काही आक्षेपार्ह...
हे वाचल्यावर एक गोष्ट स्पष्ट आहे की 'आधुनिक भारताचे दधिची',...
वास्तवीक नितीनरावांना ह्या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे की हे 'आधुनिक भारताचे दधिची' हा शब्दप्रयोग हा दळवींच्या नाटकातला असून तो पूर्णपणे चुकीचा अर्थात असत्य आहे. (त्यांच्या वाक्यातील उरलेली "'प्रातःस्मरणीय', 'भारतरत्न', 'परमपूज्य' वगैरे विश्लेषणे ही त्यांनी स्वतःच तयार केलेली असावीत असे वाटते.)
तरी देखील ते परत परत इथे आणि तिथे (उपक्रमावर + अजून कुठे असेल तर माहीत नाही) त्याचा संदर्भ देतात. हे अत्यंत आक्षेपार्ह आहे विशेष करून जी व्यक्ती गांधींच्या आरत्या ओवाळते आणि दुसरीकडे असत्याचे प्रयोग करत बसते तेंव्हा. ह्यातून केवळ त्यांचा आकस दिसतो असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे...नितीनराव हे गांधीवादी आहेत अथवा स्वतःला तसे समजतात का ते माहीत नाही पण तरीदेखील त्यांच्याकडून असली अपेक्षा नव्हती आणि नाही. अर्थात त्यांनी सत्यकथनाचा पुरस्कार करावा का असत्यकथनाचा हे तेच ठरवू शकतील.
जर दळवींच्या नाटकांचाच संदर्भ वापरायचा असेल तर ते गांधीजींबद्दल काय बोलले ते देखील खरे मानावे लागेल आणि गांधींजींचे चौथे पुत्र देवदास गांधी हे देखील नथुरामला जाऊन भेटले आणि हस्तांदोलन केले असे म्हणता येईल...
गेल्या दोन एक दिवसात येथे आलेल्या दोन इतिहास संशोधकांना भेटण्याचा योग आला. त्यांना या चर्चेतील मूळ विषयावर प्रश्न विचारला की तत्कालीन गांधीवादींनी नथुरामच्या फाशीला विरोध कसा केला नाही.
त्यावर मला तात्काळ उत्तर मिळाले की देवदास रामदास गांधींनी तसा विरोध केला होता. फाशी देणे हे स्वतःच्या (देवदासांच्या/रामदासांच्या) वडीलांच्या (म. गांधींच्या) तत्वाच्या विरोधात आहे असे त्यांनी म्हणले होते आणि (मला वाटते) सरकारला पत्र देखील पाठवले होते. त्यांची नथुरामला भेटायची इच्छा होती. नथुरामने त्यांना सांगितले की भेटायला हरकत नाही. पण जर माझे म्हणणे पटले तर तसे जाहीर सांगायचे लपवायचे नाही.... मात्र पुढचे कारण माहीत नाही, पण ती भेट काही कारणाने घडू शकली नाही.
ही अर्थातच आमचा अगदी थोडक्यात जो काही संवाद झाला त्यावर आधारीत माहीती आहे.
"....(मला वाटते) सरकारला पत्र देखील पाठवले होते. ..."
~ पत्र पाठविले गेले होते, पण ते श्री.देवदास यांच्याकडून नव्हे तर श्री.रामदास यांच्याकडून.
श्री.देवदास यांच्याबरोबर नथुराम गोडसे यांची [खटला चालू होता त्या काळात] थोड्या अवधीसाठी का होईना तुघलक रोड येथील तुरुंगात झाली होती. देवदास हिंदुस्थान टाईम्सचे संपादक तर गोडसे हिंदुराष्ट्र दैनिकाचे संपादक या नात्याने त्यापूर्वी एका पत्रकार परिषदेतही भेटले होतेच. कच्च्या कैदेतील ते बोलणे अर्थातच अल्पकाळ होते कारण सुरक्षा अधिकार्यांनी श्री.देवदास याना 'बोलू नये' अशी विनंती केली. जितके बोलले गेले ते केवळ ते गांधीपुत्र होते म्हणूनच बोलू दिले गेले होते हेही सत्यच होते. [या भेटीचा ऑफिशियल रिपोर्ट दिल्लीचे डी.एस.पी. श्री.जयवंतसिंग यानी लिखित स्वरूपात कोर्टात सादर केला आणि तो रितसर नोंद झाल्याने अधिकृत मानावा लागेल.]
पुढे सिमला येतील तुरुंगात गोडसे व आपटे याना आणल्यानंतर मात्र श्री.रामदास गांधी यांच्याशी त्यांचा पत्रव्यवहार झाला व त्यातील एका पत्रात श्री.रामदास यानी, "हिंदुस्थानच्या महाशासकाना मी जे पत्र धाडले आहे त्यात आपल्याविरुद्धचा अभियोग चालविणार्या विशेष न्यायासनाने आपणास दिलेली शिक्षा आपणास का भोगावयास लावू नये याचे कारण मी त्या पत्रात दिले आहे." असे म्हटले आहे. भेटीची इच्छादेखील श्री.रामदास गांधी यानीच प्रकट केली होती...श्री.देवदास यानी नव्हे....अर्थात भेट ही झाली नाहीच.
इन्द्रा
नावातील गोंधळ लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. वास्तवीक ज्या येथील इतिहास संशोधकांनी सांगितले त्यांनी रामदास गांधी असेच नाव घेतले पण त्यांचा चुकून उल्लेख त्यांनी हिंदूस्थान टाईम्सचे संपादक म्हणून केला. नंतर जेंव्हा गुगलले तेंव्हा "एचटी" चे संपादक देवदास गांधी दिसले म्हणून मला वाटले कदाचीत ते असतील असे. परत एकदा चूक दुरूस्ती केल्याबद्दल धन्यवाद!
१. दधिची या उल्लेखावरील आक्षेपाच्या इतिहासाची पूर्ण माहिती आहे.
त्यावेळच्या आक्षेपाचा विषय "सावरकरांनी नथुरामला कधी दधिची म्हटले होते का?" याबाबत होता आणि तेव्हा सावरकरांनी असे म्हटल्याचे संदर्भ नाहीत असे म्हणून ते वाक्य रद्दबातल झाले होते.
पण आत्तासुद्धा मी हे विशेषण सावरकरांनी वापरलेले म्हणून उद्धृत केलेले नाही. नथुरामला ग्लोरिफाय करणार्यांपैकी काहींच्या (उदा. नाटककार दळवी) मनातले विशेषण म्हणूनच उद्धृत केले आहे.
२. बाकीची विशेषणे औपरोधिक आहेत. आणि ती राहुल गांधी यांच्यासाठी याच संकेतस्थळावर वापरल्या जाणार्या/गेलेल्या "तरुणांचे आशास्थान, निगर्वी, निधर्मी, नम्र"....."अख्ख्या सूर्यमालेचेच.. नाही नाही... आकाशगंगेचे.. चूकलो चूकलो.. अखिल ब्रह्मांडाचेच नेते" वगैरे औपरोधिक विशेषणांसारखीच आहेत. नथुरामचे भक्त नथुरामसाठी ही विशेषणे वापरू शकतील.
स्वगतः माझ्या गांधीसमर्थनाबाबत विकास यांना काय अडचण आहे ते समजत नाही. मी माझ्या मित्रांशी खरडवहीतून साधलेला संवादही गांधीवादाशी विपरीत आहे की काय यावर त्यांचे लक्ष असते.
१. दधिची या उल्लेखावरील आक्षेपाच्या इतिहासाची पूर्ण माहिती आहे.
त्यावेळच्या आक्षेपाचा विषय "सावरकरांनी नथुरामला कधी दधिची म्हटले होते का?" याबाबत होता आणि तेव्हा सावरकरांनी असे म्हटल्याचे संदर्भ नाहीत असे म्हणून ते वाक्य रद्दबातल झाले होते.
उपक्रमावर देखील त्याच चर्चेचे दुवे देणे आधी झाले होते. आत्ता देखील नाव घेतले नाही तरी तेच चालते म्हणून लिहून स्पष्टीकरण केले. हेतू हा की किमान आपल्यासारख्यांकडून तरी परत परत जे ऐतिहासीक असत्य आहे त्याचा गोबेल्सच्या तंत्राप्रमाणे वापर होणार नाही.
बाकीची विशेषणे औपरोधिक आहेत. . नथुरामचे भक्त नथुरामसाठी ही विशेषणे वापरू शकतील.
सहमत आणि त्याबद्दल आक्षेप घेतला नव्हता. मात्र अजून काही अर्थ असला तर तो समजावा इतका नक्कीच उद्देश होता. खुलाशा बद्दल धन्यवाद..
स्वगतः माझ्या गांधीसमर्थनाबाबत विकास यांना काय अडचण आहे ते समजत नाही.
गांधीसमर्थनाबाबतच काय मला गांधीजींची पण अडचण नाही. नक्की मी गांधीजींच्या विरोधात ते निव्वळ गांधीजी आहेत अथवा मला सावरकर आवडतात वगैरे गोष्टींचा संदर्भ देत कधी काय बोललो आहे ते दाखवून द्या. मात्र भोंदूगिरी करणार्या गांधीवाद्यांबद्दल मात्र मला आक्षेप आहे. त्यांच्यामुळे आपल्या देशाचे जास्त नुकसान झाले आहे असे वाटते... नथुरामने गांधीजींना मारले हे आक्षेपार्हच आहे आणि तो माझ्या दृष्टीने खुनीच होता पण त्या गांधीजींचा पार्थिव देह गनकॅरेजवर (तोफेवर) ठेवला गेला आणि गांधीवादाला जी एका अर्थाने तोफांजली दिली गेली ते देखील गांधीवादी आदर्शाचे मारेकरीच होते आणि तेच पिढ्यान पिढ्या चालत राहीलेत असे वाटते. असो.
मी माझ्या मित्रांशी खरडवहीतून साधलेला संवादही गांधीवादाशी विपरीत आहे की काय यावर त्यांचे लक्ष असते.
तुम्ही कुठल्या संदर्भात म्हणत आहात याची कल्पना नाही, कारण मी काही खरडवही बघितली नव्हती, अथवा एकंदरीतच मी आपणहून बघत नसतो. मात्र आता उत्सुकता चाळवली आहे आणि खरडवही पब्लीक आहे त्यामुळे नक्की बघेन.. :) कुठल्या संस्थळावरील आणि साधारण कधीचे पाहू ते खरडीने कळवल्यास सोपे जाईल. ;)
पण त्या गांधीजींचा पार्थिव देह गनकॅरेजवर (तोफेवर) ठेवला गेला आणि गांधीवादाला जी एका अर्थाने तोफांजली दिली गेली ते देखील गांधीवादी आदर्शाचे मारेकरीच होते
हो ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.अनेकदा नेत्याच्या विचारांची उंची अनुयायांना कळतच नाही त्यातूनच दुर्दैवाने महान नेत्यांचा सर्वात मोठा पराभव त्यांचेच अनुयायी करतात. डॉ. आंबेडकरांबाबत हा प्रकार वारंवार दिसून येतो. छत्रपती-शंभूराजांच्या नावाने गुंडगिरी करणारे लोक छत्रपतींच्या बाबतीतही हाच प्रकार करतात. आमच्या एका ज्येष्ठ नातेवाईकांनी सांगितल्याप्रमाणे सावरकरांचे वर्षश्राध्द त्यांच्या अनुयायांनी केले होते. (चु.भू.दे.घे) सावरकरांचा अशा कर्मकांडांना किती विरोध होता हे तर जगमान्यच आहे.तरीही हा प्रकार खरा असेल तर त्यांच्या अनुयायांना सावरकरांच्या विचारांची उंची कळली नाही असाच अर्थ होत नाही का? तोच प्रकार गांधींजींबाबतही.
श्री.विकास आणि श्री.क्लिंटन दोघांनीही 'गांधींचा देह' आणि 'गन कॅरेज' या दोन घटनांना 'आदर्शवादा' शी गुंफून तसे करणार्यांना दूषण दिले आहे. याबाबत काही खुलासा करणे गरजेचे आहे कारण राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्याबाबतीत जगभर जे काही "प्रोटोकॉल" पाळले जातात तित 'स्टेट फ्युनरल' नावाचा जो प्रकार आहे तिथे गन कॅरेजचा 'ऑनर' मिलिटरीतर्फे दिला जातो. मिलिटरीने त्या व्यक्तीला दिलेली एक प्रकारची वंदना असते. याबद्दलची तत्वे केन्द्र सरकारनेच मान्य केली असून तिथे व्यक्तीवादापेक्षा "मरणोत्तर" बिदाई....जी मिलिटरीकडे असते....कशा धाटणीची असणे आवश्यक आहे याची रितसर नोंद आहे.
गांधीजींचा देह जसा गन कॅरेजवर ठेवण्यात आला होता तद्वतच नेमक्या त्याच कॅरेजवर सप्टेंबर १९९७ मध्ये 'मदर तेरेसा' यांचाही देह ठेवला गेला. त्यावेळी तर दिल्लीत इन्द्रकुमार गुजराल हे जनता दलाचे पंतप्रधान सत्तेवर होते. म्हणजेच 'गन कॅरेज' अंतयात्रा हे एक प्रकारचा त्या व्यक्तीला दिलेला सन्मान आहे हे सर्वच पक्षांनी मान्य केले आहे हे दिसतेच. त्यामुळे त्या व्यक्तीच्या आदर्शवादाचा त्यात कुठे उपमर्द होतो असे मानू नये.
त्या काळात देशात तिरंगा अर्ध्यावर आणला जातो. हे निशाणदेखील सार्या देशाला दु:ख झाले आहे हे दर्शविते, जे प्रतिकात्मक असते. दु:ख झाले म्हणून देश तो पूर्ण आठवडा उपाशी बसत नाही हे जितके सत्य आहे तितकेच तशा प्रकारचा सन्मान एखाद्याला दिला म्हणजे देशाने कुठल्यातरी आदर्शाला मूठमाती दिली असे समजण्याची बिलकुल आवश्यकता नाही....!
शेवटी 'आदर्शा'ची काय वासलात लागायची ती लागतेच....चौघांच्या खांद्यावरून गांधीजींना सरणाकडे नेले असते तर त्यांचा आदर्श आज राहिला असता काय?
इन्द्रा
राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्याबाबतीत जगभर जे काही "प्रोटोकॉल" पाळले जातात तित 'स्टेट फ्युनरल' नावाचा जो प्रकार आहे तिथे गन कॅरेजचा 'ऑनर' मिलिटरीतर्फे दिला जातो.
अहो अगदी मान्य आहे. पण हे गन कॅरेज फक्त तीनच व्यक्तींसाठी वापरले गेले... दोन तुम्ही सांगितलेल्या आणि तिसरी पं. नेहरू. त्या व्यतिरीक्त अजूनही पंतप्रधान आणि राष्ट्रपती होऊन गेले आहेत. विशेषतः शास्त्री आणि इंदिरा गांधी. त्यांना पण असे वापरले गेलेले दिसले नाही. अर्थात त्यांना शासकीय सन्मान नक्कीच मिळाला असेल आणि त्यात गैर काहीच नाही. शासकीय सन्मान देयलाच हवा. एक मदर तेरेसा यांना सोडल्यास असा सन्मान ज्या कोणत्या राष्ट्रीय नेत्यांना दिला गेला तो योग्यच होता असे माझे वैयक्तीक मत आहे. मदर तेरेसा या काही माझ्या लेखी राष्ट्रीय नेत्या नव्हत्या.
गांधीजींच्या बाबतीत सन्मान देणे योग्य होते, पण त्यासाठी गन कॅरेजच वापरणे काही गरजेचे होते असे वाटत नाही इतकेच म्हणायचे होते. तसे करत असताना मुद्दामून नाही पण त्यांच्या तत्वाची शासकीय कर्मकांडे करत असताना पायमल्ली झाली असे वाटते. त्याचे कारण गांधीवादी म्हणून कोणीच "स्वाध्याय" करत नव्हते. आडातच नाही तर पोहर्यातून कसे येणार.
हाच प्रकार क्लिंटन यांनी वर सांगितलेल्या सावरकरांच्या उदाहरणात आहे. सावरकरांचे हिंदू शब्दावरील विचार पोपटपंचीसारखे बोलणे पण त्यांनीच सांगितलेला "हिंदूइझम" (हिंदूधर्मातील कर्मकांडे) सोडणे थोडेच जमणार होते?
ही फाशी म्हणजे अहिंसेचा पराभवच नाही का?
हा तुमचा प्रश्न तुम्ही बरोबर विचारला आहे मात्र
फाशी म्हणजे हत्या हि तुमची व्याख्या आवडली नाही .
अहिंसा म्हणजे हिंसा न करणे ..
केलेल्या वाईट कर्माला शिक्षा ही असलीच पाहिजे (कायद्यात फाशी असावी का नसावी हा विषय येथे नाहीये).. आणि शिक्षा आणि अहिंसा यांचा संबधच नाही ..
--
जसा युक्तीवाद केला जातो की अहिंसेच्या अनुयांनी काहीच आक्षेप नाही घेतला फाशीला ..
तसेच मग जर नथुराम नी स्वता फाशीला जायचे आहे म्हंटल्यावर .. त्यांचे अनुयायी किंवा बाजुचे लोक मग फाशी नव्हती व्हायला पाहिजे . याविरुद्ध आंदोलन झाले पाहिजे होते ते ही गांधींच्या अनुयायांकडुन हे हास्यास्पद वाटत आहे ..
असो ...
गांधीवाद हा अतर्क्य विसंगतींनी भरलेला आहे. त्यामुळे नथुराम गोडशांची फाशी ह्या विसंगतीशी सुसंगत आहे.
काही उदाहरणे म्हणजे
१. एक अत्यंत अनावश्यक धर्मांध मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळायला खिलाफत नावाची एक चळवळ गांधींनी १९२५ च्या आसपास सुरू केली. तुर्कस्तानमधे लोकशाही नव्याने स्थापन झाली होती, महिलांना हक्क मिळू लागले होते. आधुनिकीकरणाचे वारे वाहू लागले होते. त्याविरुद्ध काही मुस्लिम धर्ममार्तंडांनी ही चळवळ सुरू केली. आणि गांधींनी त्याला पाठिंबा दिला. ह्याच्या नसत्या उपद्वयापाच्या बदल्यात मुस्लिमांनी गोहत्याबंदी करावी अशी अहिंसक मागणी गांधींच्या काही अनुयायांनी केली ती गांधींनी साफ फेटाळली. लोकशाहीला विरोध आणि जुनाट, रानटी खलिफाच्या राजवटीला समर्थन. केवळ मुस्लिमांच्या लांगूलचालनाकरता! वा रे महात्मा!
२. दुसर्या महायुद्धात इंग्रजांना मदत करण्याचे धोरण. युद्ध म्हणजे अफाट हिंसा. दुसर्या महायुद्धातील हिंसा ही त्या आधी झालेल्या सर्व युद्धांपेक्षा जास्त होती. पण गांधीना त्या युद्धात भारतीयांना आजिबात गैर वाटले नाही. बंगालचा मानवनिर्मित दुष्काळ, जालियनवाला बाग हत्या असले सगळे हिंसक प्रकार
केलेल्या इंग्रजांना आणखी एका हिंसक मोहिमेकरता समर्थन देणे. ही कुठली तत्त्वनिष्टा?
३. गांधींनी जर्मनीच्या ज्यू लोकांना उद्देशून एक अचाट व अतर्क्य पत्र लिहिले. तुम्ही निर्भयपणे कत्तलींना सामोरे जा. कचरू नका. कुठलाही प्रतिकार करू नका. असे केल्यानेच तुमची महता सिद्ध होईल. निर्दोष व्यक्तींच्या हिंसा थांबवायला केलेली हिंसा उचित आहे असे एकीकडे म्हणायचे आणि दुसरीकडे अशा प्रकारे हिंसा शांतपणे सहन करायचा उपदेश!
http://www.sepiamutiny.com/sepia/archives/004247.html
>> दुसर्या महायुद्धात इंग्रजांना मदत करण्याचे धोरण. युद्ध म्हणजे अफाट हिंसा. दुसर्या महायुद्धातील हिंसा ही त्या आधी झालेल्या सर्व युद्धांपेक्षा जास्त होती. पण गांधीना त्या युद्धात भारतीयांना आजिबात गैर वाटले नाही. बंगालचा मानवनिर्मित दुष्काळ, जालियनवाला बाग हत्या असले सगळे हिंसक प्रकार
केलेल्या इंग्रजांना आणखी एका हिंसक मोहिमेकरता समर्थन देणे. ही कुठली तत्त्वनिष्टा?
येथे दिलेल्या माहितीनुसार
The Congress Party had earlier taken the initiative upon the outbreak of war to support the British, but were rebuffed when they asked for independence in return. Gandhi had not supported this initiative, as he could not reconcile an endorsement for war (he was a committed believer in non-violent resistance to tyranny, used in the Indian Independence Movement and proposed even against Hitler, Mussolini, and the Japanese) and had a deep suspicion of the British attitude, mindset and leadership, realizing such support would not be rewarded, well ahead of other Congressmen.
>>एक अत्यंत अनावश्यक धर्मांध मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळायला खिलाफत नावाची एक चळवळ गांधींनी १९२५ च्या आसपास सुरू केली. तुर्कस्तानमधे लोकशाही नव्याने स्थापन झाली होती,
थोडीशी चुकीची दुरुस्ती..... खिलाफत चळवळ १९१९ मध्ये सुरू झाली आणि १९२५ मध्ये संपली.
बाकी मुस्लिम लांगूलचालनाचे म्हणावे तर मुस्लिमांना राखीव मतदारसंघ देणारा लखनौ करार खिलाफत चळवळ सुरू व्हायच्या आधी ३ वर्षे १९१६ मध्ये टिळकांच्या नेतृत्वाखाली झाला.
कुरुंदकरांच्या शब्दात सांगायचे तर मुस्लिमांना मतदारसंघ तोडून देणारे टिळक हे मुत्सद्दी आणि लखनौ कराराच्या पुढे एक पाउलही न टाकणारे गांधी लांगूलचालनवादी हे कसे?
टिळकांनी साधनशुचिता वगैरेचे गोडवे गायले नाहीत. ते व्यवहारी होते. आणि व्यवहारानेच वागले. थोडे मिळवण्याकरता थोडे गमावणे हे त्यांच्या तत्त्वात बसत होते. मात्र गांधींचे तसे नव्हते. शत्रूशीही अन्याय करायचा नाही. तत्त्वाशी तडजोड करायची नाही असे त्यांचे तत्त्व होते.
लखनौ करारामुळे राखीव मतदारसंघ झाला. हे अर्थातच वाईट झाले. पण मला वाटते खिलाफतमुळे जास्त नुकसान झाले. कसे? हे असे:
खिलाफतमुळे काय झाले? लोकशाहीपेक्षा धर्मावर आधारित राज्यपद्धती जास्त श्रेष्ट आहे असे सूचित झाले. मुस्लिमांच्या धर्मावर आधारित राज्यपद्धती लोकशाहीपेक्षा जास्त उजवी आहे असे सूचित झाले. बाकी कुठल्या धर्माकरता अशी चळवळ केली नाही. महिलांना अधिकार मिळण्यापेक्षा, आधुनिकीकरणापेक्षा खिलाफत श्रेष्ट असे सूचित झाले. शेकडो मैल दूर असलेल्या देशात हे सगळे घडत असताना त्याला समर्थन दिले. केवळ काही अतिरेकी विचारांच्या मुस्लिमांकरता. भारतावर ह्याचा खरे तर काही परिणाम होत नव्हता तरीही ही चळवळ हाती घेतली गेली. केवळ लांगूलचालनाकरता. तुर्कस्तानचे लोक मुस्लिम आहेत ह्या पलीकडे ह्या घटनेचा भारताशी काय संबंध होता? भारतात खलिफाचे राज्य कधी होते? कधीच नाही.
लखनौ करारात देशाबाहेर काही घडले नाही. देशातल्या लोकांची परदेशाची नाळ जोडायचा प्रयत्न झाला नाही. लोकशाहीविरोधी काही नव्हते. आणि टिळक हे आपल्या तत्त्वनिष्ठेची टिमकी वाजवत नव्हते. थोडे गमावून थोडे मिळवणे हे त्यांना पटत होते. गांधींचे तसे नव्हते.
तेव्हा ह्या दोन घटनांत आजिबात तुलना होत नाही.
गांधी एकूणातच धर्मश्रद्ध होते. त्यांनी 'रामराज्य' वगैरे कल्पनाही मांडल्या होत्या इतकेच नव्हे तर त्यांची अस्पृश्यविषयक भावनाही दयेची होती. त्यासाठी गांधींवर कोणी टीका करीत असेल तर माझे त्याच्याशी भांडण नाही.
माझा गांधीवाद स्वातंत्र्यलढ्यातल्या मार्गाविषयी आहे. (आणि काही प्रमाणात हिंदु-मुस्लिम प्रश्नाविषयी आहे)
>>महिलांना अधिकार मिळण्यापेक्षा, आधुनिकीकरणापेक्षा खिलाफत श्रेष्ट असे सूचित झाले.
महिलांचे अधिकार वगैरे मुद्दे त्यावेळी कुणाच्या विचारविश्वात नव्हते. केमाल पाशाच्या तुर्कस्तानमधील आधुनिकीकरण/सुधारणा १९२६ नंतरच्या आहेत. टिळकांनाही महिलांच्या (खरेतर लहान मुलींच्या) हक्कापेक्षा धर्म महत्त्वाचा वाटलाच होता.
टिळकांनी सामाजिक सुधारणांना स्वातंत्र्यापेक्षा दुय्यम मानले होते. त्यावरुन त्यांचे आगरकरांशी भांडणही झाले होते. तेव्हा टिळकांचा सामाजिक सुधारणेचा दृष्टीकोन हा फार पुढारलेला नव्हता हे उघड आहे.
पण माझ्या माहितीप्रमाणे टिळक आणि गांधी ह्या वेगळ्या काळातील, वेगळ्या विचारांच्या व्यक्ती आहेत. टिळकांनी तशीच चूक केली म्हणून गांधींची चूक क्षम्य हे काय तर्कट आहे?
मग रँडला मारण्याची प्रेरणा देणारे टिळक आणि भगतसिंगाच्या शिक्षेविरुद्ध काही करायला नाकारणारे गांधी ह्या विरोधाभासाचे काय? जेव्हा सोयीचे असेल तेव्हाच टिळक आणायचे का?
हिंदूंमधे जातिबंधने आहेत आणि होती. गांधींनी त्याविरुद्ध आवाज उठवला आणि काही ठोस कार्य केले. अस्पृश्यांना सन्मानाने जगता यावे याकरता प्रयत्न केले. मात्र मुस्लिमांच्या धर्मातल्या तितक्याच वाईट गोष्टींविरुद्ध कधी आवाज उठवला नाही आणि टीकाही केली नाही.
उलट खिलाफतसारख्या उचापतीच्या निमित्ताने धर्मांध लोकांची री ओढली. हा दुटप्पीपणा का?
जिनांसारखा उच्चशिक्षित, धर्मापासून दूर असणारा हुषार माणूस. ह्याला जवळ न करता मौलाना महंमद अली आणि लियाकत अली असल्या डोकेफिरूंना जवळ का केले?
>>पण माझ्या माहितीप्रमाणे टिळक आणि गांधी ह्या वेगळ्या काळातील, वेगळ्या विचारांच्या व्यक्ती आहेत. टिळकांनी तशीच चूक केली म्हणून गांधींची चूक क्षम्य हे काय तर्कट आहे?
वेगळ्याकाळातील व्यक्ती हे बरोबर. पण लखनौ करार(१९१६) आणि खिलाफत(१९१९) या फार दूरदूरच्या घटना नव्हत्या. मुसलमानांना जवळ करण्याची गरज त्या काळी सर्वांना वाटत होती. त्यानुसार प्रत्येकजण प्रयत्न करीत होता.
टिळकांचे कृत्य दाखवले कारण दोन्ही एकाच स्वरूपाची कृत्ये आहेत. आणि टिळक मात्र "दाढ्या कुरवाळणारे" म्हणून प्रसिद्ध नाहीत.
नितिन आणि नगरीनिरंजन यांचा प्रतिवाद अथवा त्यांना सहमती म्हणून नाही, केवळ माहिती म्हणून.
'लोकमान्य ते महात्मा' या पुस्तकाच्या पहिल्या खंडात (कादंबरी नव्हे, इतिहासाच्या पुस्तकात) डॉ. सदानंद मोरे यांनी टिळकांच्या मुसलमान विरोधापासून पुढे 'उत्क्रांत' झालेला मुसलमान 'अनुनय' याचे तर्कसंगत आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण दिले आहे. सध्या हाताशी हे पुस्तक नाही आणि आता या गोष्टी तपशीलवार आठवत नाहीत. पण आवड असल्यास हे दोन्ही खंड जरूर वाचावेत.
अनेक बाबतीत (पण वेगळ्या पद्धतीने) गांधींनी टिळकांचेच राजकारण पुढे सुरू ठेवले या विधानाचा पाठपुरावा करताना डॉ. सदानंद मोरे या संदर्भातील विचारांचा संदर्भ देतात.
(सदर पुस्तक स्वतःच्या मालकीचे असल्यास दुसरा खंड मला एक महिन्याच्या उधारीवर द्यावा ही विनंती.)
इंद्राकडून पुन्हा एकदा त्याच्या अभ्यासू या प्रतिमेला जागणार प्रतिसाद. आणि त्याबद्दल त्याचे आभारही.
"....पण आवड असल्यास हे दोन्ही खंड जरूर वाचावेत. ....".
~ डॉ.मोरे यांच्या या पुस्तकाबद्दल मागेही मला कुणीतरी अशाच अर्थाने सांगितले होते, पण कामाच्या धबडग्यात ते पुस्तक मिळविता आलेच नाही. मात्र आता अदितीच्या या प्रतिसादानंतर, अभ्यासाच्या दृष्टीने ते मिळविणे फार गरजेचे वाटू लागले आहे.
"...अभ्यासू या प्रतिमेला जागणार प्रतिसाद..."
थॅन्क्स अदिती...आणखीन् काय म्हणू ?
इन्द्रा
हिंदूंमधे जातिबंधने आहेत आणि होती. गांधींनी त्याविरुद्ध आवाज उठवला आणि काही ठोस कार्य केले. अस्पृश्यांना सन्मानाने जगता यावे याकरता प्रयत्न केले.
म.गांधींनी अस्पृश्यांसाठी काय प्रयत्न (हरिजन सेवक संघ सोडून) केले काही माहिती द्याल का ? सामाजिक आणि राजकीय दृष्टीने अस्पृश्यांना समान दर्जा प्राप्त व्हावा यासाठी असे कोणते ठोस कार्यक्रम आखले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या बाबतीत असं म्हटलं होतं की, ''केवळ हिंदु व हिंदुत्त्व यांच्यासाठी हिंदुस्थान सुरक्षित करणे हा हरिजन सेवक संघाचा मुख्य हेतू होता. अस्पृश्य हे हिंदु म्हणून रहावे असे म.गांधींना वाटायचे पण हिंदूंच्या बरोबरीच्या दर्जाच्या भागीदार म्हणून नव्हे तर गरीब,दुबळे, म्हणून. हरिजन सेवक संघ हे त्यांच्या अनेक तंत्रापैकी एक तंत्र होते'' त्यामुळे अस्पृश्यांविषयी त्यांचा भाव दयाळुपणाचा, उदारमतवादाचा असला तरी ते सर्व सर्व सोंग होते असे वाटते. माझा मुद्दा इतकाच की अस्पृश्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी त्यांनी फार महान कार्य केले,असे काही वाटत नाही. असेल काही माहिती तर जरुर द्यावी.
-दिलीप बिरुटे
जर गांधींचा दुसर्या महायुद्धात भाग घ्यायला विरोध होता तर त्याविरुद्ध त्यांचे आवडते उपोषणाचे हत्यार का नाही वापरले? चोरीचौराच्या हत्याकांडानंतर तत्वनिष्टेची टिमकी वाजवत त्यांनी आपली असहकाराची चळवळ मागे घेतली. २२ लोक मेले तर अक्खी चळवळ मागे घेतली तर हजारो, लाखो लोक मारणार्या युद्धाकरता एक उपोषण करणे जड का जावे?
प्रतिसाद संपादीत. संवादात एखाद्या व्यक्तीबद्दल अथवा विचारांबद्दल मतभिन्नता दाखवताना देखील कृपया योग्य शब्दांचा वापर करावात. - संपादक मंडळ
>>गांधींचा दुसर्या महायुद्धात भाग घ्यायला विरोध होता तर त्याविरुद्ध त्यांचे आवडते उपोषणाचे हत्यार का नाही वापरले?
याचे उत्तर मी देऊ शकत नाही. ते गांधींनाच विचारायला लागेल.
समजा 'म्हातार्या' असा उल्लेख मी गजानन महाराज , शिवाजी , स्वामी समर्थ , परमहंस वगैरे वगैरे यांच्यासंदर्भात जर कुठे केला तर किती % लोकांच्या किती % भावना दुखावतील ?
आप्पा बेलवलकरांचा फ्यान (अडगळ)
होय , होय . तुम्ही आहात तरूण.तुम्ही तरुण आहात म्हणजे करता येतो फक्त संभोग तुम्हाला माणसांच्या माद्यांशी .
अरे, पण तरुण आहेत कावळे आणि तरुण आहेत गिधाडं ही.
(नटसम्राट)
कुरुंदकरांच्या शब्दात सांगायचे तर मुस्लिमांना मतदारसंघ तोडून देणारे टिळक हे मुत्सद्दी आणि लखनौ कराराच्या पुढे एक पाउलही न टाकणारे गांधी लांगूलचालनवादी हे कसे?
टिळकांनी प्रथम मुसलमानांच्या दांडगाईविरुद्ध हिंदुनी दंड थोपटले तेंव्हा त्याचे सक्रीय समर्थन केले. इंग्रजांविरुद्ध भारतीय आघाडी उघडावी म्हणुन प्रसंगी मुस्लीमांना मतदार संघ तोडुन द्यायचे कबुल केले. पुढे मुस्लीम शिरजोर झाल्याचा शंशय जरी येता तर त्याचाही काटा टिळकांनी काढला असता. टिळक १००% राजकारणी म्हणुन वावरले. इथे सर्वधर्मसमभाव वगैरे "आत्म्याच्या आवाजाच्या" गप्पा त्यांनी केल्या नाहि. मनातुन टिळक एक गणिती विचारवंत होते. धर्माचा अविवेकी पगडा त्यांच्यावर नव्हता, आणि म्हणुन ते स्वभावतः सेक्युलर होते (त्या काळच्या मानाने).
गांधींचं नेमकं उलटं. मुस्लीम अनुययच नाहि, तर एकुण आयुष्यभर त्यांनी राजकारण केले पण आपण राजकारणी आहोत हेच मान्य केलं नाहि. संत-समाजसेवक-राजकारणी-मुत्सद्दी... कुठेलीच भुमीका "हो... मी असा आहे" इतक्या स्वच्छपणे न घेऊ शकणार्या गांधींना म्हणुनच सत्याचे प्रयोग करावे लागले.
भारताच्या स्वातंत्र्य-समृद्धीच्या आड मुस्लीम कट्टरता आलि तर सर्व शक्तीने-सर्व मार्गाने तिचा बिमोड करणे हा टिळकी खाक्या. तर राष्ट्रीय ऐक्याच्या नावाखाली, स्वतःचे संतत्व अबाधीत ठेवायला प्रसंगी राष्ट्र्कार्याचे नुकसान सहन करुन मुस्लीम अनुयय करणे हा गांधींचा स्वभाव. मुलभूत फरक आहे.
अर्धवटराव
आपल्याच तत्त्वाच्या विपरीत वर्तन अहिंसावाद्यांना कसे काय आवडले? की हिंसेचा बळी हा त्यांचा प्रिय नेता असल्याने त्याच्या वधकर्त्याला वेगळा न्याय त्यांना अभिप्रेत होता? (मला कम्युनिष्टांचे ब्रीदवाक्य आठवले - " ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल")
ही फाशी म्हणजे अहिंसेचा पराभवच नाही का?
ह्याच विचारांचे एक्स्टेन्शन असलेला प्रश्न मलाही पडलाय. उपरोल्लेखीत वाक्यांमध्ये आलेल्या फाशी हे तत्वविरोधी वर्तन अहिंसावाद्यांना कसे आवडले ह्याचाच पुढचा भाग म्हणजे त्यानंतर घडलेल्या जाळपोळी करणं हे अहिंसेच्या तत्त्वाच्या विपरीत वर्तन अहिंसावाद्यांना कसे काय आवडले? की हिंसेचा बळी हा त्यांचा प्रिय नेता असल्याने त्याच्या वधकर्त्यासोबत त्याच्या ज्ञातीबांधवांवर सरसकट अत्याचार करणे हा वेगळा न्याय त्यांना अभिप्रेत होता?
मिपाकरांनो,
आपले प्रतिसाद हवे आहेत.
मिपावरती नोकिआच्या प्रायोजनाने आंतरजालावर वावरणाऱ्या व व्यवसायाने वा नोकरीत इतिसाहाशी काडीमात्र संबंध नसलेल्या हौशी लेखकांसाठी एक स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत अर्थातच गुणवत्तेवर आधारित अशा मान्यवर परिक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या लेखांना कुठचेही पारितोषिक नाही. सर्वाधिक प्रतिसाद मिळविणार्या लेखासही तसे प्रत्यक्ष पारितोषिक नाहीच, पण आपणाला माहीत आहेच की अधिक प्रतिसाद आले की मिसळभोक्तांच्या मिपा टॉप २५ वगैरे यादीमध्ये ते लेखन पोहोचते.
प्रतिसाददान सतत चालूच असते. एकुण प्रतिसादांच्या संख्येकडे पाहता असे लक्षात आले की केवळ संयत लिखाण करून दहावीस प्रतिसाद सहज मिळतील मात्र भरघोस प्रतिसाद हवे असतील तर काही प्रक्षोभक शब्द लागतील. अर्थातच अशा वेळी गांधीवादाचा आधार मोठा!
मिपाकरहो - गांधीवाद्यांनो आणि गांधीद्वेष्टेहो, त्यासाठी खालील प्रक्षोभक शब्द व वाक्यरचना घातल्या आहेत, त्या वाचा व त्यामुळे उचकलात, किंवा पुन्हा एकदा गांधींना व गांधीवाद्यांना टपली मारण्याची संधी शोधत असाल तर भरघोस प्रतिसाद द्या. मतदानाला काळमर्यादा नाही. तसेच कितीही संगणकांवरुन, कितीही आयडींतून, रोज अनेकदा प्रतिसाद देता येतील (दोन्ही पक्षांना) तेव्हा सढळ हस्ते प्रतिसाद द्या ही विनंती
-गोडसे यांची पुण्यतिथी
-गांधीवध (गांधीहत्या नाही बरं का), नथुराम म्हणजे वधकर्ता
आपला कृपाभिलाषी
सर्वसाअक्षी
टीप - वरील प्रतिसाद हे प्रस्तुत लेखकाच्या आधीच्या मदत मागणाऱ्या धाग्याचं विडंबन आहे. ते विचारांचं विडंबन आहे, तेव्हा कृपया व्यक्तिशः घेऊ नये ही विनंती.
की गांधीवधाचा?
लवकरच धनु आणि बियंतसिंग वगैरे क्रांतीकारकांची पुण्यतिथी साजरी करण्याचा विचार आहे. कुणाला लेखन करून चर्चेचा धागा टाकण्यात इंटरेष्ट असल्यास कळवावे. मला कामामुळे शक्य होत नाहीये.
बाबू बजरंगी (गुजरात दंगल क्रांतिकारक), दारासींग( स्टेंन्सचा वध) इ. क्रांतिकारकांची जयंती वा वाठदिवस साजरे करायलाही सुरवात करायला हवीच. त्यांनी दुष्टांचे निर्दालन करून कशी छान पैकी शांती व सुखसमाधान देशात निर्माण केलं आहे.
आपणही दाऊद इब्राहिम, मेनन बंधू, कसाब आणि अफझल गुरु या महात्म्यांचे वाढदिवस आणि असल्यास पुण्यतिथ्या साजर्या करा. तळहातावर शिर घेऊन या थोर विभूतींनी सर्व भारतीयांना शांती, सर्वधर्मसमभाव आणि प्रेमाचा संदेश दिला नाही का?
गांधीनी दुसरे काय केले? भगतसिंगाच्या फाशीला योग्य ठरवले पण स्वामी श्रद्धानंदाना मारणार्या नराधमाला भाई अब्दुल रशीद असे गौरवले. त्याची फाशी रद्द व्हावी म्हणून (अयशस्वी) प्रयत्न केले.
काँग्रेसही तीच उज्ज्वल परंपरा चालवत आहे. अफझल, कसाबला फाशी म्हणजे भारताच्या सर्वधर्मसमभावालाच छेद, हो की नाही?
>>स्वामी श्रद्धानंदाना मारणार्या नराधमाला भाई अब्दुल रशीद असे गौरवले. त्याची फाशी रद्द व्हावी म्हणून (अयशस्वी) प्रयत्न केले.
हुप्प्यामालक ! ही गोष्ट पहिल्यांदाच एकतोय, जरा विस्ताराने एकायला आवडेल.
बाकी तुमचे आणि थत्त्यांचे प्रतिसाद अत्यंत उत्तम, आवडले.
हे आर्यसमाजी कधी हिंदुबंधू होतात, तर कधी हिंदू त्यांना झिडकारतात. एक काही तरी ठेवा ना राव !
काय हुप्प्याशेठ, हे स्वामी दयानंद, श्रद्धाणंद, आणि आपण हुप्प्यानंद, हे हिंदू आहात की नाही, ह्याचे फायनल डिसिजन करा ने !
मग ठरवू, की आर्य समाजी आणि हिंदू हे भाई भाई, की अब्दुल रशीद भाई, ते.
हे आर्यसमाजी कधी हिंदुबंधू होतात, तर कधी हिंदू त्यांना झिडकारतात. .... मग ठरवू, की आर्य समाजी आणि हिंदू हे भाई भाई, की अब्दुल रशीद भाई, ते.
या प्रतिसादासंदर्भात इंद्रराज यांनी खाली अभ्यासपूर्ण मुद्दे मांडून खुलासा केला असल्याने त्या संदर्भात लिहायची गरज नाही. फक्त आपण वर मांडलेल्या मुद्यासंदर्भात मला वाटते हुप्प्या यांनी आर्यसमाजी हिंदू आहेत का नाही हा विषय मांडलेला नसून गांधीजींनी भगतसिंगाच्या फाशीच्या वेळीस घेतलेली भुमिका ही अब्दुल रशीद भाईंच्या वेळेस कशी बदलली हा होता. त्यात कोण हिंदू आहे अथवा नाही हा प्रश्न नसून अहींसेचे तत्वज्ञान अॅक्रॉस दी बोर्ड वापरले आहे का नाही हा आहे.
बाकी चर्चा रोचक आणि बरीच नवीन माहीती मिळत आहे.
गांधींनी भगतसिंग यांची फाशी रद्द होण्यासाठी प्रयत्न केल्याचे वर दाखवून दिले आहे.
त्यामुळे वेगवेगळे तत्त्व वापरल्याचा आरोप खारीज झाला आहे.
अवांतर : विकास यांना या चर्चेतून "नवीन" माहिती मिळत आहे हे वाचून आश्चर्य वाटले.
ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल हे कम्युनिस्टांचे ब्रीदवाक्य नाही. हे जॉर्ज ऑरवेल या लेखकाने केलेले कम्युनिस्ट व्यवस्थेचे वर्णन आहे. कम्युनिस्ट आपल्याच तत्त्वाला इतक्या सहजते ने आणि उघडपणे हरताळ फासत नाहीत. ते फार ढोंगीपणा करतात त्यासाठी.
'एक प्रश्न' लेखावर अबब किति प्रश्न.
गाडुन टाका हि सगळि प्रश्न
ते राम, त्याचे पुनर लेखन, क्रुष्ण होता का नव्हता, गांधी, टिळ्क, हे सगळ सोडुन एक दिवस तरि जगा लेकांनो.
विसरा त्या नथुरामाला, त्याने एकच गोळि मारली आनि तुमि लोक मागचि ६० वर्शे झेलताय.
सोडा
इथे आज एका फोनवरुन तलाक देन्या इतपत आपन पोहोचलो आनि हे काय तुम्हि ६०/१०० वर्शाचे दळन दळताय. http://www.thehindu.com/news/national/article888417.ece
Talaq uttered thrice by a Muslim man on a mobile phone will be considered valid even if his wife is unable to hear it all the three times due to network and other problems, a fresh fatwa has ruled.
म्हनुन चान्ग्ला मोबयिल घ्या बोल्लो तर लेख उडवला, ओके आहे.
wife should be able to hear clear voice एवढा तरि हक्क द्या ना राव.
आज ६३ वर्षांनंतर, गांधी भाषा, जात, धर्म, देश यांच्या सीमा ओलांडून केवळ ओळखलेच नाहीत तर अभ्यासले जातात.
आणि, नथुरामाच्या ओळखीची धाव एका अत्यंत मर्यादित परीघापलीकडे जात नाही!
बाकी धागा मनोरंजक इत्यादी इत्यादी...
विरोधकाचे मतपरीवर्तन हा गांधींच्या विचारांचा पाया होता.
त्यानी हिंसेचे समर्थन केले नाही. पण पाणी डोक्यावरून जाते आहे हे कळाल्यावर त्यानी लोकाना करो या मरो असेही सांगितले होते.
नथुराम किंवा त्याच्या विचारांशी सहमत असणार्याना सर्वमान्यता कधीच मिळाली नाही.
नथुरामला फाशी दिली नसती तर फार बरे झाले असते. त्याला काहींच्या मते मिळालेले शहीदत्व प्राप्त झाले नसते.
भारतीय समाजाला एखादा विभाग वगळता बंडखोरी सशस्त्र चळवळ पेटून उठणे वगैरे जमत नाही.
त्यामुळेच की काय हिंदू जिहाद वगैरे संकल्पना प्रत्यक्षात येवू शकत नाही.
कमालीची आत्ममग्नता हा या समाजमानसाचा पाया झालेला आहे.
अन्यथा कुठून तरी एक बाबर इकड येतो आणि त्याचा वंश सर्वसत्ताक बनतो आणि शिवाजीला स्थानीकांकडुनच विरोध होतो. त्याची चळवळ घरच्यांकडुनच सम्पवण्याचा प्रयत्न होतो.
हा चमत्कार या इथेच दिसतो.
".....गांधीनी दुसरे काय केले? भगतसिंगाच्या फाशीला योग्य ठरवले पण स्वामी श्रद्धानंदाना मारणार्या नराधमाला भाई अब्दुल रशीद असे गौरवले....."
श्री.हुप्प्या यानी 'गांधींनी अब्दुल रशीदला 'भाई' असे म्हटले म्हणजे एक प्रकारे गौरविले' असे जे मत मांडले आहे त्याबद्दलच केवळ इथे प्रतिसाद देत आहे. [बाकी गांधीहत्या आणि नथुराम या विषयावर मिपावर या अगोदर खूप दळण रगडले गेले आहे, त्यामुळे द्विरूक्ती टाळणेच योग्य ठरेल.]
श्री.आनंदयात्री यानीही 'श्रद्धानंद' विषयावर विस्ताराने लिहिण्याची विनंती केली असल्याचे दिसले आहे. त्यामुळे तोही हेतू या निमित्ताने पूर्ण होईल.
खिलाफत चळवळीविषय एकदोन प्रतिसाद वर आले आहेतच. "खिलाफत = खलिफा हा सर्वेसर्वा मानला जावून तो म्हणेल ती पूर्व (कारण तो अल्लाचा प्रतिनिधी या नात्याने)" अशी समजूत मुस्लिम समाजात रुजली होती, जिला तुर्कस्थानात मुस्तफा केमाल पाशाने विरोध केला होता. पुनर्रज्जीवनवाद्यांनी खिलापत चळवळ जिवंत ठेवण्याचे प्रयत्न चालूच ठेवले पण साधारणतः १९२३ च्या आसपास ही चळवळ थंडावली. पण यामुळे भारतातील कट्टर मुस्लिमांनी त्याचा राग हिंदूंवर काढला. वायव्य सरहद्दीवरील पठाणापासून ते मलबारपर्यंत तसेच काश्मिरपासून ढाक्क्यापर्यंतच्या पट्ट्यात मुस्लिमांनी [खलिफा गमावल्याच्या विफलतेतून] केमाल पाशावर नव्हे तर हिंदूंवर संताप व्यक्त केला. अमृतसर, मुलतान, मीरत, पानिपत, जबलपूर, दिल्ली इतकेच काय तर महाराष्ट्रातील नागपूर आदी ठिकाणी मुसलामानांनी दंगे उसळवले. ९ व १० सप्टेम्बर १९२३ या दोन दिवसात वायव्य सरहद्द प्रांतातील 'कोहट' या गावी १५५ हिंदू मारले गेले तर लक्षावधी रुपयांच्या मालमत्तेची राखरांगोळी करण्यात आली. देवळेही उद्ध्वस्त झाली. कोहट परिसरातील भयभीत झालेल्या हिंदू समाजाला धीराचे शब्द देऊ पाहणारा त्या वेळचा एकमेव नेता म्हणजे 'स्वामी श्रद्धानंद'. त्यानी हिंदू समाजाची संघटना या कार्याला पूर्णवेळ वाहून घेतले होते. त्यांच्या पुढाकाराने हिंदू 'कोहटकांडा' नंतर एकत्र होऊ लागताच मुसलमानांच्या डोळ्यात स्वामीजी सलू लागले. त्यातील अतिरेक्यांच्या मनाने असे घेतले की श्रद्धानंदांचा काटा दूर केल्याखेरीज जात्यंध राजकारणाचा जय शक्य नाही व याच हेतूने अब्दुल रशीद याने स्वामींच्या दिल्लीच्या निवासस्थानी [ते आजारी असल्याने त्यांची चौकशी करायला बरेच लोक येत असत....प्रवेशही खुलाच असे] आदरांजली वाहण्याचा बहाणा करून रशीदने निवासात प्रवेश मिळवला व स्वामी श्रद्धानंदांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली....दिनांक २३ डिसेंबर १९२६.
आता इथे बाकीच्या [भल्याबुर्या] गोष्टींची चर्चा करण्यापेक्षा या हत्येवर नेमकी म.गांधींची प्रतिक्रिया काय होती ते पाहणे महत्वाचे आहे.
मूळ प्रतिक्रिया इंग्लिशमधील असून तिचा अनुवाद नंतर पाहू :
"...God had willed for him [i.e.Swami Shraddhanand] a martyr's death. I cannot mourn over his death. He and his followers are to be envied. ~~~ या ठिकाणी गांधीजी म्हणतात I cannot mourn over his death याचा अर्थ असा बिलकुल नाही की त्याना स्वामींच्या मृत्युबद्दल खेद वाटला नाही....तर पुढचे वाक्य असे आहे ~~ For though Shraddhanandji is dead he is yet living. He lived a hero. He has died a hero. ~ स्वामीजी आपल्यातून नाहिसे झाले असे मानू नये, असेच गांधी सुचवितात हे स्पष्ट आहे.
"....I deeply regret the event. The joy of the death is thus tempered by the sorrow that an erring misguided brother has been the cause of it. Let us not ascribe the crime of an individual to a whole community. Let us not harbor the spirit of retaliation. Let us not think of the wrong done by a Musalman against a Hindu, but an erring brother against a hero...."
प्रत्येक ठिकाणी गांधीजीनी स्वामींचा उल्लेख "हीरो" असाच केला आहे तर रशीदचा उल्लेख 'प्रमादशील बंधू' असा केला असल्याने त्याचा 'गौरव' केला असे म्हणणे धार्ष्ट्याचे होईल.
श्री.द.न.गोखले यानी केलेला अनुवाद...थोडक्यात ::: "परमेश्वराची इच्छा होती की, त्याना - स्वामीजींना - हुतात्म्याचे मरण यावे. मी त्यांच्या मृत्युबद्दल शोक करू शकत नाही. कारण जरी श्रद्धानंदजी मृत्यु पावले असले तरी ते अद्याप जिवंतच आहेत. शूर पुरूष म्हणून ते जगले, शूर पुरूष म्हणूनच ते मरणाधीन झाले. हिंदूनी एका व्यक्तीचे दुष्कृत्य सर्व जमातीवर लादू नये. प्रत्याघाताची भावना मनात आणू नये. एका मुसलमानाने एका हिंदूविरुद्ध केलेले दुष्कृत्य असे या घटनेकडे न पाहता, आपण एका प्रमादशील बंधूने एका शूर पुरुषाविरूद्ध केलेले दुष्कृत्य असे याकडे पाहावे."
[अवांतर ~~ पुढे झालेल्या खटल्यात या अब्दुल रशीदला स्वामी श्रद्धानंदाच्या हत्येबद्दल फाशी झाली. ज्या मुस्लिमांनी स्वामी हत्येबद्दल त्याचा उदोउदो केला होता त्यापैकी एकही माय का लाल रशीदचे प्रेत घेण्यास पुढे आला नाही, व शेवटी तुरुंगाच्या आवारातच सरकारी शिपायांनी त्याचे दफन केले.]
असो.
इन्द्रा
थोडेफार रिप्लाय वाचले ...
नथुराम गोडसे यांचा नाटक पाहुन खुप चाहता होतो मी. त्यातच गांधीजींबद्दल जास्त आदर नव्हता .. नेटवर कोठेही त्यांच्याविरोधी मते वाचुनच होता तो ..
नंतर सारासार अभ्यास करुन आणि काही मित्रांच्या लेखामुळे गांधीजी खरेच महान होते हे पटले ...
नक्कीच ते मित्रांचे लेख नविन थ्रेड बनवुन देयीन ..... आवडतील सगळ्यांना ....
----
बाकी नथुराम - गांधी वाद करुन आपण कोणाचे प्रेमी आणि असेच पाहिजे हे फिजुल वाटते मला तरी ..
असो .. येथे थांबतो
पण नथुराम गोडसेला फाशी दिली ती एक योग्य गोष्ट होती.
तसेच नथुरामच्या फाशीला उदांत ठरवणारे नकळत भारतिय घटनेचा देखिल अपमान करत आहेत.
कसाब देखिल त्याच्या धर्मासाठी भारतात हत्याकांड घडवण्यासाठी आला होता मग त्याला तरी कशाला दोषी धरायचे?
त्याच्या दहशतवादाला देखिल तात्विक मुलामा दिला तर तो देखिल देवदुत ठरतो.
प्रतिक्रिया
काही आक्षेपार्ह...
... आणि काही माहीती
श्री.देवदास नव्हे श्री.रामदास गांधी
धन्यवाद
आक्षेप
कारण...
असे अनेकदा दिसून आले आहे.
गन कॅरेज
पेश्शल...
कोण गांधी ?
ही फाशी म्हणजे अहिंसेचा
ही फाशी म्हणजे अहिंसेचा
गांधीवाद
क्या बात है! अत्यंत सडेतोड
खंडन
लखनौ करार आणि खिलाफत
गांधी एकूणातच धर्मश्रद्ध
सोयीचे असेल तेव्हा टिळकांशी तुलना?
एकाच काळातली सारखीच कृत्ये
प्रतिवाद अथवा सहमती म्हणून नाही
डॉ.सदानंद मोरे....!
हिंदूंमधे जातिबंधने आहेत आणि
जर गांधींचा दुसर्या महायुद्धात भाग घ्यायला विरोध होता...
उपोषण
तर मग..
अवांतर : काय आक्षेप वगैरे नाही, पण
धन्यु
टिळक वि. गांधी.
प्रतिसाद....
आपल्याच तत्त्वाच्या विपरीत
मिपाकरांनो, आपले प्रतिसाद हवे आहेत.
गांधीवादाचा की?
बाबू बजरंगी (गुजरात दंगल
आणि
भाई अब्दुल रशीद
च्यायला
मला वाटते...
तत्त्व
पोकळ प्रयत्न
??????
हे
खिक्क
'एक प्रश्न' लेखावर अबब किति
बॉटमलाइन
विरोधकाचे मतपरीवर्तन हा
स्वामी श्रद्धानंद, अब्दुल रशीद आणि गांधी वक्तव्य
धन्यवाद
थोडेफार रिप्लाय वाचले
हिंसेला प्रतिकार न करणे --
मी गांधीजीचा कधीच चाहता नव्हतो किंवा आताही नाही