Skip to main content

१५ करोड द्या, नाहीतर टाटा गुडबाय

१५ करोड द्या, नाहीतर टाटा गुडबाय

Published on बुधवार, 17/11/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
१५ करोड म्हणजे तर खरेतर टाटा यांच्या हाताचा मळ. पैशांच्या गड्ड्या फेकून ते आपले इप्सित सध्या करू शकले असते. पण सामाजिक नीती मुल्ये जपत त्यांनी लाच देण्यास नकार दिला. आज बजाज यांनीदेखील त्याला सहमती दिली आणि 'हे करावेच लागते' असे सांगितले. टाटांसारख्या उद्योगपतींची ह्या देशातून अशी जर प्रतारणा होत असेल तर लवकरच हा देश कुठे रसातळाला जाईल हे सांगायला नको. बाकींच्या शेकडो भ्रष्टाचाराच्या घोटाळ्यांबद्दल न बोललेलेच बरे. Minister sought Rs. 15 crore bribe to start airline: Tata Big corporate houses would find it easier not to be corrupt than small ones, but they still give money to get their jobs done, Bajaj, the chairman of Bajaj Auto, said असो, ज्या महात्म्याच्या नितीमुल्यांवर आपला लोकशाहीचा गाडा उभारलेला आहे (असा डीमका पिटवला जातो), हि बातमी ऐकून त्यांच्या आत्म्याला किती क्लेश झाले असतील, देवालाच ठाऊक.

याद्या 3086
प्रतिक्रिया 13

टाटांनी नुसतं बेंबीत बोट घालुन गार आहे असे न म्हणता स्पष्ट कोण मंत्री, कोण अधिकारी असे सांगितले असे तर जास्त योग्य झाले असते. हे असे मोघम सांगणे म्हणजे बघा मी किती प्रामाणिक आहे असे ढोल वाजवणे आहे. दहा वर्षांनंतर बोलायचेच होते तर व्यवस्थित माहिती देऊन बोलायला हवे होते असे आमचे वैयक्तिक मत आहे. बाकी आपल्याला जास्त कळत नाही हे जगजाहिर आहे. बाकी व्हीएसएनेल चे डिलींग कसे झाले याबाबत तज्ज्ञांचे म्हणणे वाचायला आवडेल.

In reply to by अवलिया

टाटा खोटे बोलत आहे म्हणायचे नाही पण तरीही नाना म्हणतो ते बरोबर आहे. उगाच मोघम बोलण्यापेक्षा वट्टात नाव घेऊन बोलले असते तर बरे झाले असते, तसाही तो मंत्री कुणीही असता तरी 'आज' टाटाचे काय वाकडे करु शकणार आहे ? - छोटा डॉन

In reply to by अवलिया

एकतर बैल गेला अन खोपा केला हे कशाला? तेव्हांच आवाज उठवला असता तर काय झालं असतं? सर्वसामान्य माणसाला पांढर्‍या दहशतवाद्यांनी गायब केला असता पण ते टाटांना काय करु शकले असते? शिवाय, 'पण सामाजिक नीती मुल्ये जपत ' हे अंमळ तपासून पहावं लागेल साहेब. :) टाटा टेलीसर्व्हिसेस चे कोणी ग्राहक आहेत का तुमच्या परिचयाचे? :)

In reply to by धमाल मुलगा

सर्वसामान्य माणसाला पांढर्‍या दहशतवाद्यांनी गायब केला असता त्यावेळचे दहशतवादी नुसते पांढरेच नव्हते. ते आणखी वेगळ्या रंगाचे होते

In reply to by अवलिया

Nano ला आता कुत्रा सुध्दा विचारत नाही. सरळ showroom ला विकत मिळते. वर loan ची सोय सुध्दा हे लोक करतात. आता मला सांगा, येवढे पैसे booking च्या वेळी गोळा केले , ते परत देताना रडतात का? Nano च्या विषयाला बगल म्हणून ही नाव न सांगता केलेली नाटक आहेत.

In reply to by अवलिया

सहमत आहे. शिवाय गांधीवादी यांनी जुनी माहिती दिली आहे. आपल्याकडे पैसे मागितले असे टाटांनी म्हटले नाही असा खुलासा टाटा कंपनी तर्फे करण्यात आला आहे. कदाचित नव्याने कंपनी चालू करताना परवानग्या मिळण्यासाठीचे टॅक्टिक्स असू शकतील.

गांधीवादी ज्या सातत्याने अशा प्रश्नांना वाचा फोडतात आणि जनजागृती करतात त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. मिपावर आज देशाचा आणि देशवासीयांच्या भविष्याचा खरा विचार करणारे कोणी असेल तर ते गांधीवादी आहेत :) बाकी चार घटका टिवल्या बावल्या करायला येणार्‍या आणि स्वतःच्या खोट्या विश्वात मग्न असणार्‍या दांभिकांनी त्यांच्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे ह्यात नवल नाही.

संरक्षण्,टेलिकॉम्,विमाने ह्यांच्या कंत्राटांमध्ये सरकारी उच्च अधिकारी,मंत्र्यांनी पैसे खाल्ले नाहीत असे सहसा होत नाही. मंत्रीमंडळ बनवायच्या सुमारास ह्या खात्यांमध्ये आपला माणूस असावा ह्यासाठी सर्वच पक्ष खूप मेहनत घेतात. टाटांनी जोउल्लेख केला आहे तो मंत्री म्हणजे बहुतेक सी.एम. इब्राहिमच आहेत. म्हणूनच मंत्र्याचे नाव जाहीर करा नाहीतर आत्महत्या करेन अशी धमकी इब्राहिम ह्यांनी दिली आहे!! टाटांनी नाव घेतले नाही कारण अशा डील्समध्ये कागदी व्यवहार कधीही होत नाहीत. त्यामुळे आरोप शाबित करणे अशक्य असते.म्हणूनच टाटांनी अप्रत्यक्ष उल्लेख(९०च्या दशकातला मंत्री) केला आहे. टाटाने आत्तापर्यंत कधीच पैसे खिलवले नसतील यावर आमचा विश्वास नाही ! हल्ली हे व्यवहार डायरेक होतात. म्हणजे १५ कोटी द्या,परवाना देतो. पूर्वीच्या काळी पैसे न खिलवता ही कामे व्हायची. म्हणजे माझ्या मतदार संघात/राज्यात कारखाना उघडा/थोडे फार पैसे पक्षाला दक्षिणा म्हणून द्या मग परवाना देतो. अवांतर- स्वातंत्र्यपूर्व काळातही बिर्ला,वालचंद हिराचंद वगैरे उद्योगपतींचे काँग्रेसनेत्यांबरोबर चांगले संबंध असायचे.

रतन टाटांना का दोष देता ? त्यांच्यासारखा सचोटीचा, जेआरडींचा प्रामाणिक वारसा चालवणारा दुसरा कोणी उद्योगपती नाही या देशात. ज्यांना फक्त या देशातली भौतिक प्रगतीच दिसत आहे ते बाकीच्या वास्तवाकडे डोळेझाक करणारच.

Crisis of Character by Uday Dandavate वाचा - http://theradicalhumanist.com/index.php?option=com_radical&controller=article&cid=253&Itemid=56