निकिता
निकिता
एका दरोड्यात ओढली गेलेली तरुण मुलगी - निकिता (ऍन परियाउद) थंडपणे तीन पोलिसांचा खून पाडते. पोलिस पकडतात पण खुनशी आणि भयानक हिंसक निकिता तेथे त्वेषाने झगडा देते. कोणत्याही प्रकारे तिला काही सांगणं अवघड असते. अर्थातच तिला देहदंडाची शिक्षा होते आणि लिथल इंजेक्शन तिला दिले जाते.
एका पांढर्या खोलीत तिला जाग येते. त्या खोलीत येणार्या काळ्या सुट मधल्या माणसाला ती विचारते हा स्वर्ग आहे का? अर्थातच तो नसतो. तिचे मरण कव्हर अप करून शवपेटी पुरली जाते त्यात ती नसतेच. हा व्हिडियो बॉब (थेकी कारियो) तिला दाखवतो. 'असं समज की मी सरकारसाठी काम करतो आणि सरकारने तुला देशसेवा करण्यासाठी अजून एक संधी द्यायची असे ठरवले आहे' असं बॉब तिला सांगतो.
निकिता हे झेपत नाही ती त्याच्या डोक्यात खुर्ची घालते. झटापटी नंतर बॉब तिला शांत करण्यात यशस्वी होतो. तिला विचार करायला वेळ देऊन खोली सोडतो.
अर्थातच तिला पर्यायच नसल्याने निकिता त्या ट्रेनिंगसाठी तयार होते. सरकारी पातळीवर थंड डोक्याने नको असलेल्या लोकांचे काम तमाम करण्याचे प्रशिक्षण!
तिला ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येतं. निकिताची तडफ आणि त्वेष इतका भयानक असतो की तिचा ज्युडो प्रशिक्षक प्रशिक्षण देतांना जखमी होतो. त्याला ती आवरतच नाही.
गन ट्रेनिंगच्या वेळी पिस्तुलाची ओळख करून देण्याच्या आतच निकिता ते उचलते आणि दणादण टारगेटवर चालवते. टारगेतच्या चिरफळ्या उडतात. चकित झालेला गन ट्रेनर विचारतो की तू हे आधी वापरले आहे का? तर ती म्हणते की माणसांवर, पण टारगेटच्या पुठ्ठ्यावर पहिल्यांदाच चालवले!
हळूहळू निकिता ट्रेनिंगमध्ये रस घेते. तिची एक मेक अप ट्रेनर तिला स्त्रीपणाची जाणीव करून देते आणि त्याचा वापर करण्याचा सल्ला देते.
तिन वर्षांनी ट्रेनिंग संपते.
बॉब भेटायला येतो. तो तिला म्हणतो की तुझ्या वाढदिवसानिमित्त मी तुला या कॉम्प्लेक्स मधून बाहेर जेवायला नेणार आहे. पॅरिस मधल्या एका शानदार मोठ्या हॉटेलमध्ये ते जेवायला जातात.
बॉब तिला एक सुंदर वेष्टन असलेले खोके भेट देतो. निकिता ते उघडते तर त्यात एक रिव्हॉल्व्हर असते. निकिता चकित होते. पण बॉब तिला सांगतो की. तुझ्यामागे असलेल्या टेबलवर चार लोक आहेत त्यातल्या दोघांना तू खलास करायचे आहे. मग पळत सुटायचे आणि पुरुषांच्या मुतारीत पोहोचायचे तेथे शेवटी एक खिडकी आहे. त्या खिडकीतून खाली उडी मारायची तेथे एक कार उभी असेल ती तुला ट्रेनिंग काँप्लेक्स मध्ये घेउन येईल. मी येथून गेल्या नंतर तू सुरुवात करू शकतेस. ही तुझी टेस्त आहे. असे म्हणून बॉब निघून जातो. सुन्न झालेली निकिता काही क्षण बसून राहते. पण नंतर निग्रहीपणे उठते आणि सरळ त्या दोघांना शांतपणे गोळ्या घालते. आणि पुरुषांच्या मुतारीत पळत जाते. शेवटी पोहोचते. तेथे सांगितल्या प्रमाणे खिडकी असते, पण विटांनी बांधून बंद केलेली... धडपडत संतापलेली निकिता धवत सुटते आणि किचन मध्ये पोहोचते. तोवर खून झालेल्यांचे रक्षकही तेथे पोहोचून गोळागोळी सुरु होते. निकिता प्रत्येक ठिकाणी कडवे प्रत्युत्तर देते. एक जण शेवटी एक रॉकेटच किचन मध्ये डागायला घेतो.
पुढे काय होते, निकिता या प्रसंगातून कशी सुटते?
असासिन म्हणून काम करू शकते का, ते चित्रपटातच पहा.
पॉइंट एंड शुट क्याटेगरीतली ही फ्रेंच फिल्म पहिल्या फ्रेम पासूनच प्रचंड पकड घेते. चित्रपटाचे चित्रण मनोवेधक आहे. फाईट सिक्वेन्स जबरदस्त आहेत.
चित्रपटाचे नाव - La Femme Nikita
भाषा - फ्रेंच
वर्ष - १९९१
(ऋषिकेशने विनंती केल्यामुळे चित्रपटाची कथा पुर्ण दिली नाहीये!)
याद्या
3652
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
(ऋषिकेशने विनंती केल्यामुळे
याच धर्तीवर जॅकी श्रॉफ आणि
In reply to (ऋषिकेशने विनंती केल्यामुळे by मृत्युन्जय
शक्य आहे
In reply to (ऋषिकेशने विनंती केल्यामुळे by मृत्युन्जय
अॅयला!
In reply to (ऋषिकेशने विनंती केल्यामुळे by मृत्युन्जय
छान लिहिले आहे .. अजुन
हो
In reply to छान लिहिले आहे .. अजुन by गणेशा
खलल्लास भाउ .
मस्त. चित्रपट पाहणे जरा कठीणच
ओके
In reply to मस्त. चित्रपट पाहणे जरा कठीणच by जागु
!!! _/\_ !!!
ब्रिजिट फोंडा चा "The Point Of No Return" / "The Assasin"
क्षमस्व ...
In reply to ब्रिजिट फोंडा चा "The Point Of No Return" / "The Assasin" by sagarparadkar
याच नावाची
हो
In reply to याच नावाची by रोचीन
निकिता स्टार मूव्हीजवर अधेमधे
मस्त पिच्चर...यावरच बेतलेला
च्च च्च
In reply to मस्त पिच्चर...यावरच बेतलेला by शिल्पा ब
बघतोच आता ! थँक्स !