
- ३. माहेर .. एक आठवण..
- ४ : वर्तुळ.. गती..परीघ..
- ५ : मी ..एक स्त्री
मस्त मस्त मस्तच!
साडी नाही नेसणार मॅचींग
मुली कीती लवकर मोठ्या होतात नाही?
छान
सुंदर कविता. डोळ्यात पाणी
अगदी
उगाच त्रागा.
प्रिय मित्र pain वरील
त्या आईची मनाची घालमेल
उत्तर द्यावे की नाही या मन
सहमत..
छान आहे.
ये मिपा. है गणेशा...मिपा...
कविता छान आहे... आणि खरी आहे........
तुम्ही जे पुढे वयक्तीक
छान भावना.
आईची काळजी व्यक्त करणारी साधी