Skip to main content

एक प्रश्न

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 15/11/2010 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज नथुराम गोडसे यांची पुण्यतिथी. गांधीवधाबद्दल नथुराम यांना फाशी दिले गेले. गांधी हे अहिंसेचे पूजक, समर्थक व प्रसारक. 'डोळ्याला डोळा' या न्यायाने सगळे जग आंधळे होईल असा युक्तिवाद गांधीवादी 'हिंसेला हिंसा हे उत्तर नाही' याचे समर्थनार्थ करतात. फाशी म्हणजे हत्या हे समजत असतानाही नथुराम गोडसे यांना फाशी का दिली गेली? तो न्यायालयाचा निर्णय होता असा युक्तिवाद कदाचित गांधीवादी करतीलही, पण एकाही गांधीवाद्याने या फाशीला अक्षेप घेतला नाही, त्याविरुद्ध आंदोलन केले नाहीवा कुणी आमरण उपोषणासही बसला नाही हे सत्य आहे. आपल्याच तत्त्वाच्या विपरीत वर्तन अहिंसावाद्यांना कसे काय आवडले? की हिंसेचा बळी हा त्यांचा प्रिय नेता असल्याने त्याच्या वधकर्त्याला वेगळा न्याय त्यांना अभिप्रेत होता? (मला कम्युनिष्टांचे ब्रीदवाक्य आठवले - " ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल") ही फाशी म्हणजे अहिंसेचा पराभवच नाही का? हा चर्चा विषय हा नथुरामला झालेली फाशीची शिक्षा आणि त्या शिक्षेस अनुसरून अहींसेचे तत्वज्ञान या संदर्भात आहे. त्यावर सभासदांनी चर्चा करावी. इतर अति-अवांतर आणि भडक असलेले सर्व प्रतिसाद तात्काळ उडवले जातील याची नोंद घेण्यात यावी ही विनंती. - संपादक मंडळ

वाचने 55226
प्रतिक्रिया 111

प्रतिक्रिया

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

"....पण आवड असल्यास हे दोन्ही खंड जरूर वाचावेत. ....". ~ डॉ.मोरे यांच्या या पुस्तकाबद्दल मागेही मला कुणीतरी अशाच अर्थाने सांगितले होते, पण कामाच्या धबडग्यात ते पुस्तक मिळविता आलेच नाही. मात्र आता अदितीच्या या प्रतिसादानंतर, अभ्यासाच्या दृष्टीने ते मिळविणे फार गरजेचे वाटू लागले आहे. "...अभ्यासू या प्रतिमेला जागणार प्रतिसाद..." थॅन्क्स अदिती...आणखीन् काय म्हणू ? इन्द्रा

In reply to by हुप्प्या

हिंदूंमधे जातिबंधने आहेत आणि होती. गांधींनी त्याविरुद्ध आवाज उठवला आणि काही ठोस कार्य केले. अस्पृश्यांना सन्मानाने जगता यावे याकरता प्रयत्न केले. म.गांधींनी अस्पृश्यांसाठी काय प्रयत्न (हरिजन सेवक संघ सोडून) केले काही माहिती द्याल का ? सामाजिक आणि राजकीय दृष्टीने अस्पृश्यांना समान दर्जा प्राप्त व्हावा यासाठी असे कोणते ठोस कार्यक्रम आखले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या बाबतीत असं म्हटलं होतं की, ''केवळ हिंदु व हिंदुत्त्व यांच्यासाठी हिंदुस्थान सुरक्षित करणे हा हरिजन सेवक संघाचा मुख्य हेतू होता. अस्पृश्य हे हिंदु म्हणून रहावे असे म.गांधींना वाटायचे पण हिंदूंच्या बरोबरीच्या दर्जाच्या भागीदार म्हणून नव्हे तर गरीब,दुबळे, म्हणून. हरिजन सेवक संघ हे त्यांच्या अनेक तंत्रापैकी एक तंत्र होते'' त्यामुळे अस्पृश्यांविषयी त्यांचा भाव दयाळुपणाचा, उदारमतवादाचा असला तरी ते सर्व सर्व सोंग होते असे वाटते. माझा मुद्दा इतकाच की अस्पृश्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी त्यांनी फार महान कार्य केले,असे काही वाटत नाही. असेल काही माहिती तर जरुर द्यावी. -दिलीप बिरुटे

In reply to by नितिन थत्ते

जर गांधींचा दुसर्‍या महायुद्धात भाग घ्यायला विरोध होता तर त्याविरुद्ध त्यांचे आवडते उपोषणाचे हत्यार का नाही वापरले? चोरीचौराच्या हत्याकांडानंतर तत्वनिष्टेची टिमकी वाजवत त्यांनी आपली असहकाराची चळवळ मागे घेतली. २२ लोक मेले तर अक्खी चळवळ मागे घेतली तर हजारो, लाखो लोक मारणार्‍या युद्धाकरता एक उपोषण करणे जड का जावे? प्रतिसाद संपादीत. संवादात एखाद्या व्यक्तीबद्दल अथवा विचारांबद्दल मतभिन्नता दाखवताना देखील कृपया योग्य शब्दांचा वापर करावात. - संपादक मंडळ

In reply to by हुप्प्या

>>गांधींचा दुसर्‍या महायुद्धात भाग घ्यायला विरोध होता तर त्याविरुद्ध त्यांचे आवडते उपोषणाचे हत्यार का नाही वापरले? याचे उत्तर मी देऊ शकत नाही. ते गांधींनाच विचारायला लागेल.

In reply to by नितिन थत्ते

गांधींचा युद्धात सहभागी होण्याचा विरोध हा तोंडदेखला होता असे म्हणावे लागेल.

In reply to by हुप्प्या

समजा 'म्हातार्‍या' असा उल्लेख मी गजानन महाराज , शिवाजी , स्वामी समर्थ , परमहंस वगैरे वगैरे यांच्यासंदर्भात जर कुठे केला तर किती % लोकांच्या किती % भावना दुखावतील ? आप्पा बेलवलकरांचा फ्यान (अडगळ) होय , होय . तुम्ही आहात तरूण.तुम्ही तरुण आहात म्हणजे करता येतो फक्त संभोग तुम्हाला माणसांच्या माद्यांशी . अरे, पण तरुण आहेत कावळे आणि तरुण आहेत गिधाडं ही. (नटसम्राट)

In reply to by नितिन थत्ते

कुरुंदकरांच्या शब्दात सांगायचे तर मुस्लिमांना मतदारसंघ तोडून देणारे टिळक हे मुत्सद्दी आणि लखनौ कराराच्या पुढे एक पाउलही न टाकणारे गांधी लांगूलचालनवादी हे कसे?
क्या बात है. हा मुद्दा मांडल्याबदल धन्यु.

In reply to by नितिन थत्ते

टिळकांनी प्रथम मुसलमानांच्या दांडगाईविरुद्ध हिंदुनी दंड थोपटले तेंव्हा त्याचे सक्रीय समर्थन केले. इंग्रजांविरुद्ध भारतीय आघाडी उघडावी म्हणुन प्रसंगी मुस्लीमांना मतदार संघ तोडुन द्यायचे कबुल केले. पुढे मुस्लीम शिरजोर झाल्याचा शंशय जरी येता तर त्याचाही काटा टिळकांनी काढला असता. टिळक १००% राजकारणी म्हणुन वावरले. इथे सर्वधर्मसमभाव वगैरे "आत्म्याच्या आवाजाच्या" गप्पा त्यांनी केल्या नाहि. मनातुन टिळक एक गणिती विचारवंत होते. धर्माचा अविवेकी पगडा त्यांच्यावर नव्हता, आणि म्हणुन ते स्वभावतः सेक्युलर होते (त्या काळच्या मानाने). गांधींचं नेमकं उलटं. मुस्लीम अनुययच नाहि, तर एकुण आयुष्यभर त्यांनी राजकारण केले पण आपण राजकारणी आहोत हेच मान्य केलं नाहि. संत-समाजसेवक-राजकारणी-मुत्सद्दी... कुठेलीच भुमीका "हो... मी असा आहे" इतक्या स्वच्छपणे न घेऊ शकणार्‍या गांधींना म्हणुनच सत्याचे प्रयोग करावे लागले. भारताच्या स्वातंत्र्य-समृद्धीच्या आड मुस्लीम कट्टरता आलि तर सर्व शक्तीने-सर्व मार्गाने तिचा बिमोड करणे हा टिळकी खाक्या. तर राष्ट्रीय ऐक्याच्या नावाखाली, स्वतःचे संतत्व अबाधीत ठेवायला प्रसंगी राष्ट्र्कार्याचे नुकसान सहन करुन मुस्लीम अनुयय करणे हा गांधींचा स्वभाव. मुलभूत फरक आहे. अर्धवटराव

In reply to by हुप्प्या

+++++८२३४२३८२८३३७२८८३४२३०९४२१३१२५६३१८१७२३६७२१७१२३६१२६३१२६५३१३६१२३६१२३८१२८३१२३६१२५३७१२३५२ वेळा समर्थन...!!!

आपल्याच तत्त्वाच्या विपरीत वर्तन अहिंसावाद्यांना कसे काय आवडले? की हिंसेचा बळी हा त्यांचा प्रिय नेता असल्याने त्याच्या वधकर्त्याला वेगळा न्याय त्यांना अभिप्रेत होता? (मला कम्युनिष्टांचे ब्रीदवाक्य आठवले - " ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल") ही फाशी म्हणजे अहिंसेचा पराभवच नाही का?
ह्याच विचारांचे एक्स्टेन्शन असलेला प्रश्न मलाही पडलाय. उपरोल्लेखीत वाक्यांमध्ये आलेल्या फाशी हे तत्वविरोधी वर्तन अहिंसावाद्यांना कसे आवडले ह्याचाच पुढचा भाग म्हणजे त्यानंतर घडलेल्या जाळपोळी करणं हे अहिंसेच्या तत्त्वाच्या विपरीत वर्तन अहिंसावाद्यांना कसे काय आवडले? की हिंसेचा बळी हा त्यांचा प्रिय नेता असल्याने त्याच्या वधकर्त्यासोबत त्याच्या ज्ञातीबांधवांवर सरसकट अत्याचार करणे हा वेगळा न्याय त्यांना अभिप्रेत होता?

मिपाकरांनो, आपले प्रतिसाद हवे आहेत. मिपावरती नोकिआच्या प्रायोजनाने आंतरजालावर वावरणाऱ्या व व्यवसायाने वा नोकरीत इतिसाहाशी काडीमात्र संबंध नसलेल्या हौशी लेखकांसाठी एक स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत अर्थातच गुणवत्तेवर आधारित अशा मान्यवर परिक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या लेखांना कुठचेही पारितोषिक नाही. सर्वाधिक प्रतिसाद मिळविणार्‍या लेखासही तसे प्रत्यक्ष पारितोषिक नाहीच, पण आपणाला माहीत आहेच की अधिक प्रतिसाद आले की मिसळभोक्तांच्या मिपा टॉप २५ वगैरे यादीमध्ये ते लेखन पोहोचते. प्रतिसाददान सतत चालूच असते. एकुण प्रतिसादांच्या संख्येकडे पाहता असे लक्षात आले की केवळ संयत लिखाण करून दहावीस प्रतिसाद सहज मिळतील मात्र भरघोस प्रतिसाद हवे असतील तर काही प्रक्षोभक शब्द लागतील. अर्थातच अशा वेळी गांधीवादाचा आधार मोठा! मिपाकरहो - गांधीवाद्यांनो आणि गांधीद्वेष्टेहो, त्यासाठी खालील प्रक्षोभक शब्द व वाक्यरचना घातल्या आहेत, त्या वाचा व त्यामुळे उचकलात, किंवा पुन्हा एकदा गांधींना व गांधीवाद्यांना टपली मारण्याची संधी शोधत असाल तर भरघोस प्रतिसाद द्या. मतदानाला काळमर्यादा नाही. तसेच कितीही संगणकांवरुन, कितीही आयडींतून, रोज अनेकदा प्रतिसाद देता येतील (दोन्ही पक्षांना) तेव्हा सढळ हस्ते प्रतिसाद द्या ही विनंती -गोडसे यांची पुण्यतिथी -गांधीवध (गांधीहत्या नाही बरं का), नथुराम म्हणजे वधकर्ता आपला कृपाभिलाषी सर्वसाअक्षी टीप - वरील प्रतिसाद हे प्रस्तुत लेखकाच्या आधीच्या मदत मागणाऱ्या धाग्याचं विडंबन आहे. ते विचारांचं विडंबन आहे, तेव्हा कृपया व्यक्तिशः घेऊ नये ही विनंती.

In reply to by राजेश घासकडवी

गांधीवादाचा आधार मोठा!
की गांधीवधाचा? लवकरच धनु आणि बियंतसिंग वगैरे क्रांतीकारकांची पुण्यतिथी साजरी करण्याचा विचार आहे. कुणाला लेखन करून चर्चेचा धागा टाकण्यात इंटरेष्ट असल्यास कळवावे. मला कामामुळे शक्य होत नाहीये.

बाबू बजरंगी (गुजरात दंगल क्रांतिकारक), दारासींग( स्टेंन्सचा वध) इ. क्रांतिकारकांची जयंती वा वाठदिवस साजरे करायलाही सुरवात करायला हवीच. त्यांनी दुष्टांचे निर्दालन करून कशी छान पैकी शांती व सुखसमाधान देशात निर्माण केलं आहे.

In reply to by मनोहर काकडे

आपणही दाऊद इब्राहिम, मेनन बंधू, कसाब आणि अफझल गुरु या महात्म्यांचे वाढदिवस आणि असल्यास पुण्यतिथ्या साजर्‍या करा. तळहातावर शिर घेऊन या थोर विभूतींनी सर्व भारतीयांना शांती, सर्वधर्मसमभाव आणि प्रेमाचा संदेश दिला नाही का? गांधीनी दुसरे काय केले? भगतसिंगाच्या फाशीला योग्य ठरवले पण स्वामी श्रद्धानंदाना मारणार्‍या नराधमाला भाई अब्दुल रशीद असे गौरवले. त्याची फाशी रद्द व्हावी म्हणून (अयशस्वी) प्रयत्न केले. काँग्रेसही तीच उज्ज्वल परंपरा चालवत आहे. अफझल, कसाबला फाशी म्हणजे भारताच्या सर्वधर्मसमभावालाच छेद, हो की नाही?

In reply to by हुप्प्या

>>स्वामी श्रद्धानंदाना मारणार्‍या नराधमाला भाई अब्दुल रशीद असे गौरवले. त्याची फाशी रद्द व्हावी म्हणून (अयशस्वी) प्रयत्न केले. हुप्प्यामालक ! ही गोष्ट पहिल्यांदाच एकतोय, जरा विस्ताराने एकायला आवडेल. बाकी तुमचे आणि थत्त्यांचे प्रतिसाद अत्यंत उत्तम, आवडले.

In reply to by आनंदयात्री

हे आर्यसमाजी कधी हिंदुबंधू होतात, तर कधी हिंदू त्यांना झिडकारतात. एक काही तरी ठेवा ना राव ! काय हुप्प्याशेठ, हे स्वामी दयानंद, श्रद्धाणंद, आणि आपण हुप्प्यानंद, हे हिंदू आहात की नाही, ह्याचे फायनल डिसिजन करा ने ! मग ठरवू, की आर्य समाजी आणि हिंदू हे भाई भाई, की अब्दुल रशीद भाई, ते.

In reply to by मिसळभोक्ता

हे आर्यसमाजी कधी हिंदुबंधू होतात, तर कधी हिंदू त्यांना झिडकारतात. .... मग ठरवू, की आर्य समाजी आणि हिंदू हे भाई भाई, की अब्दुल रशीद भाई, ते. या प्रतिसादासंदर्भात इंद्रराज यांनी खाली अभ्यासपूर्ण मुद्दे मांडून खुलासा केला असल्याने त्या संदर्भात लिहायची गरज नाही. फक्त आपण वर मांडलेल्या मुद्यासंदर्भात मला वाटते हुप्प्या यांनी आर्यसमाजी हिंदू आहेत का नाही हा विषय मांडलेला नसून गांधीजींनी भगतसिंगाच्या फाशीच्या वेळीस घेतलेली भुमिका ही अब्दुल रशीद भाईंच्या वेळेस कशी बदलली हा होता. त्यात कोण हिंदू आहे अथवा नाही हा प्रश्न नसून अहींसेचे तत्वज्ञान अ‍ॅक्रॉस दी बोर्ड वापरले आहे का नाही हा आहे. बाकी चर्चा रोचक आणि बरीच नवीन माहीती मिळत आहे.

In reply to by विकास

गांधींनी भगतसिंग यांची फाशी रद्द होण्यासाठी प्रयत्न केल्याचे वर दाखवून दिले आहे. त्यामुळे वेगवेगळे तत्त्व वापरल्याचा आरोप खारीज झाला आहे. अवांतर : विकास यांना या चर्चेतून "नवीन" माहिती मिळत आहे हे वाचून आश्चर्य वाटले.

In reply to by नितिन थत्ते

मा. थत्तेसाहेबांनी दाखवुन दिलेले प्रयत्न किती पोकळ होते ते मी त्याच प्रतिसादाच्या प्रतिसादात दाखवुन दिले आहे.

In reply to by हुप्प्या

महर्षी हुप्प्याजी हे अगाध ज्ञान आपण कोणत्या शिशुशाखेतून प्राप्त केले ते सांगा कारण विकीपिडिया काही वेगळेच सांगतोय!!!

ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल हे कम्युनिस्टांचे ब्रीदवाक्य नाही. हे जॉर्ज ऑरवेल या लेखकाने केलेले कम्युनिस्ट व्यवस्थेचे वर्णन आहे. कम्युनिस्ट आपल्याच तत्त्वाला इतक्या सहजते ने आणि उघडपणे हरताळ फासत नाहीत. ते फार ढोंगीपणा करतात त्यासाठी.

In reply to by निनाद

>>कम्युनिस्ट आपल्याच तत्त्वाला इतक्या सहजते ने आणि उघडपणे हरताळ फासत नाहीत. ते फार ढोंगीपणा करतात त्यासाठी. खिक्क .. लै भारी !!

'एक प्रश्न' लेखावर अबब किति प्रश्न. गाडुन टाका हि सगळि प्रश्न ते राम, त्याचे पुनर लेखन, क्रुष्ण होता का नव्हता, गांधी, टिळ्क, हे सगळ सोडुन एक दिवस तरि जगा लेकांनो. विसरा त्या नथुरामाला, त्याने एकच गोळि मारली आनि तुमि लोक मागचि ६० वर्शे झेलताय. सोडा इथे आज एका फोनवरुन तलाक देन्या इतपत आपन पोहोचलो आनि हे काय तुम्हि ६०/१०० वर्शाचे दळन दळताय. http://www.thehindu.com/news/national/article888417.ece Talaq uttered thrice by a Muslim man on a mobile phone will be considered valid even if his wife is unable to hear it all the three times due to network and other problems, a fresh fatwa has ruled. म्हनुन चान्ग्ला मोबयिल घ्या बोल्लो तर लेख उडवला, ओके आहे. wife should be able to hear clear voice एवढा तरि हक्क द्या ना राव.

आज ६३ वर्षांनंतर, गांधी भाषा, जात, धर्म, देश यांच्या सीमा ओलांडून केवळ ओळखलेच नाहीत तर अभ्यासले जातात. आणि, नथुरामाच्या ओळखीची धाव एका अत्यंत मर्यादित परीघापलीकडे जात नाही! बाकी धागा मनोरंजक इत्यादी इत्यादी...

विरोधकाचे मतपरीवर्तन हा गांधींच्या विचारांचा पाया होता. त्यानी हिंसेचे समर्थन केले नाही. पण पाणी डोक्यावरून जाते आहे हे कळाल्यावर त्यानी लोकाना करो या मरो असेही सांगितले होते. नथुराम किंवा त्याच्या विचारांशी सहमत असणार्‍याना सर्वमान्यता कधीच मिळाली नाही. नथुरामला फाशी दिली नसती तर फार बरे झाले असते. त्याला काहींच्या मते मिळालेले शहीदत्व प्राप्त झाले नसते. भारतीय समाजाला एखादा विभाग वगळता बंडखोरी सशस्त्र चळवळ पेटून उठणे वगैरे जमत नाही. त्यामुळेच की काय हिंदू जिहाद वगैरे संकल्पना प्रत्यक्षात येवू शकत नाही. कमालीची आत्ममग्नता हा या समाजमानसाचा पाया झालेला आहे. अन्यथा कुठून तरी एक बाबर इकड येतो आणि त्याचा वंश सर्वसत्ताक बनतो आणि शिवाजीला स्थानीकांकडुनच विरोध होतो. त्याची चळवळ घरच्यांकडुनच सम्पवण्याचा प्रयत्न होतो. हा चमत्कार या इथेच दिसतो.

".....गांधीनी दुसरे काय केले? भगतसिंगाच्या फाशीला योग्य ठरवले पण स्वामी श्रद्धानंदाना मारणार्‍या नराधमाला भाई अब्दुल रशीद असे गौरवले....." श्री.हुप्प्या यानी 'गांधींनी अब्दुल रशीदला 'भाई' असे म्हटले म्हणजे एक प्रकारे गौरविले' असे जे मत मांडले आहे त्याबद्दलच केवळ इथे प्रतिसाद देत आहे. [बाकी गांधीहत्या आणि नथुराम या विषयावर मिपावर या अगोदर खूप दळण रगडले गेले आहे, त्यामुळे द्विरूक्ती टाळणेच योग्य ठरेल.] श्री.आनंदयात्री यानीही 'श्रद्धानंद' विषयावर विस्ताराने लिहिण्याची विनंती केली असल्याचे दिसले आहे. त्यामुळे तोही हेतू या निमित्ताने पूर्ण होईल. खिलाफत चळवळीविषय एकदोन प्रतिसाद वर आले आहेतच. "खिलाफत = खलिफा हा सर्वेसर्वा मानला जावून तो म्हणेल ती पूर्व (कारण तो अल्लाचा प्रतिनिधी या नात्याने)" अशी समजूत मुस्लिम समाजात रुजली होती, जिला तुर्कस्थानात मुस्तफा केमाल पाशाने विरोध केला होता. पुनर्रज्जीवनवाद्यांनी खिलापत चळवळ जिवंत ठेवण्याचे प्रयत्न चालूच ठेवले पण साधारणतः १९२३ च्या आसपास ही चळवळ थंडावली. पण यामुळे भारतातील कट्टर मुस्लिमांनी त्याचा राग हिंदूंवर काढला. वायव्य सरहद्दीवरील पठाणापासून ते मलबारपर्यंत तसेच काश्मिरपासून ढाक्क्यापर्यंतच्या पट्ट्यात मुस्लिमांनी [खलिफा गमावल्याच्या विफलतेतून] केमाल पाशावर नव्हे तर हिंदूंवर संताप व्यक्त केला. अमृतसर, मुलतान, मीरत, पानिपत, जबलपूर, दिल्ली इतकेच काय तर महाराष्ट्रातील नागपूर आदी ठिकाणी मुसलामानांनी दंगे उसळवले. ९ व १० सप्टेम्बर १९२३ या दोन दिवसात वायव्य सरहद्द प्रांतातील 'कोहट' या गावी १५५ हिंदू मारले गेले तर लक्षावधी रुपयांच्या मालमत्तेची राखरांगोळी करण्यात आली. देवळेही उद्ध्वस्त झाली. कोहट परिसरातील भयभीत झालेल्या हिंदू समाजाला धीराचे शब्द देऊ पाहणारा त्या वेळचा एकमेव नेता म्हणजे 'स्वामी श्रद्धानंद'. त्यानी हिंदू समाजाची संघटना या कार्याला पूर्णवेळ वाहून घेतले होते. त्यांच्या पुढाकाराने हिंदू 'कोहटकांडा' नंतर एकत्र होऊ लागताच मुसलमानांच्या डोळ्यात स्वामीजी सलू लागले. त्यातील अतिरेक्यांच्या मनाने असे घेतले की श्रद्धानंदांचा काटा दूर केल्याखेरीज जात्यंध राजकारणाचा जय शक्य नाही व याच हेतूने अब्दुल रशीद याने स्वामींच्या दिल्लीच्या निवासस्थानी [ते आजारी असल्याने त्यांची चौकशी करायला बरेच लोक येत असत....प्रवेशही खुलाच असे] आदरांजली वाहण्याचा बहाणा करून रशीदने निवासात प्रवेश मिळवला व स्वामी श्रद्धानंदांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली....दिनांक २३ डिसेंबर १९२६. आता इथे बाकीच्या [भल्याबुर्‍या] गोष्टींची चर्चा करण्यापेक्षा या हत्येवर नेमकी म.गांधींची प्रतिक्रिया काय होती ते पाहणे महत्वाचे आहे. मूळ प्रतिक्रिया इंग्लिशमधील असून तिचा अनुवाद नंतर पाहू : "...God had willed for him [i.e.Swami Shraddhanand] a martyr's death. I cannot mourn over his death. He and his followers are to be envied. ~~~ या ठिकाणी गांधीजी म्हणतात I cannot mourn over his death याचा अर्थ असा बिलकुल नाही की त्याना स्वामींच्या मृत्युबद्दल खेद वाटला नाही....तर पुढचे वाक्य असे आहे ~~ For though Shraddhanandji is dead he is yet living. He lived a hero. He has died a hero. ~ स्वामीजी आपल्यातून नाहिसे झाले असे मानू नये, असेच गांधी सुचवितात हे स्पष्ट आहे. "....I deeply regret the event. The joy of the death is thus tempered by the sorrow that an erring misguided brother has been the cause of it. Let us not ascribe the crime of an individual to a whole community. Let us not harbor the spirit of retaliation. Let us not think of the wrong done by a Musalman against a Hindu, but an erring brother against a hero...." प्रत्येक ठिकाणी गांधीजीनी स्वामींचा उल्लेख "हीरो" असाच केला आहे तर रशीदचा उल्लेख 'प्रमादशील बंधू' असा केला असल्याने त्याचा 'गौरव' केला असे म्हणणे धार्ष्ट्याचे होईल. श्री.द.न.गोखले यानी केलेला अनुवाद...थोडक्यात ::: "परमेश्वराची इच्छा होती की, त्याना - स्वामीजींना - हुतात्म्याचे मरण यावे. मी त्यांच्या मृत्युबद्दल शोक करू शकत नाही. कारण जरी श्रद्धानंदजी मृत्यु पावले असले तरी ते अद्याप जिवंतच आहेत. शूर पुरूष म्हणून ते जगले, शूर पुरूष म्हणूनच ते मरणाधीन झाले. हिंदूनी एका व्यक्तीचे दुष्कृत्य सर्व जमातीवर लादू नये. प्रत्याघाताची भावना मनात आणू नये. एका मुसलमानाने एका हिंदूविरुद्ध केलेले दुष्कृत्य असे या घटनेकडे न पाहता, आपण एका प्रमादशील बंधूने एका शूर पुरुषाविरूद्ध केलेले दुष्कृत्य असे याकडे पाहावे." [अवांतर ~~ पुढे झालेल्या खटल्यात या अब्दुल रशीदला स्वामी श्रद्धानंदाच्या हत्येबद्दल फाशी झाली. ज्या मुस्लिमांनी स्वामी हत्येबद्दल त्याचा उदोउदो केला होता त्यापैकी एकही माय का लाल रशीदचे प्रेत घेण्यास पुढे आला नाही, व शेवटी तुरुंगाच्या आवारातच सरकारी शिपायांनी त्याचे दफन केले.] असो. इन्द्रा

थोडेफार रिप्लाय वाचले ... नथुराम गोडसे यांचा नाटक पाहुन खुप चाहता होतो मी. त्यातच गांधीजींबद्दल जास्त आदर नव्हता .. नेटवर कोठेही त्यांच्याविरोधी मते वाचुनच होता तो .. नंतर सारासार अभ्यास करुन आणि काही मित्रांच्या लेखामुळे गांधीजी खरेच महान होते हे पटले ... नक्कीच ते मित्रांचे लेख नविन थ्रेड बनवुन देयीन ..... आवडतील सगळ्यांना .... ---- बाकी नथुराम - गांधी वाद करुन आपण कोणाचे प्रेमी आणि असेच पाहिजे हे फिजुल वाटते मला तरी .. असो .. येथे थांबतो

पण नथुराम गोडसेला फाशी दिली ती एक योग्य गोष्ट होती. तसेच नथुरामच्या फाशीला उदांत ठरवणारे नकळत भारतिय घटनेचा देखिल अपमान करत आहेत. कसाब देखिल त्याच्या धर्मासाठी भारतात हत्याकांड घडवण्यासाठी आला होता मग त्याला तरी कशाला दोषी धरायचे? त्याच्या दहशतवादाला देखिल तात्विक मुलामा दिला तर तो देखिल देवदुत ठरतो.

In reply to by मुक्तसुनीत

च्यायला, तुमारा फटू मेरी फटूसे चकाचक कैसा? असो, वर थोर्थोर मंडळी गंभीर चर्चा करीत असताना तुम्हा लोकांना असे थिल्लर चाळे सुचतातच कसे? (आता, त्या थोर्थोर मंडळींच्या दळणाचा आमच्या रोजच्या रोटीशी काय संबंध म्हणून काय विचारता?)

In reply to by सुनील

>>>अशीच एक मनोरंजक चर्चा पलीकडे सुरू आहे. तिचाही आस्वाद घ्यावा ! ओसाड संस्थळाच्या रंगमंचावर काहीतरी हालचाल व्हावी त्यासाठी अशा चर्चा आवश्यक आहे असे वाटते. :) -दिलीप बिरुटे [ओसाड संस्थळावरील सदस्य]

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यावरून मला एकदम चिं.वि. जोशींच्या "ओसाडवाडीचे देव" हे पुस्तक आठवले. असो.

त्यांचा खून केला जाणार आहे याबद्दल गांधींना सरदार पटेलांनी स्वत: भेटून पूर्वकल्पना दिली होती आणि पोलीसफोर्स तैनात करू देण्याचा आग्रह केला होता. पण अहिंसेची स्तोत्रे गाणार्‍या त्या गांधीबाबाने त्यांच्या सभेच्या प्रार्थनेच्या परिसरात पोलीसांनाही रिव्हॉल्व्हर बाळगायला मनाई केली होती. नथुराम गोडसेंनी त्यांची भडास काढली आणि सर्वसाक्षींना पडलेला अहिंसेच्या व्याखेचा प्रश्न तेव्हाच जागतिक पटलावर उभा झाला तो तेव्हापासून तसाच आहे; कुणीही या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नाही आणि दिलेली उत्तरं मान्य होणार नाहीत कारण वास्तवात चालणारी उत्तरं नेहरूंच्या शासनाकडून (अ‍ॅटनबरोंच्या गांधी या सिनेमामध्ये एक खूपच मार्मिक दृश्य आहे - दंगलींच्या जाळपोळीत, धामधुमीत भारताला स्वातंत्र्य मिळते आणि पहिले पंतप्रधान नेहरू अख्ख्या चित्रपटभरात पहिल्यांदाच हातात सिगारेट घेऊन धूर काढीत पंतप्रधानांच्या खुर्चीत दिसतात! ) केव्हाच देऊन झाली आहेत - नथुरामना फाशी! कोणत्याही शासनासाठी अहिंसेचे तत्व वगैरे सब झूठ है! एवढे लोक सांभाळायचेत ना (भलेही मग ते सांभाळता येवोत की न येवोत). गांधींची अहिंसा वगैरे त्यांच्यापुरतीच मर्यादीत होती आणि सध्या ती राजघाटाच्या कंपाऊंडच्या आत असते म्हणे! अहिंसेच्या पराभवाची तर बिलकुल चर्चाच नको - नथुरामची गोळी खाऊन गांधीनी राम म्हटला तेव्हाच अहिंसेची काय लागायची ती वासलात लागलीय. गांधींची अहिंसा इंग्रजांना मान्य नव्हती आणि आपण स्वीकारलेल्या इंग्रजांच्याच कार्बन कॉपी कायद्यात तर खूनाला शक्यतोवर फाशीचीच शिक्षा दिली जाते - कायद्याचे यथायोग्य पालन झाले आहे. आता तुम्ही कायदा गाढव आहे म्हणा, गांधींचे आणि नथुरामचेही टाळके सरकले होते म्हणा काहीही म्हणा. त्यानं काय फरक पडतो?

नथुराम प्रेम ही एक वि़कृती. अनवधानाने तुमचा उल्लेख नथुराम प्रेमी असा केला गेला. त्याबद्दल जाहीर माफी.

माननीय संपादक मंडळाला विनाकारण कामाला लावणारा धागा पाहुन ड्वोले पाणावले! (वर्तमानात जगणारा) ॠषिकेश.